एसएसआय मंत्राम ‘मेड-इन-इंडिया’ सर्जिकल रोबोट महाराष्ट्र यात्रेला पुण्यातून सुरुवात

पुणे, सप्टेंबर: राजस्थान व मध्य प्रदेशात यशस्वी प्रात्यक्षिकांनंतर, एसएसआयआय मंत्राम ‘मेड-इन-इंडिया’ सर्जिकल रोबोट यात्रा महाराष्ट्रात सुरू झाली असून, पुण्यातील पिंपळे सौदागर येथील क्लाउड ९ हॉस्पिटलमध्ये सर्जिकल रोबोटचे यशस्वी प्रात्यक्षिक दाखवले. 

कार्यक्रमाची सुरुवात हॅण्ड्स-ऑन वर्कशॉप ने झाली, ज्याचे नेतृत्व डॉ. बिजेंद्र सिन्हा (लॅप्रोस्कोपिक, जनरल व बॅरिॲट्रिक सर्जन, क्लाउड ९, दिल्ली) व डॉ. के.एस. हरिनाथ (गायनॅकोलॉजिस्ट व लॅप्रोस्कोपिक सर्जन, क्लाउड ९, बेंगळुरू) यांनी केले. या वर्कशॉपमध्ये डॉक्टर व सर्जनना मंत्रा ३ सर्जिकल रोबोटिक प्लॅटफॉर्म चा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. सहभागींनी या प्रणालीच्या प्रगत वैशिष्ट्यांचा अभ्यास केला आणि रोबोटिक सहाय्य कशा प्रकारे शस्त्रक्रियेत अधिक अचूकता, सुरक्षितता व सुलभता आणते याचा सखोल अनुभव घेतला.

वर्कशॉपनंतर एसएसआयआयने कॉर्पोरेट प्रेझेंटेशन सादर केले, ज्यामध्ये ‘मेड-इन-इंडिया’ मंत्रा ३ प्रणाली रोबोटिक शस्त्रक्रिया अधिक किफायतशीर, सुलभ आणि प्रगत कशी बनवते यावर प्रकाश टाकण्यात आला. क्लाउड ९ हॉस्पिटल, पुणे येथील यशस्वी प्रात्यक्षिकानंतर एसएसआयआय मंत्राम यात्रा मणिपाल हॉस्पिटल, पुणे येथे पोहोचली. या टप्प्यात एसएसआयआयने कंटिन्यूइंग मेडिकल एज्युकेशन (CME) कार्यक्रम आयोजित केला, ज्यामध्ये “बेहतर शस्त्रक्रियेसाठी रोबोटिक तंत्रज्ञान” या विषयावर पॅनल चर्चा झाली. यात एसएसआय मंत्रा ३.० सर्जिकल रोबोट कशा प्रकारे आरोग्यसेवेला नव्या परिभाषेत आणतो, याविषयी माहिती देण्यात आली.

“मंत्राम यात्रा म्हणजे भारतातील आरोग्य व्यावसायिकांपर्यंत नवोन्मेष पोहोचवण्याचा ध्यास आहे,” असे डॉ. विश्व श्रीवास्तव, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी – एपीएसी, एसएस इनोव्हेशन्स इंटरनॅशनल यांनी सांगितले. “प्रत्येक थांब्यावर आम्ही केवळ अत्याधुनिक रोबोटिक शस्त्रक्रिया तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक दाखवत नाही, तर डॉक्टरांना हे तंत्रज्ञान त्यांच्या रुग्णांच्या उपचारात कसे क्रांतिकारक बदल घडवू शकते याचा प्रत्यक्ष अनुभव देत आहोत.”

या कार्यक्रमात सर्जन, वैद्यकीय विद्यार्थी व हॉस्पिटल कर्मचारी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. त्यांनी लाईव्ह डेमोन्स्ट्रेशन, संवाद सत्रे आणि भारतातील रोबोटिक शस्त्रक्रियेच्या भविष्यासंदर्भात चर्चा केली. पुण्यानंतर मंत्राम यात्रा मुंबईकडे रवाना होत असून, पुढील प्रात्यक्षिक एमजीएम हॉस्पिटल, कामोठे, पनवेल, नवी मुंबई येथे होणार आहे.

महाराष्ट्र हे प्रगत वैद्यकीय संस्थांचे केंद्र असून, येथे या यात्रेची सुरुवात हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. पुढील काही दिवसांत मंत्राम युनिट राज्यातील आघाडीच्या हॉस्पिटल्स व शैक्षणिक संस्थांमध्ये जाऊन जागतिक दर्जाच्या, स्वदेशी नवकल्पनेद्वारे शस्त्रक्रियेला नवी दिशा देण्याच्या ध्येयासोबत पुढे जाईल. आपल्या प्रवासादरम्यान मंत्राम १०००+ किमी अंतर पार करेल, ५०० हून अधिक आरोग्य व्यावसायिकांशी संवाद साधेल आणि रोबोटिक शस्त्रक्रियेसंबंधी सखोल प्रशिक्षण देईल.