गांधी भवन मधील ‘रोजा इफ्तार’ मधून सर्व धर्मीय स्नेहाचे दर्शन !

By: Editor_Manas

On: Wednesday, March 27, 2024 1:52 PM

Google News
Follow Us

पुणे : महाराष्ट्र गांधी स्मारक निधी,युवक क्रांती दल या संघटनांच्या वतीने आयोजित ‘रोझा इफ्तार ‘ कार्यक्रमातून  सर्वधर्मीय सामंजस्य आणि स्नेहाचे दर्शन घडले. बुधवार,दि.२७ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता गांधीभवन,कोथरूड येथे ‘रोजा इफ्तार’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘निर्भय बनो आंदोलन’ चे एड .असीम सरोदे,रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे,रिजनल ख्रिश्चन सोसायटीचे लुकस केदारी,इस्लाही सोशल मीडिया फाउंडेशन चे अध्यक्ष पैगंबर शेख,पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे अध्यक्ष फिरोज मुल्ला , फादर  पीटर डिक्रुझ , मौलाना इसहाक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी , सचिव संदीप बर्वे, विश्वस्त अन्वर राजन , प्रशांत कोठडीया, माजी  पोलिस अधिकारी मिलिंद गायकवाड, डॉ. प्रवीण सप्तर्षी, नीलम पंडित, प्रसाद झावरे हे देखील उपस्थित  होते.युवक क्रांती दलाचे कार्यवाह जांबुवंत मनोहर,संघटक अप्पा अनारसे,पुणे शहराध्यक्ष मुस्कान परवीन बाबासाहेब, सुदर्शन  चखाले यांनी स्वागत केले.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

August 20, 2026

August 20, 2026

August 20, 2026

August 20, 2026

August 20, 2026

August 14, 2026