पुणे, सप्टेंबर २०२५ : भारतातील अग्रणी आणि प्रमुख कार्यस्थळ संस्कृती सल्लागार तसेच समावेशक उपाय कंपनी असलेल्या ‘अवतार’ने, आज ‘भारतातील महिलांसाठी सर्वोत्तम कंपन्या (बीसीडब्ल्यूआय)’ यादीच्या १०व्या आवृत्तीचे निष्कर्ष जाहीर केले. हे निष्कर्ष ‘इंडिया इन्क’मध्ये समावेशकता एक महत्त्वाचा व्यावसायिक निकष म्हणून कशी रूढ झाली आहे, हे स्पष्ट करतात. या महत्त्वपूर्ण आवृत्तीत, बीसीडब्ल्यूआय यादीत १२५ कंपन्यांचा समावेश आहे. प्रथमच, नेतृत्वपदांवर महिलांचे प्रतिनिधित्व २० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे, तरीही, सर्वोत्तम कंपन्यांमधील महिलांचे एकूण प्रतिनिधित्व ३५.७ टक्के वर स्थिर आहे. ‘प्रोफेशनल सर्व्हिसेस’ क्षेत्रात महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण ४४.६ टक्के असून, त्यानंतर आयटीईएसमध्ये ४१.७ टक्के महिला आहेत. फार्मा क्षेत्रात २५ टक्के , एफएमसीजीमध्ये २३ टक्के आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये १२ टक्के महिला त्यांच्या समावेशकतेचे प्रयत्न अधिक तीव्र करत आहेत.
- फार्मा क्षेत्रात नेतृत्वपदांवर महिलांचे प्रमाण सर्वाधिक आहे–या क्षेत्रात कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह पदांवर२४.८ टक्के महिला कार्यरत असून, त्यानंतर जीसीसीमध्ये २२ टक्के महिला नेतृत्व पातळीवर आहेत.
- महिला आणि पुरुषांचे नोकरी सोडण्याचे प्रमाण(अॅट्रिशन रेट)२० टक्के इतके समान आहे; उत्तम नोकरीच्या संधी हेच महिला व पुरुष दोघांच्याही नोकरी सोडण्यामागचे पहिले कारण ठरले आहे.
- आरोग्य/कल्याणाशी संबंधित आव्हाने हे महिलांच्या नोकरी सोडण्यामागचे एक प्रमुख कारण म्हणून पुढे आले आहे;बालसंगोपनाच्या जबाबदाऱ्यांपेक्षाही हे अधिक महत्त्वाचे ठरले आहे.
- ‘सर्वात समावेशक कंपन्या निर्देशांक (एमआयसीआय)’ मध्ये समाविष्ट असलेल्या १०० टक्केकंपन्या आता दिव्यांग व्यक्तींवर(पीडब्ल्यूडी) लक्ष केंद्रित करत आहेत, जे २०१९ मधील ५८ टक्के वरून वाढले आहे.
- ‘पर्यावरण,शाश्वतता आणि प्रशासनसाठी सर्वोत्तम कंपन्या’(बीसीईएसजी) च्या पहिल्या आवृत्तीनुसार, ऊर्जा कार्यक्षमता (९० टक्के कंपन्या) आणि सौर ऊर्जा वापर (८० टक्के कंपन्या) ही सर्वात प्रचलित शाश्वतता धोरणे आहेत.
या अभ्यासातून. महिला आणि पुरुषांनी नोकरी सोडण्याची कारणेही तपासण्यात आली. बेस्ट कंपन्यांमध्ये महिला आणि पुरुषांच्या नोकरी सोडण्याचे प्रमाण सर्व स्तरांवर सुमारे २० टक्के सारखेच असले, तरी महिला आणि पुरुष दोघांनीही त्यांच्या संस्था सोडण्याचे पहिले कारण म्हणजे चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध होणे हे आहे. आरोग्य/कल्याण संबंधित आव्हाने महिलांना कामाच्या ठिकाणाहून बाहेर पडण्याचे आणखी एक प्रमुख कारण म्हणून उदयास आले आहे, अगदी बाल संगोपन जबाबदाऱ्यांपेक्षाही अधिक.
त्याच्या १०व्या आवृत्तीमध्ये, (बीसीडब्ल्यूआय) ला भारतातील विविध उद्योग, प्रदेश आणि क्षेत्रांमधील संस्थांकडून ३६५ अर्ज प्राप्त झाले, त्यापैकी ऑटोमोटिव्ह, बीएफएसआय , रसायन, समूह, ग्राहक उत्पादने, ई-कॉमर्स, ग्लोबल कॅपॅबिलिटीज सेंटर (जीसीसी), हॉस्पिटॅलिटी, हेल्थ केअर, आयटी , आयटीईएस , लॉजिस्टिक्स आणि व्यवस्थापन सल्ला, उत्पादन, मीडिया, फार्मास्युटिकल, व्यावसायिक सेवा, महसूल चक्र व्यवस्थापन, रिअल इस्टेट, रिटेल आणि अपॅरल, आणि विज्ञान व अभियांत्रिकी, दूरसंचार आणि उपयोगिता यांसारख्या विविध उद्योगांमधील कंपन्यांनी सर्वोत्तम कंपन्यांच्या यादीत स्थान मिळवले.
२०२५ च्या अवतार आणि सेरामाउंट टॉप १० बेस्ट कंपन्या फॉर वुमन इन इंडिया, वर्णक्रमानुसार सूचीबद्ध केलेल्या, खालीलप्रमाणे आहेत: एक्सेंचर सोल्युशन्स प्रा. लि,एक्सा एक्सएल इंडिया बिझनेस सर्व्हिसेस प्रा. लि, केर्न ऑइल अँड गॅस वेदांता लि.,ईवाय,केपीएमजी इन इंडिया, मास्टरकार्ड इन्कॉर्पोरेशन ,ऑप्टम ग्लोबल सोल्युशन्स (इंडिया) प्रा. लि,प्रॉक्टर अँड गॅम्बल इंडिया,टेक महिंद्रा लिमिटेड आणि विप्रो लिमिटेड.
अवतारने त्याच्या वार्षिक निर्देशांकाची सातवी आवृत्ती- सर्वाधिक समावेशी कंपनी निर्देशांक ( एमआयसीआय) देखील प्रसिद्ध केली, जो अपंग व्यक्ती (पीडब्ल्यूडी), एलजीबीटीक्यू +, पिढ्या आणि सांस्कृतिक विविधता यांसारख्या विविधतेच्या पैलूंना समाविष्ट करण्यासाठी संस्थांच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकतो. २०१९ मध्ये अपंग व्यक्तींवर (पीडब्ल्यूडीएस ) लक्ष केंद्रित करणाऱ्या ५८ टक्के कंपन्यांमधून, यावर्षी, याच गोष्टींवर लक्ष केंद्रित करणाऱ्या कंपन्यांचे प्रमाण प्रचंड वाढले असून ते १०० टक्के पर्यंत पोहोचले आहे. एमआयसीआय मध्ये समाविष्ट असलेल्या कंपन्यांमध्ये एकूण ९६८७ दिव्यांग व्यक्ती काम करतात. एलजीबीटीक्यू + समावेशनालाही मोठ्या प्रमाणावर स्वीकृती मिळाली आहे – २०१९ मध्ये एलजी बीटीक्यू + वर लक्ष केंद्रित करणाऱ्या कंपन्यांची संख्या २३ टक्के होती, ती यावर्षी ९५ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. २०२५ मधील अवतार आणि सेरामाउंट चॅम्पियन्स ऑफ इन्क्लूजन, वर्णक्रमानुसार खालीलप्रमाणे आहेत: ॲक्सेंचर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, ॲलियांझ सर्विसेस इंडिया, एएक्सए एक्सएल इंडिया बिझनेस सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड, एनकोर कॅपिटल ग्रुप इंक, ईवाय, आयबीएम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, केपीएमजी इन इंडिया, मास्टरकार्ड इनकॉर्पोरेशन, ओमेगा हेल्थकेअर मॅनेजमेंट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि यू.एस.टी.
पहिल्यांदाच, अवतारने टॉप १० बेस्ट कंपन्या फॉर ई.एस.जी. (पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासन) देखील जाहीर केल्या. बी.सी.ई.एस.जी. फ्रेमवर्क कंपन्यांचे ई.एस.जी.च्या तीन तत्त्वांवर मूल्यांकन करते – पर्यावरणाची काळजी, सामाजिक जबाबदारी आणि प्रशासकीय उत्कृष्ट्ता. या अभ्यासातून असे दिसून आले की ऊर्जा कार्यक्षमता (९० टक्के कंपन्या) आणि सौर ऊर्जा वापर (८० टक्के कंपन्या) या सर्वात प्रचलित शाश्वतता धोरणे आहेत, तर जलविद्युत आणि पवन ऊर्जा पायाभूत सुविधा आणि भौगोलिक मर्यादांमुळे कमी वापरल्या जातात. १०० टक्के कंपन्यांकडे व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्यासाठी अधिकृत धोरण आहे, तर ९० टक्के कंपन्या त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना ई.एस.जी. संबंधित प्रशिक्षण देतात. २०२५ मधील अवतार आणि सेरामाउंट टॉप १० बेस्ट कंपन्या फॉर ई.एस.जी., वर्णक्रमानुसार खालीलप्रमाणे आहेत: सी.जी.आय., ईटन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड, ईपॅम सिस्टिम्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, जी.आर.पी. लिमिटेड, इन्फोसिस लिमिटेड, लिअर कॉर्पोरेशन, सोलॅनिस केमिकल्स, टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड, यू.एस.टी. आणि विप्रो लिमिटेड.
डॉ. सौंदर्या राजेश – संस्थापक, अध्यक्ष, अवतार, यांनी या यशामुळे आनंद व्यक्त केला. प्रगती व्यक्त करत त्या म्हणाल्या, “समावेशकता आणि आपलेपणा हेतू व केंद्रित कृतीतून प्रत्यक्षात आणणाऱ्या आपल्या सर्व विजेत्यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करते! त्याचे परिणाम आपल्यासमोर आहेत – २०१६ मध्ये सरासरी २५ टक्के असलेल्या महिलांच्या प्रतिनिधित्वावरून, या वर्षी सर्वोत्कृष्ट कंपन्यांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व एकत्रितपणे ३५.७ टक्के पर्यंत वाढले आहे. सी-सूट नेतृत्वातील महिलांचे प्रमाण २०१६ मधील १३ टक्के वरून या वर्षी २० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे, जे प्रशंसनीय आहे. खरोखरच उत्साहवर्धक बाब म्हणजे हे प्रयत्न केवळ बहुराष्ट्रीय कंपन्यांपर्यंत मर्यादित नाहीत – सर्वोत्कृष्ट कंपन्यांच्या यादीत समाविष्ट भारतीय कंपन्यांचा वाटा २०२१ मधील २५ टक्यांवरून वरून या वर्षी ४० टक्यांपर्यंत वाढला आहे.”
“सर्वात समावेशक कंपन्या निर्देशांकाबद्दल मला प्रेरणा देणारी गोष्ट म्हणजे तो घडवून आणणारा खरा बदल – जो भारतातील संस्थांना अडथळे दूर करण्यास, विचारपूर्वक उपाययोजना तयार करण्यास आणि कमी प्रतिनिधित्व असलेल्या प्रतिभावंतांसाठी नवीन संधी उघडण्यास मदत करतो,” असे सेरामाउंटच्या अध्यक्षा शुभा बेरी म्हणाल्या. “ही ओळख त्या नेत्यांची तळमळ आणि वचनबद्धता दर्शवते, जे अशी कार्यस्थळे तयार करत आहेत जिथे महिला, एलजीबीटीक्यू+ कर्मचारी, दिव्यांग व्यक्ती आणि विविध पिढ्यांमधील प्रतिभावान व्यक्तींना महत्त्व दिले जाते आणि ते खऱ्या अर्थाने यशस्वी होऊ शकतात.”