पुणे,15 सप्टेंबर 2025 : फिक्की तर्फे आयोजित टॅग 2025 या वार्षिक वस्त्रोद्योग परिषदेत फिक्की – वझीर ॲडव्हायझर्स टेक्स्टाईल रिपोर्टचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले.
संजय सावकारे म्हणाले की,महाराष्ट्र राज्य आपल्या धोरणात्मक उपाययोजनांद्वारे देशांतर्गत व परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यावर तसेच कौशल्य विकास,संशोधन व विकास,पायाभूत सुविधांचा विकास यावर लक्ष केंद्रित करून जागतिक स्तरावरील स्पर्धात्मक वस्त्रोद्योग निर्माण होईल या दिशेने प्रयत्न करीत आहे.ते म्हणाले की,प्रत्येक महसूल विभागात प्रत्येक एक असे सहा टेक्निकल टेक्स्टाईल पार्कस् स्थापन करण्याच्या दिशेने राज्य काम करीत असून महाराष्ट्राला टेक्निकल टेक्स्टाईल्सचे मुख्य केंद्र बनवण्याचे उद्दिष्ट आहे.