---Advertisement---

भारतीय महिला ‘न दिसणाऱ्या हृदय संकटाकडे’ दुर्लक्ष करत आहेत का?

By: Editor_Manas

On: Sunday, September 28, 2025 8:24 AM

Google News
Follow Us
---Advertisement---

पुणे, सप्टेंबर २०२५ : हृदयविकार हा भारतीय महिलांमधील मृत्यूचे प्रमुख कारण म्हणून समोर येत आहे. जवळजवळ १७ टक्के महिलांच्या मृत्यूला तो जबाबदार ठरत आहे; तरीसुद्धा भारतीय महिलांमध्ये याबाबतचा धोका ओळखण्याची जागरूकता मात्र अत्यंत कमी असून हे धक्कादायक आहे.

आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलमधील हृदयरोग तज्ज्ञांच्या माहितीनुसार महिलांमधील संप्रेरकांमधील (हार्मोनल) बदल, चुकीच्या जीवनशैलीचा अवलंब आणि वेळेवर तपासण्याचा अभाव या कारणांमुळे भारतीय महिला अधिकाधिक हृदयविकारांना बळी पडताना दिसून येत आहेत.

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (NFHS-5) नुसार, १५ ते ४९ वयोगटातील जवळपास पाच पैकी एक महिला निदान न झालेल्या उच्च रक्तदाबाने त्रस्त आहे. हा उच्च रक्तदाब हृदयविकाराचा धक्का आणि पक्षाघात यासारख्या मोठ्या जोखमीचा घटकांना कारणीभूत ठरत आहे. पुरुषांच्या तुलनेत, महिलांना हृदयविकाराची अनेकदा वेगळी लक्षणे दिसतात. यामध्ये थकवा, मळमळ, धाप किंवा दम लागणे, जबड्यातील वेदना किंवा पाठदुखी ही आहेत. वरवर पाहता ही लक्षणे साधी आहेत. म्ह्णून या लक्षणांमुळे त्याचे निदान व उपचार उशिरा होतात.

आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. अन्नपूर्णा कालिया म्हणाले “गर्भधारणाहीमहिलांच्याहृदयाच्याआरोग्याबाबतआणखीगुंतागुंतनिर्माणकरते. गर्भधारणेच्याशेवटच्याटप्प्यातरक्तदाबवाढल्यासत्यांनाझटकेयेऊशकतातकिंवातेजीवावरबेतूनमातामृत्यूहीहोऊशकतो. जवळपास३०टक्केमहिलाप्रसूतीनंतरहीउच्चरक्तदाबानेत्रस्तअसतात. ज्यामुळेत्यांनादीर्घकालीनहृदयविकाराचाधोकानिर्माणहोतो. गर्भधारणेमुळेआलेलाउच्चरक्तदाबहाफक्ततात्पुरतात्रासनसूनतोअनेकवर्षेहृदयाच्याआरोग्यावरपरिणामकरतो. म्हणूनच गर्भधारणा काळात आणि नंतरही योग्य तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.”

आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलचे वरिष्ठ संचालक डॉ. राजीव सेठी म्हणाले “बैठीजीवनशैली,  कामाचे जास्त तास, प्रक्रिया केलेले अन्न याचे सेवन, धूम्रपान आणि अनियमित आहार या गोष्टी महिलांमध्ये हृदयविकाराचे संकट अधिक तीव्र करत आहेत. आता ३० आणि ४० वर्षांच्या महिलांमध्ये हृदयविकाराचा झटका व पक्षाघात दिसून येतो आहे, हे प्रमाण दोन दशकांपूर्वी दिसायचे नाही.”

पुरुषांच्या  तुलनेत महिलांची हृदयविकाराबाबतची लक्षणे सूक्ष्म स्वरूपात आणि ओळखायला कठीण असल्याने त्यांचे निदान व उपचार करण्यात विलंब होतो. हा लिंगभेद महिलांच्या जीवावर बेततो आहे.

याबाबत आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलचे सहयोगी संचालक डॉ. राजेश बदानी म्हणाले “सोपेप्रतिबंधात्मकउपायजसेकीनियमितरक्तदाबतपासणी, कोलेस्टेरॉल तपासणी व वेळेवर इतर तपासण्या हे महिलांमधील हृदयविकाराचा धोका लवकर ओळखण्यात मदत करतात.”

डॉक्टरांना तरुण स्त्रियांमध्येही चिंताजनक शारीरिक घटक व सवयी दिसत आहेत. चारपैकी एका महिला रुग्णामध्ये जीवनसत्त्व ‘बी १२’ ची कमतरता व जास्त होमोसिस्टीन पातळी दिसते. शरीरातील अमीनो ऍसिड हे होमोसिस्टीनचे प्रमाण वाढवते. ते सामान्यतः रक्तामध्ये आढळते. हे प्रमाण जास्त असल्यास हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आजार, हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघात होण्याचा धोका वाढू शकतो. तर कोलेस्टेरॉल (शरीरातील चरबीयुक्त पदार्थ) असमतोलामुळे जवळपास ६० टक्के हृदयविकार होतात. त्याच वेळी तात्काळ ( क्विक-फिक्स) वजन घटवणे, फॅट बर्नर गोळ्या, अतिशय कठोर डायट (आहार) आणि अति व्यायाम हे हृदयावर ताण आणतात.

तज्ज्ञांच्या मते, महिलांच्या हृदयविकाराशी संबंधित ८० टक्के मृत्यू टाळता येण्यासारखे असतात. यासाठी जागरूकता, वेळेवर तपासण्या, औषधे आणि नियमित सल्लामसलत तपासण्या आवश्यक आहे. तसेच दररोज ८ ते १२ हजार पावले चालणे, संतुलित आहार घेणे व तणावावर नियंत्रण ठेवणे हे अधिक प्रभावी उपाययोजना ठरते. प्रतिबंधासाठी अगदी किशोरवयापासून तपासण्या सुरू कराव्यात आणि वयाच्या तिशी पर्यंत दर दोन वर्षांनी संपूर्ण आरोग्य तपासणी करावी, अशी शिफारस डॉ. सेठी यांनी केली.

हे साधे पण प्रभावी उपाय हृदयविकारचे आजार सुरवातीच्या टप्प्यात ओळखू शकतात, गुंतागुंत टाळू शकतात आणि आपत्कालीन उपचारांची गरजही कमी करू शकतात. सध्या याबाबतची महिलांमधील जागरूकता कमी असून ही बाब चिंताजनक आहे. फक्त १७ टक्के शहरी महिलांना त्यांच्या हृदयाच्या आरोग्याबद्दल योग्य माहिती आहे. जवळपास निम्म्या महिलांना उच्च रक्तदाबाची जाणीव गुंतागुंत झाल्यानंतरच होते.

डॉ. राजेश बदानी  म्हणाले “महिलांनीहृदयाच्याआरोग्यालाप्राधान्यद्यायलाहवेआणिअगदीकिरकोळलक्षणांनाहीदुर्लक्षकरूनये.”

भारतामध्ये तरुण पिढीत जीवनशैलीसंबंधी वाढते आजार लक्षात घेता डॉक्टरांनी जण जागरूकता मोहीम, आरोग्य शिबिरे आणि महिलांसाठी तपासणीची सुविधा वाढवण्याचे आवाहन केले आहे.

तज्ज्ञांचे मते पुढील दशक केवळ उपचारांवरच नाही तर शिक्षण, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि महिलांना आरोग्याबद्दल सक्षम करण्यावर केंद्रित असायला हवे. कारण हृदयविकाराविरुद्धची लढाई घरापासूनच सुरू होते, ती नियमित तपासणी, संतुलित आहार आणि योग्य जीवनशैलीची निवड अधोरेखित करते.

For Feedback - feedback@example.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 9, 2026

PMC BIG NEWS

March 9, 2026

March 9, 2026

iQOO Z11x

March 9, 2026

March 9, 2026

March 9, 2026