पुणे, २२ मार्च २०२४: धोरणात्मकदृष्ट्या एकीकृत इंटेलिजंट बिझनेस सोल्युशन्समधील विश्वसनीय इनोवेटर कोनिका मिनोल्टाने “पॉवरहाऊस” एक्झिबिशन सीरिजमधील पहिले आयोजन नुकतेच पुण्यात केले होते. “इग्निटिंग इनोवेशन्स, पॉवरिंग पॉसिबिलीटीज” ही या प्रदर्शनाची थीम होती. यामध्ये कोनिका मिनोल्टाचा सर्वसमावेशक उत्पादन पोर्टफोलिओ प्रदर्शित करण्यात आला होता. विखंडित, साईल्ड सोल्यूशन्सच्या जागी एकीकृत इकोसिस्टिम निर्माण करण्यात बिझनेस लीडर्सना मदत करणे हा पोर्टफोलिओचा उद्देश होता .
पुण्यातील हॉटेल कॉनरॅड आयोजित करण्यात आलेल्या पॉवरहाऊस प्रदर्शनात स्मार्ट वर्कप्लेस सोल्युशन्सपासून, ऑप्टिमाइज्ड प्रिंट सर्व्हिसेस आणि प्रोडक्शन प्रिंटर्सपर्यंत सर्व उत्पादन विभागांमधील कोनिका मिनोल्टाच्या सोल्युशन्सचा यामध्ये समावेश होता.
प्रदर्शनाला मिळालेल्या यशाबद्दल, कोनिका मिनोल्टा बिझनेस सोल्युशन्स इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर कात्सुहिसा असारी म्हणाले, “यशस्वी वर्कप्लेसेसमध्ये त्यांच्या मूलभूत क्षमतांना प्राधान्य दिलेले असते, जिथे ते त्यांच्या टेक्नॉलॉजी आर्किटेक्चर, डेटा वातावरण आणि ऑटोमेशन धोरणांची काळजी घेण्यासाठी बाह्य भागीदारावर अवलंबून राहू शकतात. हे भविष्य निर्माण करण्यासाठी कोनिका मिनोल्टा स्वतःच्या इंटेलिजंट बिझनेस सोल्युशन्ससह मदत करू शकते. पॉवरहाउस प्रदर्शन सीरिज सुरु करण्यामागचा हा उद्देश आहे.”