पुणे, मार्च २०२४: फोनपेच्या इंडस ॲपस्टोअर, या भारतात विकसीत केलेल्या ॲप मार्केटप्लेसने लाँच केल्याच्या फक्त एक महिन्यात 1 दशलक्षपेक्षा जास्त इन्स्टॉलेशनची संख्या पार केल्याची आज घोषणा केली.इंडस ॲपस्टोअरचा जलद स्वीकार पर्यायांसाठीची बाजारपेठेची तयारी सूचित करते ज्यामुळे भारतीय डेवलपर्सच्या गरजांना प्राधान्य मिळेल आणि भारतीय प्रेक्षकांची भाषिक आणि सांस्कृतिक प्राधान्ये पूर्ण केली जातील.इंडस ॲपस्टोअरवर विविध कॅटेगरीच्या ॲपची विस्तृत श्रेणी उपलब्ध आहेत, पण सर्वात जास्त डाउनलोड केल्या जाणाऱ्या आणि लोकप्रिय कॅटेगरीच्या ॲपमध्ये फायनांस, गेम्स, सोशल, मनोरंजन, टूल्स, कम्युनिकेशन, आणि शॉपींग या कॅटेगरीचा समावेश आहे.
इंडस ॲपस्टोअरचे ४५ टक्के युजर्स टियर २ शहरांतून आहेत, जे मोठ्या महानगरांव्यतिरिक्त ॲपसाठी असलेले व्यापक अपील दर्शवते.इंडस ॲपस्टोअर हिंदी, मराठी, बंगाली, गुजराती, तेलगू आणि इतर भाषांमध्ये उपलब्ध आहे आणि लोकांचा त्यास मिळालेला उदंड प्रतिसाद स्थानिक भाषेतील ॲप अनुभवांची मागणी प्रमाणित करते आणि सर्वसमावेशकतेची भावना वाढविते.भारतीय आणि जागतिक दोन्ही प्रकारातील प्रमुख डेवलपर्स वेगाने त्यांच्या ॲप्सचे लिस्टिंग इंडस ॲपस्टोरवर करत आहेत, जे डेव्हलपर्संच्या यशासाठी त्यांच्या वचनबद्धतेस मान्यता देते.समुदायाचा स्वीकार: इंडस ॲपस्टोअरला युजरचा सकारात्मक अभिप्राय मिळाला आहे आणि ते सक्रियपणे युजरचा अभिप्राय आणि सूचनांचे स्वागत करत आहे, आणि सतत सुधारणा करण्यासाठी आपली वचनबद्धता प्रदर्शित करतात.
हा मैलाचा दगड गाठण्याबाबत बोलताना, इंडस ॲपस्टोअरचे को-फाउंडर आणि सीपीओ आकाश डोंगरे म्हणाले, “ही उल्लेखनीय कामगिरी आमच्या टीमच्या अटूट वचनबद्दतेची आणि कठोर परिश्रमाचे प्रतिबिंब आहे. डेव्हलपर आणि ग्राहक दोघांनाही उत्कृष्ट उत्पादन अनुभव देण्यासाठी आम्ही आघाडीवर राहू याची खात्री करण्यासाठी आम्ही आमचा ॲपस्टोअर अनुभवात नावीन्य आणि सुधार करणे सुरू ठेवू. ही फक्त सुरुवात आहे, आणि आम्ही भविष्यातील ॲप शोधाच्या भविष्याबाबत रोमांचित आहोत.”
इंडस ॲपस्टोअरवर दर १० दिवसांनी नवीन अपडेट्स नियोजित केली आहेत. व्हिडिओ-आधारित ॲप शोध आणि व्हॉईस सर्च यांसारखी वैशिष्ट्ये प्रक्रियेत आहेत जी युजरचा प्रवास अजून सुव्यवस्थित करण्यात मदत करतील, तसेच समृद्ध व्यापारी साधने आणि व्हिडिओ-आधारित ॲप जाहिरातीच्या संधींसारखी वर्धित विकसक साधने, एका भरभराट निर्माण करणाऱ्या अर्थव्यवस्थेस चालना देईल.
इंडस ॲपस्टोरने नोकिया आणि लावा सोबत धोरणात्मक ओईएम भागीदारी केली, आणि इतरही अनेक प्रमुख स्मार्टफोन निर्मात्यांसोबत प्रगत चर्चा सुरू आहेत. वर्षाच्या अखेरपर्यंत २५०-३०० दशलक्ष डिव्हाइसवर प्री-इन्स्टॉलेशनच्या लक्ष्यासह हे सहयोग अखंडित ॲप इन्स्टॉलेशन आणि अपडेटचे वचन देते.