23 मार्च, 2024: ‘लिव्हिंग इट लार्ज’ची भावना साजरी करत सीग्राम्स रॉयल स्टॅगने सादर केली रॉयल स्टॅग बूमबॉक्सची दुसरी आवृत्ती. हा एक आगळा संगीत महोत्सव आहे, ज्यामध्ये बॉलीवूडची लोकप्रिय गाणी आणि हिप-हॉपचा धुंद करणारा ठेका यांचा मिलाफ होतो. या सांगीतिक अनुभवाचा या वर्षातील तिसरा कार्यक्रम 23 मार्च 2024 रोजी पुण्यात सादर करण्यात आला. रॉयल स्टॅग बूमबॉक्सने एक अस्सल सांगीतिक अनुभव देण्यासाठी या क्षेत्रातील अत्यंत विरुद्ध भासणारे कलाकार धाडसाने एकत्र आणले, तेव्हा पुणे शहर दुमदुमून गेले.
सुमारे 10000 प्रेक्षक जेव्हा एकत्र आले, तेव्हा रॉयल स्टॅग बूमबॉक्सच्या तरुणाईमुळे पुणे जिवंत झाले! द मिल्स, संगमवाडी हे स्थळ चमकदार रंगांनी आणि सुरांनी झळाळून उठले. उपस्थितांनी येथे एकाच छताखाली संस्कृती, विविध माल-सामान, खाद्य पदार्थ आणि परस्पर संवादाचा आस्वाद घेतला. या प्रसंगाचे वातावरण तरुणाईने सळसळणारे होते, जे शहराच्या चैतन्यमय वृत्तीला साजेसे होते. मुख्य ॲक्ट्स व्यतिरिक्त स्थानिक बॅन्ड, डान्सर्स, रॅपर्स, बीटबॉक्सर्स यांच्या नानाविध परफॉर्मन्सेसने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. या संगीत जलशाची अधिकृत सुरुवात अली मर्चंटने मॅशअप्स सादर करून केली. त्यानंतर हिप-हॉप कलाकार डी एमसीने आपल्या हिप-हॉपच्या लयकारीने प्रेक्षकांवर गारुड केले. त्यानंतर पुढे या जलशात निखिता गांधीने आपल्या सुंदर गायनाने रंग भरले. या फेस्टिव्हलची सांगता अरमान मलिकच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या परफॉर्मन्सने झाली आणि या सुंदर आठवणी मनात घेऊन प्रेक्षक परतले.
गायक आणि गीतकार अरमान मलिक म्हणाला, “संगीत सर्व सीमारेषा ओलांडून लोकांना जवळ आणते. सलग दुसऱ्या वर्षी रॉयल स्टॅग बूमबॉक्सचा एक भाग असल्याचा मला खूप आनंद आहे. आधी इंदूरमध्ये आणि आता पुण्यात परफॉर्म करण्याचा अनुभव खूप सुंदर होता.”
गायिका निखिता गांधी म्हणाली, “रॉयल स्टॅग बूमबॉक्सच्या या पहिल्या आवृत्तीत सहभागी होताना मला खूप मजा आली आणि पुन्हा एकदा या अनोख्या प्लॅटफॉर्मशी निगडीत होताना मला खूप आनंद झाला. या महिन्याच्या आरंभी इंदूरमध्ये माझ्या चाहत्यांना भेटून मला छान वाटले आणि त्यानंतर इथे पुण्यात परफॉर्म करण्याचा अनुभव सुद्धा संस्मरणीय होता.”
हिप-हॉप कलाकार डी एमसी म्हणाली, “रॉयल स्टॅग बूमबॉक्सने हिप-हॉप आणि बॉलीवूड संगीताच्या चाहत्यांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. या दुसऱ्या आवृत्तीत या मंचाशी निगडीत होताना मला खूप आनंद होत आहे. पुण्याच्या प्रेक्षकांनी त्यांच्या उत्साहाने मला जोश दिला!”
अली मर्चंट म्हणाला, “रॉयल स्टॅग बूमबॉक्सने हिप-हॉप आणि बॉलीवूडची सांगड घालून दणक्यात पुनरागमन केले आहे. मी हा अनुभव घेण्यासाठी उत्सुक होतो आणि पुण्यातला अनुभव अद्भुत होता!” परनॉड रिकार्ड इंडियाचे CMO कार्तिक मोहिन्द्रा म्हणाले, “संगीत आणि लाईव्ह परफॉर्मन्स लोकांना एकत्र आणतात आणि उत्सवप्रिय लोकांसाठी ती एक पर्वणी असते. रॉयल स्टॅगने तरुणांच्या पॅशनचा मुख्य स्तंभ म्हणून संगीत साजरे करण्याची परंपरा चालू ठेवली आहे. या ब्रॅंडची ‘लिव्ह इट लार्ज’ भावना आणि तरूणांशी जोडण्याची वृत्ती जोपासत, रॉयल स्टॅग बूमबॉक्सची दुसरी आवृत्ती लॉन्च करताना आम्हाला आनंद होत आहे. गेल्या वर्षी या फेस्टिव्हलला जो प्रतिसाद मिळाला तो भारावून टाकणारा होता. या वर्षी या मंचाने बॉलीवूड संगीत आणि हिप-हॉपची लयबद्धता यांची सांगड घालून आणि त्याला कला आणि संस्कृतीची जोड देऊन हा अनुभव आणखी सुंदर केला आहे आणि ‘लिव्हिंग इट लार्ज’ ची भावना सार्थक केली आहे.”
रॉयल स्टॅग बूमबॉक्सच्या दुसऱ्या आवृत्तीविषयी बोलताना साऊथ एशिया, वेव्हमेकरचे सीईओ अजय गुप्ते म्हणाले, “रॉयल स्टॅग बूमबॉक्सच्या प्रवासातील सहभाग चालू ठेवताना वेव्हमेकर रोमांचित आहे. हा केवळ संगीत महोत्सव नाही, तर या ब्रॅंडच्या ‘लिव्हिंग इट लार्ज’ भावनेला सामावून होणाऱ्या सांस्कृतिक चळवळीचे ते प्रातिनिधिक स्वरूप आहे. रॉयल स्टॅग बूमबॉक्समध्ये स्वॅग, भावना आणि बॉलीवूड व हिप-हॉप मधल्या सळसळत्या मिलाफाचे अविस्मरणीय मिश्रण आहे. या पिढीमध्ये असलेली लय या उत्सवात दुमदुमताना दिसली. मागच्या आवृत्तीप्रमाणेच दुसरी आवृत्ती खूप गाजेल यात शंका नाही.”
या उत्सवाबाबत टिप्पणी करताना न्यू बिझनेस डेव्हलपमेंट अँड ब्रॅंड पार्टनरशिप्स, युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपच्या सीनियर व्हाईस प्रेसिडेंट प्रीती नय्यर म्हणाल्या, “रॉयल स्टॅग बूमबॉक्सची दुसरी आवृत्ती लॉन्च करत असताना ग्रुपM – वेव्हमेकर सोबत भागीदारी करून रॉयल स्टॅग बूमबॉक्सशी सहयोग करताना UMGB (युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप फॉर ब्रॅंडस) ला आनंद होत आहे आणि आम्ही गौरवाची भावना अनुभवत आहोत. UMG फॉर ब्रॅंड्स या नात्याने आम्ही संगीत, कलाकार आणि आमच्या भागीदारांसाठी तयार केलेल्या अनोख्या अनुभवांसह संस्कृतीला आकार देण्याबाबत वचनबद्ध आहोत. या सांगीतिक प्रवासाच्या माध्यमातून ‘मेलडी मीट्स हिप-हॉप’चे अनोखे फ्यूजन सादर करण्याचा आणि त्यातून उत्सवाचा आणि संगीताचा आनंद देऊन रसिकांसाठी एक आगळावेगळा अनुभव निर्माण करण्याचे आमचे ध्येय आहे.
गेली अनेक वर्षे या ब्रॅंडसाठी संगीत हे रसिकांना खिळवून ठेवण्यासाठी साधन ठरले आहे. रॉयल स्टॅग बूमबॉक्स बॉलीवूडची मोहकता आणि हिप-हॉपचे गली-व्हाईब हे संगीत उद्योगातील दोन अगदी वेगळे प्रकार एकत्र आणून आजच्या पिढीचे संगीत म्हणजे ‘जनरेशन लार्ज’ साकारत आहे. ही एक अशी जमात आहे, जी ट्रेंडचे अनुसरण करत नाही तर नवीन ट्रेंड निर्माण करते, एक अशी जमात जी सदैव मनाला स्पर्श करणाऱ्या अनुभवांच्या शोधात असते. या पिढीला वारशात मिळालेले बॉलीवूड संगीत आणि त्यांना भुरळ घालणारे हिप-हॉप यांचे मिश्रण करून या पिढीच्या कल्पनाशक्तीला चालना देण्याचा रॉयल स्टॅग बूमबॉक्सचा उद्देश आहे.
ही सांस्कृतिक चळवळ दोन अनोख्या, वेधक फॉरमॅटमधून अभिव्यक्त होते:
- ऑन-ग्राउंड फॉरमॅट: हा फॉरमॅट इंदूर, जयपूर आणि पुणे या भारतातील युवा-बहुल शहरांचा दौरा करेल आणि इन्स्टा लाईव्ह सेशन्स, आर्ट शोकेसेस, AR/VR इंस्टॉलेशन्स, AI आधारित चर्चा, सेल्फी बूथ वगैरेसारख्या फिजिटल सक्रियतेसह आगळेवेगळे सांगीतिक परफॉर्मन्स सादर करेल. गेल्या वर्षी, या फेस्टिव्हलमध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये मिळून 50 हजार पेक्षा जास्त लोकांनी सहभाग घेतला होता आणि 180 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यू मिळून 13 मिलियनपेक्षा जास्त संवादांची देवाणघेवाण झाली होती.
- इन-स्टुडिओ फॉरमॅट: तीन ओरिजिनल गाणी आणि हिप-हॉप म्युझिक ट्रॅक दर्शविणारी एक अनोखी सांगीतिक संकल्पना सिंगल्स आणि व्हिडिओजच्या रूपात सर्व प्लॅटफॉर्म्सवर रिलीज करण्यात येणार आहे. सीझन 1 मधल्या 4 ओरिजिनल गाण्यांना विविध OTT आणि ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवर जवळजवळ 70 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले होते. ही 4 गाणी होती- डिनो जेम्स आणि जसलीन रॉयलला दर्शविणारे ‘पहले जैसी बात नहीं’, बाली आणि निखिता गांधीचे ‘हूडी’, अमित त्रिवेदी आणि शोचीताचे ‘मोहब्बत’ आणि EPR व नीती मोहनचे ‘इम्तिहान’.
रॉयल स्टॅग बूमबॉक्सचे आगामी आकर्षण:
शहर तारीख हेडलाइनर हिप-हॉप गीत DJ
भुवनेश्वर 30 मार्च 2024 बादशाह इक्का नीती मोहन अली मर्चंट