स्कोडा ऑटोने या वर्षी फेब्रुवारी महिन्यात आटोपशीर एसयूव्हीची घोषणा करून आपला ब्रँड भारतात वाढवण्याच्या महत्त्वाकांक्षा स्पष्ट केल्या होत्या. राष्ट्रीय स्तरावरील नामकरण मोहिमेमधून कायलॅकला आपले नाव मिळाले असून तिचे उद्घाटन जगभरात ६ नोव्हेंबर २०२४ रोजी केले जाईल. कायलॅकसह स्कोडा ऑटो इंडिया कोडिएक आणि स्कोडा ऑटो इंडिया २.० च्या प्रकल्पातील पहिले अनावरण असलेली मध्यम आकाराची एसयूव्ही कुशाक यांच्यासह आपल्या लक्झरी एसयूव्ही बाजारात आणणार आहे.
कायलॅकमुळे स्कोडा ऑटो सब ४ एम विभागात उपलब्ध होईल. ही भारतातील एकूण कारच्या बाजारपेठेपैकी ३० टक्के बाजारपेठ असेल आणि भारतातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या विभागांपैकी एक आहे. कायलॅक आपल्या आधुनिक, बोल्ड आणि मस्क्युलर स्टायलिंग, सिद्ध झालेले स्कोडा ड्रायव्हिंग डायनॅमिक्स, अद्वितीय सुरक्षा आणि विविध प्रकारच्या वैशिष्ट्यांसह आटोपशीर एसयूव्ही विभागाला एक वेगळे रूप देण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे ती लोकांना नक्कीच आकर्षित करेल. कायलॅकच्या अनावरणामुळे स्कोडा ऑटो भारतात ‘न्यू एरा’ मध्ये प्रवेश करेल. युरोपबाहेर ही ब्रँडसाठीची सर्वांत महत्त्वाची बाजारपेठ आहे.
स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पियूष अरोरा म्हणाले की, “स्कोडा इंडियाकडून पहिली आटोपशीर एसयूव्ही कायलॅक आणताना मला खूप अभिमान वाटतो आहे. कायलॅकची रचना उच्च दर्जाच्या स्थानिकीकरणासह केली गेली असून आमच्या मेक इन इंडिया वचनबद्धतेला शक्ती देण्यात आली आहे.
ही गाडी ग्रुपच्या डायनॅमिक, सुरक्षा आणि आराम या गोष्टींना चालना देण्याच्या डीएनएचे प्रतिनिधीत्व करते आणि त्यासोबत आमच्या किमतीबाबत जागरूक ग्राहकांना हवी असलेली प्रात्यक्षिक वैशिष्टेही त्यात आहेत. मला खात्री आहे की, हे उत्पादन भारतीय ग्राहकांच्या विचारसरणीशी जुळणारे असेल. कायलॅकचे डिझाइन आणि निर्मिती भारतात, भारतासाठी करण्यात आली असून त्यातून ही बाजारपेठ नक्कीच बदलेल.”
आधुनिक, बोल्ड आणि मस्क्युलरः कायलॅक नवीन ग्राहकांना आकर्षित करणार
भारतीय ग्राहकांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन कायलॅकची रचना करण्यात आली आहे. भारतात स्कोडा ग्लोबल डिझाइन लँग्वेजची अंमलबजावणी त्यातून होईल. या डिझाइनची रचना स्पष्ट आणि कमी केलेल्या लाइन्सनी अधोरेखित आहे. त्यामुळे स्कोडा कार्सचा साधेपणा, दणकटपणा आणि दर्जा स्पष्ट हील. फेंडर्सभोवती असलेल्या बोल्ड आणि मस्क्युलर आकारामुळे कारला जास्त स्टान्स मिळतो आणि ती रस्त्यावर लक्ष वेधून घेते.
या स्कोडामध्ये असमान रस्त्यांच्या पृष्ठभागाचा सामना करण्यासाठी जास्त ग्राऊंड क्लिअरन्स आणि चाकाभोवती जागा असेल. त्यामुळे खऱ्या अर्थाने एसयूव्ही व्यक्तिमत्वाची गाडी आपल्याला दिसेल. या डिझाइनच्या फ्रंटला एक सर्वसामान्य स्कोडा एसयूव्ही लँग्वेज आहे. त्यासोबत रिफाइन्ड आणि अचूक डीआरएल लाइड सिग्नेचर्स दिसून येतील. आगामी एसयूव्हीमध्ये कारच्या बाजूला आणि मागच्या बाजूला एक हेक्झागॉन रचना असेल आणि त्यामुळे डिझाइन जास्त मौल्यवान होईल.
स्कोडा ऑटो इंडियाचे ब्रँड संचालक पेट्र जनेबा म्हणाले की, “आमच्या पोर्टफोलिओचा विस्तार हा आमच्या वाढीच्या धोरणाचा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे आम्हाला स्कोडा कुटुंबात अधिकाधिक ग्राहकांचे स्वागत करणे शक्य होईल. आम्ही एक नवीन एसयूव्ही- कायलॅक आमच्या उत्पादनांमध्ये आणली असून आमच्या भारतातील सर्वांत मोठ्या अनावरणासाठी सज्ज आहोत. आमच्या भारतातील प्रवासातला हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या बाजारपेठेतील वाटा दुप्पट करणे शक्य होईल. तुम्हाला टीझर्स दिलेले आहेत.
त्यातून हे दिसेलच की ही एक अप्रतिम दिसणारी एसयूव्ही आहे. सध्या कायलॅकची शेवटच्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. त्यामुळे कारचे संपूर्ण दर्शन आम्ही सध्या तरी घडवू शकत नाही. कायलॅक या कारमुळे भारतात युरोपियन तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण होईल. या गाडीच्या सर्व प्रकारांमध्ये २५ पेक्षा जास्त कार्यरत व छुपी सुरक्षा वैशिष्टे आहेत आणि सुमारे ३० विशेष घटक आहेत. कायलॅक बाजारातील प्रवेशासाठी जवळपास तयार आहे आणि सुरक्षा व डायनॅमिक्सच्या संदर्भात ती नक्कीच आघाडी घेईल.”
शक्ती, कामगिरी, सुरक्षा आणि वैशिष्टे
कायलॅकला सिद्ध आणि कार्यक्षम १.० टीएसआय इंजिनाने ऊर्जा मिळाली आहे. त्यामुळे सिक्स स्पीड मॅन्युअल किंवा सिक्स स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसाठी ती सज्ज आहे. या इंजिनातून ८५ किलोवॉट ऊर्जा आणि १७८ एनएम टॉर्क निर्मिती केली जाते. ही कार कुशाक आणि स्लाव्हिया या दोन कारप्रमाणेच एमक्यूबी-एओ-इन प्लॅटफॉर्मवरच तयार करण्यात आली आहे. या दोन कार्सनी प्रौढ आणि मुलांसाठी ग्लोबल एनसीएपी चाचणीत ५ स्टार मिळवले आहेत. कायलॅकमध्ये २५ पेक्षा जास्त कार्यरत आणि छुप्या सुरक्षा वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
त्यात सहा एअरबॅग्स, ट्रॅक्शन आणि स्थैर्य नियंत्रण, अँटी लॉक ब्रेक्स, इलेक्ट्रॉनिक ब्रेक डिस्ट्रिब्युशन, ब्रेक डिस्क वायपिंग, रोल ओव्हर प्रोटेक्शन, मोटर स्लिप रेग्युलेशन, इलेक्ट्रॉनिक डिफरंशियल लॉक, पॅसेंजर एअरबॅग डी-एक्टिव्हेशन, मल्टी कॉलिजन ब्रेकिंग आणि आयसोफिक्स सीट्स अशा विविध वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
कायलॅक चालक आणि प्रवाशांना भरपूर जागा व आराम देखील देईल. कायलॅक व्हेंटिलेशन फंक्शनसह वर्गातील प्रथम एडजस्टेबल ड्रायव्हर आणि पॅसेंजर सीट्स देईल. कायलॅक भारतात सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या आणि सर्वधिक स्पर्धात्मक बाजारपेठेत स्कोडा ऑटोच्या अस्तित्वाचे नेतृत्व करेल.
भारतीय रस्त्यांसाठी सज्ज
कायलॅकची चाचणी शहरी, महामार्ग, डोंगराळ आणि खडबडीत रस्ते अशा ८००,००० किमी प्रदेशांवर करण्यात आली आहे. हे पृथ्वीवरून चंद्रापर्यंत जाऊन परत येण्याइतके अंतर आहे. पृथ्वीभोवती २० पेक्षा जास्त फेऱ्या मारण्यापेक्षाही जास्त अंतर आहे. या नवीन आटोपशीर एसयूव्हीला -१० ते +८५ अंश सेल्सियस अशा विविध तापमानांमध्ये तसेच समुद्र पातळीपासून समुद्र पातळीच्या वर ३००० मीटरपर्यंत तपासण्यात आले आहे. पावसाळ्यासाठी योग्य ती सज्जता आणि विविध घटकांमध्ये अचूक सीलिंग याची खात्री करण्यासाठी कायलॅकचे १०० विविध नमुने १६ डिग्रीपर्यंतच्या अंशांत प्रति मिनिट / चौ. मीटर २५-३० लिटर पाण्याशी संपर्कात आणण्यात आले आहेत.
यातून कायलॅकमध्ये प्रचंड पाऊस असताना अजिबात पाणी शिरणार नाही याची काळजी घेतली जाईल. कायलॅकची व्हेइकल शेकर टेस्ट करण्यात आली असून त्यातून गाडीची आतली बाजू रस्ता कसाही असला तरी शांत तसेच स्मूथ राहील याची काळजी घेतली गेली आहे. या कारने खुल्या हवामानात दोन वर्षे घालवली आहेत. सर्व पॉलिमेरिक भाग तपासले गेले आहेत आणि प्रचंड ऊन किंवा इतर बाह्य घटकांमध्ये गाडीचा रंग जाणार नाही, तिच्या कामात अडथळे येणार नाहीत किंवा तिचे काम बंद पडणार नाही.
कायलॅकमधील १८९ मिमी ग्राऊंड क्लिअरन्समुळे चाचणीसाठी तिच्यासमोर जे काही अडथळे येतील त्या सर्वांचा सामना केला जाईल. याशिवाय कायलॅकची उत्पादनाच्या प्रक्रियेतच विविध दर्जांसाठी तपासणी केली जाते. त्यामुळे वर्गातील सर्वोत्तम सुरक्षा आणि डायनॅमिक्स निश्चित केले जातात. गाडीचे छत आणि इतर सांधे लेसर ब्लेज्ड आहेत. कायलॅकची भौतिक रचना रोबोटिज्ड आहे, चॅसिसच्या आतील मोजमाप दोन ठिकाणी करण्यात येते तर असेम्ब्ली लाइनमधील एआय कॅमेरे इंजिनच्या पृष्ठभागावरील बदल आणि असातत्यपूर्णतांची तपासणी करतात. यातील एक गरम स्टँप्ड स्टील, पुनर्निर्मित क्रॅश मॅनेजमेंट यंत्रणांमुळे कायलॅकमध्ये सर्वोत्तम सुरक्षा राहील याची काळजी घेतली जाते आणि ती या वर्गातील सर्वोत्तम आहे.