12 शहरांमधील हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी TCS इनक्विझिटिव्हचे आयोजन केले जात आहे. देशातील हुशार मनांना, मेंदूंना बौद्धिक खाद्य पुरवणे आणि त्यांचे तंत्रज्ञान कौशल्य वाढवणे हे याचे उद्दिष्ट आहे.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) (BSE: 532540, NSE: TCS) ने त्यांच्या प्रमुख वार्षिक प्रश्नमंजुषा, TCS InQuizitive च्या पुण्यात रंगलेल्या कार्यक्रमात 35 शाळांमधील 130 हून अधिक विद्यार्थ्यांचा उत्साहपूर्ण सहभाग अनुभवला. इयत्ता 8वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम खुला होता. या कार्यक्रमात शहरातील मुलांची बौद्धिक क्षमता लक्षात आली.
पुण्यातील यशवंतराव चव्हाण सभागृहात विभागीय अंतिम फेरीत प्रश्नोत्तराच्या पाच फेऱ्या रंगल्या. यात दिल्ली पब्लिक स्कूल (मोहम्मद वाडी), पुणे येथील 15 वर्षीय जिनांश शाह विजेता ठरला.
तर औरंगाबादच्या स्टेपिंग स्टोन्स हायस्कूलच्या 14 वर्षीय मोहम्मद अरीबने उपविजेतेपद पटकावले. हे दोन्ही विद्यार्थी आता राष्ट्रीय फायनलमध्ये पुण्याचे प्रतिनिधित्व करतील आणि देशभरातील अन्य 11 प्रादेशिक फेऱ्यांमधील चॅम्पियनशी स्पर्धा करतील.
सन्माननीय अतिथी डॉ. सुनील एस भागवत, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (IISER) पुणेचे संचालक आणि सचिन रत्नपारखी, VP आणि क्षेत्रीय प्रमुख, TCS पुणे यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
डॉ. सुनील एस. भागवत, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च, पुणेचे संचालक म्हणाले, “इनक्विझिटिव्ह सारख्या प्रतिभा स्पर्धा केवळ विजेत्यांना ओळखण्यासाठी नव्हे तर सर्व सहभागींना प्रेरित करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याने प्रतिभावंतांना त्यांचे कौशल्य दाखवण्यास वाव मिळतो. तसेच आपण याला प्रोत्साहन देत राहिलो, तर भारताचे भविष्य गेल्या 75 वर्षांपेक्षा अधिक उजळ होईल.”
सचिन रत्नपारखी, VP आणि क्षेत्रीय प्रमुख, TCS पुणे म्हणाले, “तरुणांच्या मनात जिज्ञासा निर्माण करण्यासाठी तसेच त्यांना सखोल विचार करण्यासाठी प्रवृत्त व्हावे यासाठी अशा इनक्विझिटिव्ह स्पर्धा विद्यार्थ्यांची प्रतिभा अनलॉक करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. टेक लर्निंगचे गेमिफाय आणि लोकशाहीकरण करून, TCS पुढच्या पिढीला नवनिर्मितीसाठी सक्षम बनवते.”
टीसीएस इनक्विझिटिव्ह हा एक नावीन्यपूर्ण शिक्षण उपक्रम आहे जो विद्यार्थ्यांमध्ये माहिती तंत्रज्ञान, विज्ञान, क्रीडा, अभियांत्रिकी आणि कला यांसारख्या क्षेत्रातील कुतूहल आणि जागरूकता वाढवण्यासाठी डिझाइन केलेला आहे. यात सहभागासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही.