दिल्ली, 16 एप्रिल २०२४ : आर्या ओम्नीटॉक या पुण्यातील कंपनीने भारतात व्यावसायिक व वाणिज्यिक रेडिओचे वितरण करण्यासाठी मोटोरोला सोल्युशन्ससोबत विशेष भागीदारी केली आहे. पुण्यात मुख्यालय असलेली आर्या ओम्नीटॉक ही अरविंद लि. आणि जेएम बाक्सी समूह या भारतातील दोन प्रतिष्ठित व्यावसायिक घराण्यांची संयुक्त कंपनी आहे.
आर्या ओम्नीटॉक या कंपनीतर्फे शेअर्ड मोबाइल रेडिओ सेवा (एसएमआर), जीपीएस-आधारित फ्लीट ट्रॅकिंग व मॅनेजमेंट सोल्यूशन्स, टोल आणि हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम (एचटीएमएस) हे तीन व्यवसाय विभाग चालविण्यात येतात. ‘मोटोरोला’सोबतच्या भागीदारीत ‘आर्या ओम्नीटॉक’तर्फे, मोटोरोला सोल्युशन्सच्या उत्पादनांच्या ‘मोटोटीआरबीओ’ या पोर्टफोलिओचे वितरण करण्यात येईल, तसेच सिम-आधारीत वेव्ह पीटीएक्स व संबंधित सेवांचे वितरण सुरू ठेवण्यात येईल.
‘आर्या ओम्नीटॉक’च्या वतीने पीएमआरटीएस (पब्लिक मोबाइल रेडिओ ट्रंकिंग सर्व्हिसेस), सीएमआरटीएस (कॅप्टिव्ह मोबाइल रेडिओ ट्रंकिंग सर्व्हिसेस) आणि ब्रॉडबँड पुश-टू-टॉक डिव्हाइसेस या सेवा पुरविण्यात येतात. अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, इंदूर, कोलकाता, भरूच, नवी मुंबई, गुडगाव, नोएडा, मुंबई, पुणे, सुरत, वडोदरा, विशाखापट्टणम, हैदराबाद, कोची आणि जयपूर अशा १८ शहरांमध्ये कामकाज करण्यासाठीचे परवाने या कंपनीकडे आहेत.
हे रेडिओ आजच्या वेगवान व्यवसाय वातावरणात कार्यरत असलेल्या संस्थांसाठी खास डिझाइन केलेले आहेत. कार्यपथकांना आपसांत झटपट व रिअल-टाईम संज्ञापन करण्यास आणि वेगवान वातावरणात एकमेकांशी समन्वय साधण्यास या रेडिओंची मदत होऊ शकते. क्रॉस-प्लॅटफॉर्म सुसंगता हे या रेडिओंचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे विविध उपकरणांवर आणि प्लॅटफॉर्म्सवर काम करण्याची त्यातून सोय होते आणि कंपनीमधील विविध विभाग व उपकरणे यांच्यात अखंड संवाद साधला जातो. वेगवेगळ्या