होंडाने अखेर त्यांची पहिली पूर्ण-आकाराची इलेक्ट्रिक मोटरसायकल बाजारात आणली आहे. कंपनीने युरोपियन बाजारपेठेसाठी WN7 हा मॉडेल १७ सप्टेंबर रोजी सादर केला. होंडाचा दावा आहे की ही EV 600cc पेट्रोल बाईकइतकीच ताकदवान आहे आणि पूर्ण चार्जनंतर 130 किमीपर्यंतची रेंज देते. युरोपमध्ये या बाईकची किंमत 12,999 युरो (सुमारे ₹15.56 लाख) ठेवण्यात आली आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये होणाऱ्या EICMA शोमध्ये याची संपूर्ण माहिती जाहीर केली जाईल आणि त्यानंतर डिलिव्हरी सुरू होणार आहेत. मात्र, भारतात लाँचबाबत कंपनीने अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही. अंदाजे ₹10 ते 12 लाखांच्या दरम्यान ही बाईक भारतीय बाजारपेठेत उपलब्ध होऊ शकते.
WN7 चे डिझाइन
ही मोटरसायकल EICMA 2024 मध्ये दाखवलेल्या कॉन्सेप्टवर आधारित असून मिनिमलिस्ट व नेकेड लुकसह स्लिम आणि फ्युचरिस्टिक डिझाइनमध्ये आली आहे. बाईक तीन रंगांमध्ये मिळते – कॉपर अॅक्सेंटसह ग्लॉस ब्लॅक, मॅट ब्लॅक आणि ग्रे. तिचे वजन 217 किलो आहे.
कामगिरी आणि बॅटरी
WN7 चे दोन प्रकार उपलब्ध आहेत –
- 18 kW (24.5 HP) मोटर
- 11 kW (15 HP) मोटर
दोन्ही वॉटर-कूल्ड मोटर्स असून 100 Nm टॉर्क निर्माण करतात. CCS2 फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या फिक्स्ड लिथियम-आयन बॅटरी पॅकवर ही बाईक चालते. एका चार्जवर ती 130 किमीपर्यंतची रेंज देते. जलद चार्जरने फक्त 30 मिनिटांत 20% ते 80% चार्ज करता येते, तर 6 kVA होम चार्जर वापरून 3 तासांपेक्षा कमी वेळात बॅटरी पूर्ण चार्ज होते.
फीचर्स
- 5-इंच TFT डिस्प्ले (होंडा रोडसिंक कनेक्टिव्हिटीसह)
- नेव्हिगेशन, कॉल/एसएमएस अलर्ट आणि ईव्ही मेनू
- फुल LED लाइटिंग, ड्युअल पॉड हेडलाइट्स आणि DRL
- आरामदायी सस्पेन्शनसाठी समोर USD फोर्क्स आणि मागे मोनो-शॉक अॅब्सॉर्बर
- ब्रेकिंगसाठी समोर ड्युअल डिस्क आणि मागे सिंगल डिस्क
होंडा WN7 ही बाईक मुख्यतः “मजेदार सेगमेंट” लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. 600cc पेट्रोल बाईकच्या बरोबरीची ताकद आणि 1000cc बाईकसारखा टॉर्क ही तिची खासियत आहे.