मुंबई, जून, २०२६: भारतातील एक प्रमुख जनरल इन्शुरन्स कंपनी, टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कंपनीने ‘मेडिकेअर रिझर्व्ह’ लॉन्च केले आहे. ही एक नवीन आणि आधुनिक आरोग्य विमा योजना आहे. जसजशा ग्राहकांच्या गरजा बदलतील, तसतशी ते आपली आरोग्य सुरक्षा अधिक मजबूत करू शकतील, अशा प्रकारे याची रचना करण्यात आली आहे. हा प्लॅन एका सुपर टॉप-अप स्ट्रक्चरवर आधारित आहे. याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यातील ‘वेवर ऑफ ॲग्रीगेट डिडक्टिबल’चा अनोखा फायदा. याअंतर्गत, जे पॉलिसीधारक यास पात्र असतील, ते सलग ५ वर्षे पॉलिसी चालवल्यानंतर कोणत्याही नवीन मेडिकल टेस्ट किंवा पुन्हा कागदपत्रांच्या तपासणीशिवाय, थेट एका संपूर्ण सुरक्षा देणाऱ्या आरोग्य विमा पॉलिसीमध्ये बदल करू शकतात.
यामध्ये ‘ॲग्रीगेट डिडक्टिबल’ निवडण्यासाठी ₹३ लाखांपासून ते ₹५० लाखांपर्यंत आणि एकूण विमा रक्कम निवडण्यासाठी ₹५ लाखांपासून ते ₹५ कोटींपर्यंतचे पर्याय मिळतात. ही सुविधा ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार कव्हरेज ठरवण्याची मुभा देते, जेणेकरून ते त्यांच्या आधीपासून असलेल्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आणि स्वतःच्या बजेटनुसार याची निवड करू शकतील.
- ही एक अशी आरोग्य विमा योजना आहे, जी सुपर टॉप-अप कव्हरेज देते, शिवाय पुढे जाऊन याचे रूपांतर एका संपूर्ण सुरक्षा देणाऱ्या आरोग्य विमा पॉलिसीमध्ये करण्याची लवचिकता देखील मिळते.
- ग्रुप मेडिकल कव्हर पॉलिसीधारक आणि अनिवासी भारतीयांसाठी विशेष फायदे प्रदान करते, ज्यामध्ये या टॉप-अप प्लॅनला मूळ पॉलिसीमध्ये बदलण्याचा पर्याय देखील समाविष्ट आहे.
- लवचिक कव्हरेज, ज्यामध्ये तुम्हाला ₹३ लाख ते ₹५० लाख रुपयांपर्यंतच्या ‘वेवर ऑफ ॲग्रीगेट डिडक्टिबल्स‘चा फायदा मिळतो आणि ₹५ कोटींपर्यंतची विमा रक्कम निवडता येऊ शकते.
‘मेडिकेअर रिझर्व्ह’मध्ये ‘ट्रान्सीकेअर वॉलेट’चीही सुविधा आहे. हा एक पर्यायी लाभ असून नोकरी बदलण्याच्या काळात तुम्हाला आर्थिक सुरक्षा देतो. याशिवाय, या प्लॅनमध्ये ‘पॉकेट प्रोटेक्ट’चाही समावेश आहे, जो दीर्घकाळ रुग्णालयात दाखल राहावे लागल्यास खिशाला बसणारा आर्थिक फटका किंवा खर्च सांभाळण्यास मदत करतो; तसेच रुग्णालयात दाखल असताना होणाऱ्या काही विशिष्ट गैर-वैद्यकीय खर्चांसाठी ‘कन्झ्युमेबल्स बेनिफिट’ देखील मिळतो. टाटा एआयजीच्या अंतर्गत संशोधनानुसार, पारंपारिक ग्रुप मेडिकल कव्हरेज प्लॅन्स आजच्या काळातील बदलत्या आरोग्य गरजा आणि कर्मचाऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यात अपुरे पडत आहेत. आजकाल वारंवार नोकरी बदलण्याच्या वाढत्या ट्रेंडचा विचार करता, फक्त नोकरीशी संबंधित कव्हरेजपुरते मर्यादित न राहणाऱ्या अशा आरोग्य विमा योजनांची गरज वाढण्याची अपेक्षा आहे.
ही योजना प्रामुख्याने १८ ते ५५ वर्षे वयोगटातील अशा नोकरदार प्रोफेशनल्ससाठी अत्यंत उपयुक्त आहे, जे मॅन्युफॅक्चरिंग, आयटी, टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस, स्टार्टअप्स, सेल्स आणि फील्ड ऑपरेशन्स अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांच्या कंपनीकडून मिळणाऱ्या ग्रुप मेडिकल इन्शुरन्सवर अवलंबून आहेत. काळासोबत मोठ्या कव्हरेजचा मार्ग उपलब्ध करून देत, ‘मेडिकेअर रिझर्व्ह’ लोकांना दीर्घकाळ टिकणारी आणि शाश्वत आरोग्य सुरक्षा निर्माण करण्यास मदत करते. भारतात येणाऱ्या अनिवासी भारतीयांसाठी आणि ओसीआय नागरिकांसाठी, यामध्ये अपघातामुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात दाखल व्हावे लागल्यास ₹३,००,००० पर्यंतचे ‘इमर्जन्सी हॉस्पिटलायझेशन ड्यू टू ॲक्सिडेंट कव्हर’ समाविष्ट आहे, जे देशात मुक्कामादरम्यान अचानक येणाऱ्या कोणत्याही वैद्यकीय आणीबाणीच्या विरोधात आर्थिक सुरक्षा देते.
टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कंपनीचे हेड – एजन्सी अँड हेल्थ, श्री पंकज श्रीवास्तव म्हणाले, “भारतातील आरोग्य सेवा क्षेत्र अतिशय वेगाने बदलत आहे. उपचारांचे खर्च सातत्याने वाढत आहेत आणि जीवनाच्या विविध टप्प्यांवर व्यापक आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या संरक्षणाची मागणी वाढते आहे. मेडिकेअर रिझर्व्हची रचना याच गरजा पूर्ण करण्यासाठी करण्यात आली आहे. यामध्ये सुपर टॉप-अप प्लॅनच्या परवडणाऱ्या दरांसोबत ‘वेवर ऑफ ॲग्रीगेट डिडक्टिबल‘, ‘ट्रान्सीकेअर वॉलेट‘ आणि ‘पॉकेट प्रोटेक्ट‘ यांसारखी वैशिष्ट्ये एकाच ठिकाणी मिळतात. हे फायदे आजारपण किंवा वैद्यकीय आणीबाणीच्या वेळी आणि कव्हरेजमधील गॅपच्या काळात आर्थिक मदत देतात. आरोग्य विमा अधिक लवचिक, अनुरूप आणि भविष्यासाठी सज्ज बनवण्याची आमची वचनबद्धता यामधून दिसून येते.”
‘मेडिकेअर रिझर्व्ह‘ची मुख्य वैशिष्ट्ये:
- ट्रान्सीकेअर वॉलेट – नोकरी बदलण्याच्या काळात जेव्हा कंपनीकडून मिळणारे हेल्थ कव्हरेज संपुष्टात येते, तेव्हा आर्थिक सुरक्षा देते.
- पॉकेट प्रोटेक्ट – दीर्घकाळ रुग्णालयात दाखल राहावे लागल्यास अतिरिक्त आर्थिक मदत देते, ज्यामुळे खिशातील होणारा खर्च कमी करण्यास मदत होते.
- वेवर ऑफ ॲग्रीगेट डिडक्टिबल – पॉलिसीधारकांना कोणत्याही नवीन मेडिकल टेस्ट किंवा पुन्हा कागदपत्रांच्या तपासणीशिवाय, सलग पाच वर्षे या पॉलिसीमध्ये राहिल्यानंतर थेट झिरो-डिडक्टिबल मूळ पॉलिसीमध्ये बदलण्याची सुविधा देते.
- कन्झ्युमेबल्स बेनिफिट – रुग्णालयात दाखल असताना वापरल्या जाणाऱ्या काही विशिष्ट उपभोग्य वस्तूंचा खर्च कव्हर करते, ज्यामुळे खिशातील असा खर्च कमी होण्यास मदत होते जो सामान्यतः नेहमीच्या आरोग्य विमा योजनांमध्ये कव्हर केला जात नाही.
कंपनीने २६० हून अधिक शाखा आणि १००,००० पेक्षा जास्त एजंट्सचे एक मजबूत नेटवर्क तयार केले आहे, जेथे ग्राहकांना त्यांच्या कव्हरेज बदलण्याबाबत योग्य मार्गदर्शन मिळेल. याव्यतिरिक्त, टाटा एआईजीचे १३,००० हून अधिक रुग्णालयांचे एक व्यापक नेटवर्क आहे, जेथे कोणत्याही त्रासाशिवाय कॅशलेस उपचार सुनिश्चित होतात. पोहोच आणि पायाभूत सुविधांचा हा दमदार मिलाप ही हमी देतो की, एक व्यापक आरोग्य सुरक्षा नेहमीच ग्राहकांच्या आवाक्यात राहील.





