पुणे, मार्च २०२४ – एच अँड एम इंडिया या सर्वोत्तम फॅशन व किंमत शाश्वत पद्धतीने पुरवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या आंतरराष्ट्रीय रिटेलरने पुण्यात आपले पाचवे दालन कोपा मॉल येथे सुरू करत असल्याची घोषणा केली आहे. यामुळे एच अँड एमच्या भारतातील दालनांची संख्या ६१ वर गेली असून ही दालने तब्बल २९ राज्यांत पसरलेली आहेत.
पुण्यातील नवे दालन १३६६ चौरस मीटर जागेत वसलेले असून ते ग्राहकांना खरेदीचा असामान्य अनुभव देणारे आहे. एच अँड एमला या दालनात स्प्रिंग कलेक्शन सादर करताना आनंद होत असून ते प्रत्येक व्यक्तीला प्रेरणा देण्यासाठी व त्यांचे व्यक्तिमत्त्व आणखी उठावदार करण्यासाठी काळजीपूर्वक तयार करण्यात आले आहे. पुरुष व स्त्रियांसाठीचे कपडे ३९९ रुपयांपासून सुरू होत असून लहान मुलांच्या कपड्यांची किंमत २९९ रुपयांपासून सुरू होते. एच अँड एमने फॅशनेबल कपडे सर्वांसाठी उपलब्ध करून देण्याचे ध्येय ठेवले आहे.
स्त्रियांसाठी या कलेक्शनमध्ये आकर्षक ब्लाऊजेस, क्लासिक पेन्सिल स्कर्ट्स आणि स्टायलिश ड्रेसेसचा समावेश असून त्यांना कोणत्याही प्रसंगासाठी अनुरूप कपड्यांचे बरेच प्रकार पाहायला मिळतील. पुरुषांसाठी लिनन शर्टस, आरामदायी पुल-ऑन ट्राउजर्स, फॅशनेबल व्हरस्कर्टस आणि केव्हाही आकर्षक दिसणारे निटेड पोलोज उपलब्ध करण्यात आले आहेत. या कलेक्शनच्या मदतीने तरुणांना त्यांची अनोखी स्टाइल अगदी सहजपणे व्यक्त करता येणार आहे.
या लाँचविषयी एच अँड एम इंडियाचे देशातील विक्री व्यवस्थापक यानिरा रामिरेझ म्हणाले, ‘आमचे पाचवे दालन कोपा मॉलमध्ये सुरू करत पुण्यातील व्यवसाय विस्तार करताना आम्हाला आनंद होत आहे. ग्राहकांना केवळ कपडेच नाही, तर जीवनशैलीचा अनोखा अनुभव, शाश्वतता, दर्जा व वाजवी किंमत देण्याचे आमचे ध्येय आहे. नुकतेच लाँच झालेले स्प्रिंग कलेक्शन आधुनिक टेलरिंग आणि कालातीत डिझाइन्सपासून प्रेरणा घेऊन बनवण्यात आले आहे. पुणेकरांना या कलेक्शनच्या मदतीने या ऋतुचे वेगवेगळे रंग नव्याने अनुभवता येतील.’
कंपनीच्या शाश्वतता उपक्रमाशी सुसंगत राहात ग्राहकांना त्यांना नको असलेले, कोणत्याही ब्रँडचे, कशाही स्थितीत असलेले कपडे रिसायकलिंगसाठी देण्याचे आवाहन एच अँड एम गारमेंट कलेक्ट या उपक्रमाअंतर्गत करण्यात आले आहे.
एच अँड एम सद्य स्थितीत कोपा मॉल पुणे, फिनिक्स मॉल ऑफ द मिलेनियम, फिनिक्स मार्केट सिटी, अमनोरा मॉल आणि वेस्टएंड मॉल तसेच www.hm.com आणि Myntra.com वर उपलब्ध आहे.