पुण्‍यामध्‍ये नॅशनल एचआरडी नेटवर्क समिट ‘अनुभूती’ च्‍या ८व्‍या पर्वाचे आयोजन

नॅशनल एचआरडी नेटवर्क (एनएचआरडीएन) पुणे चॅप्‍टरने १४ डिसेंबर २०२४ रोजी हयात हॉटेल, हिंजवडी, पुणे येथे आपला प्रमुख वार्षिक मानवी संसाधन समिट इव्‍हेण्‍ट ‘अनुभूती’चे आयोजन केले आहे.

अनुभूती इव्‍हेण्‍ट एचआर व्‍यावसायिक, उद्योग प्रमुख आणि तज्ञांना एकत्र आणतो, जेथे ते आजच्‍या झपाट्याने बदलत असलेल्‍या कामकाज वातावरणामध्‍ये मानवी संसाधनाच्‍या (ह्युमन रिसोर्स) सर्वसमावेशक भूमिकेसंदर्भात मुख्‍य समस्‍यांचा शोध घेण्‍यासोबत त्‍यावर चर्चा करतात.

एचएनआरडीचा हा प्रमुख इव्‍हेण्‍ट एचआर व्‍यावसायिक, एलअँडडी प्रमुख, फॅकल्‍टी व विद्यार्थ्‍यांसाठी विचारपूर्वक डिझाइन करण्‍यात आला आहे. हा इव्‍हेण्‍ट तुम्‍हाला तुमच्‍या कंपनीमध्‍ये अर्थपूर्ण प्रभावाला गती देण्‍यासाठी व्‍यावहारिक इनसाइट्स व परिवर्तनात्‍मक संकल्‍पनांबाबत माहिती देण्‍याची खात्री मिळते. यंदा भारताच्‍या कानाकोपऱ्यातील विविध उद्योग क्षेत्रांमधील १५० हून अधिक एचआर व्‍यावसायिक दिवसभर चालणाऱ्या इव्‍हेण्‍टमध्‍ये सहभाग घेणार आहेत. राष्‍ट्रीय स्‍तरावर एनएचआरडीएनचे एकूण ५४ चॅप्‍टर्स आहेत.

अनुभूती’व्‍यापक नेटवर्किंग संधी देते, ज्‍यामुळे एचआर व एलअँडडी व्‍यावसायिकांना समकालीन कर्मचारी व्‍यवस्‍थापन आव्‍हानांसाठी इनसाइट्स शेअर करता येते, सहयोग करता येतो आणि सोल्‍यूशन्‍सबाबत चर्चा करता येते. या इव्‍हेण्‍टमध्‍ये महत्त्वपूर्ण थीम्‍सबाबत विचारविनिमय करण्‍यात येईल, जसे हायब्रिड कर्मचारीवर्ग निर्माण करणे, सर्वसमावेशकतेला चालना देणे आणि जनरेशन झेड प्रमुख घडवणे.

एनएचआरडीएन पुणेचे अध्‍यक्ष श्री. अमन राजाबली यांच्‍या अध्‍यक्षतेखाली या इव्‍हेण्‍टचे आयोजन करण्‍यात आले आहे. दिल्‍लीमधील जेके ऑर्गनायझेशनचे ग्रुप एचआर व एनएचआरडीएनचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष श्री. प्रेम सिंग उद्घाटनीय भाषण सादर करतील, जेथे ते एचआर नेतृत्‍वाचे भविष्‍य आणि व्‍यवसायामधील नाविन्‍यता व गतीशीलतेसाठीच्या गरजेबाबत चर्चा करतील.

एनएचआरडीएनच्‍या प्रादेशिक अध्‍यक्ष (पश्चिम) श्रीमती उषा सिंग इव्‍हेण्‍टची थीम सादर करतील, तसेच संकरित कर्मचारीवर्गांचे व्‍यवस्‍थापन, वैविध्‍यतता आणि नेतृत्‍व विकास अशा प्रमुख एचआर आव्‍हानांना प्रकाशझोतात आणतील.

पॅनेलिस्‍ट-प्रवक्ता असणार आहेत, आयसीआयसीआय होम फायनान्‍सचे सीएचआरओ श्री. अमिताभ सिंग, वंडरलँडेच्‍या ग्‍लोबल एलअँडडी प्रमुख श्रीमती प्राची मिश्रा, सायबेजच्‍या जागतिक प्रमुख श्रीमती टिना रस्‍तोगी, प्रगती लीडरशीप इन्स्टिट्यूटचे संस्‍थापकीय संचालक व प्रमुख मेन्‍टोर श्री. अरूण वाखलू, टीईडीएक्‍स प्रवक्‍त्‍या, बँकिंग टेक्‍नॉलॉजीच्‍या वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष श्रीमती अमिता कराडखेडकर, जेड ग्‍लोबलच्‍या लर्निंग अँड ऑर्गनायझेशन डेव्‍हलपमेंटच्‍या उपाध्‍यक्ष श्रीमती सुकन्‍या पटवर्धन. हे सर्व संकरित कर्मचारीवर्ग, वैविध्‍यतता व सर्वसमावेशकता आणि जनरेशन झेड प्रमुख घडवणे अशा विषयांवर चर्चा करतील.

कॉर्पोरेट कोतवाल ड्रामा स्किट विशेष आकर्षण असणार आहे, ज्‍यामध्‍ये सर्जनशील नाट्य प्रदर्शनाच्‍या माध्‍यमातून कर्मचाऱ्यांचे जीवनचक्र व आव्‍हानांना दाखवण्‍यात येईल.