आयसीआयसीआय प्रू सिग्नेचर सिक्युअर लाँच; हमीयुक्त मॅच्युरिटी लाभ, लाईफ कव्हर आणि कर-कार्यक्षम संपत्ती निर्मितीचा मेळ साधणारा उद्योग क्षेत्रातील पहिला युलिप  

By: Editor_Manas

On: Wednesday, June 10, 2026 9:43 AM

Google News
Follow Us

मुंबई, १० जून २०२६: आयसीआयसीआय प्रुडेंशियल लाईफ इन्शुरन्सने आयसीआयसीआय प्रू सिग्नेचर सिक्युअर लाँच केले आहे, जो इन-बिल्ट (अंगभूत) हमीयुक्त मॅच्युरिटी लाभासह भारतीय आयुर्विमा क्षेत्रातील पहिली युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन (युलिप) आहे.

आयसीआयसीआय प्रू सिग्नेचर सिक्युअर हा एक नॉन पार्टिसिपेटिंग लिंक्ड इंडिव्हिज्युअल सेव्हिंग्ज लाईफ इन्शुरन्स प्लॅन आहे आणि कर-कार्यक्षम हमीयुक्त लाभांचे आश्वासन शोधणाऱ्या ग्राहकांसाठी याची रचना करण्यात आली आहे. हे उत्पादन एक सोपा प्रस्ताव मांडते – एकच वेळ गुंतवणूक करा, पॉलिसीच्या मुदतीत लाईफ कव्हरद्वारे सुरक्षित राहा आणि पाच वर्षांच्या शेवटी मॅच्युरिटी लाभ मिळवा. मॅच्युरिटीवर, ग्राहकाला फंडाचे मूल्य किंवा हमीयुक्त मॅच्युरिटी लाभ यापैकी जी रक्कम जास्त असेल ती मिळते, ज्यामुळे हमीयुक्त परिणामाचे आश्वासन मिळते.

  • संपत्ती निर्मितीच्या क्षमतेसह हमीयुक्त मॅच्युरिटी लाभ देतो.
  • लाईफ कव्हरसह (जीवन विमा संरक्षण) सिंगल प्रिमियम उत्पादन.
  • कर-कार्यक्षम परतावा देण्यासाठी विशेष रचना.

उदाहरणार्थ, एकवेळच्या गुंतवणुकीचा पर्याय शोधणारा एखादा ४५ वर्षीय ग्राहक आयसीआयसीआय प्रू सिग्नेचर सिक्युअरमध्ये ५ लाख रुपयांची गुंतवणूक करू शकतो आणि पॉलिसीच्या मुदतीत लाईफ कव्हरद्वारे सुरक्षित राहू शकतो. या प्रकरणात ग्राहक ६.२५ लाख रुपयांचे लाईफ कव्हर (विमा रक्कम) निवडू शकतो आणि त्याला ७ लाख रुपयांचा हमीयुक्त मॅच्युरिटी लाभ मिळतो.

या लाँचवर भाष्य करताना आयसीआयसीआय प्रुडेंशियल लाईफ इन्शुरन्सचे चीफ प्रॉडक्ट ऑफिसर श्री. विकास गुप्‍ता म्हणाले, “हमीयुक्त परतावा शोधणारे ग्राहक पारंपारिकपणे मुदत ठेवी, बाँड्स आणि इतर हमीयुक्त-परतावा उत्पादनांसारख्या साधनांवर अवलंबून असतात. पण, ग्राहक आता अशा सोल्यूशन्सच्या शोधात आहेत, जे त्यांना हमीयुक्त परतावा आणि आर्थिक संरक्षणासोबतच कर-पश्चात अधिक चांगले परिणाम मिळवून देण्यास मदत करू शकतील. आयसीआयसीआय प्रू सिग्नेचर सिक्युअरची रचना हीच गरज पूर्ण करण्यासाठी करण्यात आली असून, एकाच प्रस्तावामध्ये युलिपचे फायदे, इन-बिल्ट हमीयुक्त मॅच्युरिटी लाभ आणि लाईफ कव्हर यांचा मेळ घालण्यात आला आहे.”

हे उत्पादन ग्राहकांना अधिक आत्मविश्वासाने त्यांच्या दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित ठेवून एकवेळची गुंतवणूक करण्यास सक्षम करते. हा प्लॅन पॉलिसीच्या संपूर्ण मुदतीत लाईफ कव्हर (जीवन विमा संरक्षण) देखील प्रदान करतो, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या प्रियजनांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यास मदत होते.”

विशेष म्हणजे, हे उत्पादन भरलेल्या सुरुवातीच्या प्रिमियमच्या १४० टक्‍क्‍यांपर्यंत हमीयुक्त मॅच्युरिटी लाभ प्रदान करते. मॅच्युरिटीवर, ग्राहकांना फंडाचे मूल्य किंवा हमीयुक्त मॅच्युरिटी लाभ यापैकी जी रक्कम जास्त असेल ती मिळते. याव्यतिरिक्त, हे उत्पादन शून्य प्रिमियम अलोकेशन चार्जेस आणि पॉलिसी अॅडमिनिस्ट्रेशन चार्जेससह येते.

आयसीआयसीआय प्रुडेंशियल लाईफ इन्शुरन्स आपल्या ग्राहकांना उत्कृष्ट मूल्य प्रदान करण्यासाठी निरंतर वचनबद्ध आहे. कंपनीने आर्थिक वर्ष २०२६ मध्ये १.१ दिवसांच्या सरासरी टर्नअराउंड टाईमसह ९९.३ टक्‍के क्लेम सेटलमेंट रेशो साध्य केला आहे, ज्‍यामधून सर्वात जास्त गरज असते तेव्हा ग्राहक आणि त्यांच्या कुटुंबांना पाठबळ देण्याची त्यांची कटिबद्धता दिसून येते.

गेल्या २५ वर्षांत, आयसीआयसीआय प्रुडेंशियल लाईफ इन्शुरन्सला पिढ्यानपिढ्या ग्राहकांची सेवा करण्याचा बहुमान मिळाला आहे. कंपनी तंत्रज्ञानाच्या नेतृत्वाखालील एक भविष्यवेधी संस्था उभारण्यावर आपले लक्ष केंद्रित ठेवून आहे, जी विचारपूर्वक जुळवून घेणे, चपळतेने काम करणे आणि विम्याची उपलब्धता वाढवून सर्व भागधारकांना दीर्घकालीन शाश्वत मूल्य प्रदान करत एक अर्थपूर्ण प्रभाव निर्माण करणे जारी ठेवेल.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

June 10, 2026

June 10, 2026

June 10, 2026

June 10, 2026

June 10, 2026

June 9, 2026