---Advertisement---

‘टाय वुमन ग्लोबल पिच कॉम्पिटिशन २०२५’ ही स्पर्धा पुण्यात आयोजित

By: Editor_Manas

On: Sunday, September 28, 2025 11:41 AM

Google News
Follow Us
---Advertisement---

पुणे, २५  सप्टेंबर २०२५: टाय वुमन ग्लोबल पिच कॉम्पिटिशन २०२५ ही स्पर्धा नुकतीच पुण्यात आयोजित करण्यात आली या विभागातील महिला- उद्योजिका असलेल्या अनेक स्टार्ट-अप कंपन्या या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रांमधील उद्योग एकत्र आल्याने, महिला उद्योजिकांमधील कल्पकता आणि स्थितीस्थापकत्वाची एक झलक बघायला मिळाली. कोणताही वेळ न दवडता सांकेतिक भाषेला बोलीभाषेमध्ये रूपांतरीत करून मुकबधीर व्यक्तिंना सहज संपर्क साधता यावा म्हणून एआयवर आधारीत साधने प्रदान करणारी कंपनी, ग्लोवॅट्रिक्स, ने पुण्यामधून टाय वुमन ग्लोबल पिच कॉम्पिटिशन २०२५ चा अंतिम फ़ेरीत प्रवेश केला आहे.

हा कार्यक्रम सिलिकॉन वॅलीमधील स्टार्ट-अप इन्क्युबेटर आणि विना नफ़ा सं स्था असलेल्या टाय ग्लोबलचा एक भाग असून उद्योजकता वाढविण्याचा त्यांचा हेतू आहे. या संस्थेचे भारतात मोठ्या प्रमाणात काम असून देशभरात सुमारे ३० विभागातून त्यांचे काम चालते.

ग्लोवॅट्रिक्सचा सह संस्थापिका आणि सीईओ, ऐश्वर्या कर्नाटकी, यांना पुण्यातील अंतिम फ़ेरीत पारितोषिक मिळाले असून त्या टाय पुणे विभागाचे प्रतिनिधीत्व टाय ग्लोबल समिटमध्ये करतील, जे जानेवारी २०२६ मध्ये जयपूर येथे पडणार आहे , तिथे जगभरातील विविध विभागांमधील विजेते एकमेकांशी स्पर्धा करतील. जागतिक स्तरावरील या अंतिम सामन्यामध्ये जिंकणाऱ्या स्पर्धकास इक्विटी मुक्त अमेरिकन डॉलरमध्ये ५०,००० डॉलर एवढी रक्कम मिळणार असून, त्याचा उपयोग त्यांना आपला उद्योग अधिक चांगला विकसित करून प्रगती पथावर नेण्याकरता करता येणार आहे.

यावेळी बोलताना, टाय वुमन प्रोग्रामचा अध्यक्षा, पारूल गंजू म्हणाल्या, “ टाय मध्ये आमची संपूर्ण बांधिलकी ही महिला उद्योजिकांचे प्रोत्साहन करण्याप्रती असून त्यांना यशस्वी होण्याकरिता समान संधी मिळाव्या याची हमी देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. द टाय वुमन ग्लोबल पिच कॉम्पिटिशन ही कल्पनांची एक खाण असणार आहे. हे एक असे व्यासपिठ असेल जिथे नेतृत्व करणाऱ्या संस्थापिकांचा, स्त्रोत आणि जागतिक नेटवर्क्सची उपलब्धी असेल. पुण्यातील अंतिम फ़ेरीमध्ये दाखविण्यात आलेले ध्येय वेड आणि कलात्मकता ही महिला उद्योजिकांमधील कल्पकतेचे प्रतिनिधीत्वं करते. आम्हाला खात्री आहे की या उद्योजिका अशा प्रकारे काम करत अडथळे पार करून जागतिक व्यासपिठावर देखील चमकतील.”

स्पर्धेचे परिक्षण करणाऱ्या परिक्षकांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये नेतृत्व करणाऱ्या मंडळींचा समावेश होता, ज्यामध्ये ए.जी डायग्नोस्टिक्स प्रा.लि.चा महासंचालिका डॉ. अवंती गोळविलकर-मेहंदळे; वेन्चर सेंटरचे संस्थापक आणि संचालक डॉ. प्रेमनाथ वेणूगोपालन; लावणी वेन्चर्सचे सह संस्थापक आणि भागीदार असलेले संजय कान्विंदे; आणि कोलोसा वेन्चर्सच्या सह-संस्थापिका वंदना राजाध्यक्षा यांचा समावेश होता.

For Feedback - feedback@example.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 9, 2026

PMC BIG NEWS

March 9, 2026

March 9, 2026

iQOO Z11x

March 9, 2026

March 9, 2026

March 9, 2026