जैसी करनी….वैसी ‘भरणे’ सुप्रिया सुळेंचा व्हिडीओ वायरल अंकिता पाटील घालतायत दत्ता भरणेंवर घणाघात

इंदापूरमध्ये आज (दि.23) महाविकास आघाडीची सभा पार पडली. या सभेतून शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नाव न घेता अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला

इंदापूरमध्ये आज (दि.23) महाविकास आघाडीची सभा पार पडली. या सभेतून शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule ) यांनी नाव न घेता अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान, सुप्रिया सुळे (Supriya Sule ) यांच्या भाषणाचा व्हिडिओ भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील () यांनी ट्वीटरवर पोस्ट केला आहे. व्हिडीओ पोस्ट करुन अंकिता पाटील (Ankita Patil) यांनी दत्तात्रय भरणेंवर हल्लाबोल केलाय. ट्वीटरवर व्हिडीओ पोस्ट करताना अंकिता पाटील यांनी जैसी करनी….वैसी “भरणे” असे कॅप्शन लिहिले आहे.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या होत्या? 

एका चॅनेलवर मी बातमी बघितली की, पवार साहेबांच्या सभेला जाऊ नका, असं लोकांना सांगितलं जात आहे. मला त्यांना सांगायचं आहे. हा इंदापूर तालुका आहे. इथे पवार साहेबांवर प्रेम करणारे लोक आहेत. ते तुमच्या फोनला घाबरणार नाहीत किंवा तुमच्या धमकीला घाबरणार नाहीत. आता तुम्ही तुमचं बघा. कारण कार्यक्रम इथे होणार नाही. करेक्ट कार्यक्रम तुमचा विधानसभेला होईल. याची चिंता तुम्ही करा.

माझ्या वडिलांचा एकेरी उल्लेख केला तर…

मित्र पक्षांचे स्थानिक पदाधिकारी माझ्या विरोधात सभा घेऊन अतिशय अर्वाच्च भाषेत टीका करत आहेत. तालुक्यामध्ये फिरु देणार नाही, अशी धमकी देत आहेत, अशी तक्रार हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली होती. अशा गुंड प्रवृत्तींच्या लोकांना वेळीच आळा घालणे आवश्यक आहे. तरी आपण या बाबत ठोस भूमिका घेऊन योग्य त्या कारवाईचे आदेश देऊन सहकार्य करावे, असं पाटील यांनी पत्रात नमूद केलं होतं. त्यानंतर काही आठवड्यांपूर्वी अंकिता पाटील यांनी त्यांच्या भाषणातून नाव न घेता दत्ता भरणे यांच्या पदाधिकाऱ्यांना इशारा दिला होता.  माझ्या वडिलांचा एकेरी उल्लेख केला तर मलाही ठाकरे शैलीत प्रत्युत्तर देता येते, असं अंकिता पाटील म्हणाल्या होत्या. त्यानंतर पुन्हा एकदा सुप्रिया सुळेंचा व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी दत्ता भरणे यांच्यावर निशाणा साधला आहे.