वाहतूक पोलिसांनी केली दुचाकी टो…मग चालकाने आसा धडा शिकवला की काही केले की पोलिसांना सोडून द्यावे लागले

By: Editor_Manas

On: Friday, March 22, 2024 3:16 AM

Google News
Follow Us

वाहन चालक ऐकवण्याच्या मनस्थिती नव्हता. यामुळे अखेर वाहतूक पोलिसांनी त्याची टोईंग केलेली गाडी सोडून दिली. त्याची टोईंग केलेली गाडी पोलिसांनी सोडून देताच गाडी खाली झोपलाला व्यक्ती बाहेर आला. त्यानंतर काही झालेले नाही, या पद्धतीने त्याची गाडी घेऊन घरी गेला. हा सर्व प्रकार कल्याणममध्ये घडले.

 

रस्त्यावर लावलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून अनेक वेळा कारवाई केली जाते. ही कारवाई केल्यानंतर संबंधित वाहन धारक दंड भरून आपले वाहन सोडवून घेतात. परंतु कल्याण वाहतूक पोलिसांना वेगळाच अनुभव आला. पोलिसांच्या संपूर्ण कारकिर्दीत असा आलेला हा त्यांचा पहिलाच अनुभव होता. वाहन धारकाने त्याची दुचाकी टो केल्याने संताप व्यक्त केला. भर रस्त्यात गाडी खाली झोपून गोंधळ घातला. अखेर पोलिसांनाच माघार घ्यावी लागली. त्याची दुचाकी सोडून द्यावी लागली. कल्याणच्या खडकपाडा परिसरात ही घटना घडली. या घटनेची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे.

नेमके काय झाले

कल्याणच्या खडकपाडा परिसरात नो पार्किंगमध्ये दुचाकी वाहन उभे होते. वाहतूक पोलिसांनी नेहमीप्रमाणे कारवाई सुरु केली. त्या वाहन चालकाची गाडी टोईंग केली. पोलिसांनी आपली गाडी टोईंग केल्यामुळे वाहन चालक संतप्त झाला. पोलिसांकडून गाडी सोडवण्यासाठी संतप्त चालकाने अनोखी शक्कल लढवली. तो चक्क पोलिसांच्या गाडी खालीच झोपला. तब्बल अर्धा तास तो गाडी खाली झोपून होता.

गाडी टो केल्यामुळे वाहतूक पोलिसांच्या व्हॅनखाली झोपलेला व्यक्ती पोलिसांनी गाडी देताच निघून गेला.

अखेर पोलिसांनी सोडली गाडी

आपली गाडी रोलिंग व्हॅनवरनं खाली उतरणार नसेल तर माझ्या अंगावरून ही गाडी घेऊन जा, असे सांगत चालकाने विरोध केला. वाहन चालकाचा भर रस्त्यावर हा गोंधळ सुरु होता. घटनास्थळी चांगली गर्दी निर्माण झाली होती. त्याचवेळी वाहतूक पोलिसांना गाडी पुढे काढता येत नव्हती. वाहन चालक ऐकवण्याच्या मनस्थिती नव्हता. यामुळे अखेर वाहतूक पोलिसांनी त्याची टोईंग केलेली गाडी सोडून दिली. त्याची टोईंग केलेली गाडी पोलिसांनी सोडून देताच गाडी खाली झोपलाला व्यक्ती बाहेर आला. त्यानंतर काही झालेले नाही, या पद्धतीने त्याची गाडी घेऊन घरी गेला.

 

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

September 22, 2026

September 20, 2026

September 16, 2026

September 16, 2026

September 16, 2026

September 15, 2026