पुणे, 12 सप्टेंबर 2025: गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपचा विविधता आणि सर्वसमावेशन उपक्रम गोदरेज DEI लॅबने आज इंडिया इन्क्लूडेड ऑन कॅम्पस या केस स्टडी चॅलेंजचा दुसरा टप्पा सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट पुणे (SIBM पुणे)येथे आयोजित केला. या उपक्रमाद्वारे, गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपचे उद्दिष्ट आघाडीच्या बी-स्कूलमधील विद्यार्थ्यांना विविधता (Diversity), समता (Equity) आणि सर्वसमावेशन (Inclusion – DEI) याभोवतीच्या वास्तव आव्हानांना सामोरे जाण्यास तयार करणे आणि DEI तत्वाने चालणाऱ्या भविष्यातील नेत्यांना ओळख देणे आहे.
इंडिया इन्क्लूडेड ऑन कॅम्पस उपक्रम कार्यशक्तीमध्ये अधिकाधिक महिलांची भरती करणे आणि त्या कायमस्वरूपी राहतील या दृष्टीने प्रयत्न करणे या कॉर्पोरेट भारतातील सर्वात तातडीच्या प्राधान्यक्रमांपैकी एकावर लक्ष केंद्रित करतो. कार्यस्थळ अधिक संतुलित आणि समावेशक होण्यासाठी केस स्टडी चॅलेंजद्वारे विद्यार्थ्यांकडून सखोल संशोधन करण्याची आणि महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी नाविन्यपूर्ण आणि अंमलात आणता येण्याजोगी धोरणे सुचवण्याची अपेक्षा आहे.
या उपक्रमाबद्दल बोलताना गोदरेज DEI लॅबचे प्रमुख आणि Queeristan चे लेखक परमेश शहानी म्हणाले, “भारताची खऱ्या अर्थाने प्रगती होण्यासाठी सर्वसमावेशन हे केवळ ‘असले तर चांगले’ या दृष्टीकोनापुरते मर्यादित न राहता विकास आणि नाविन्यपूर्णतेचे मुख्य साधन म्हणून ओळखले गेले पाहिजे. या सत्राद्वारे, आम्ही SIBM पुणेच्या विद्यार्थ्यांना कार्यस्थळे महिलांना कशी भरती करू शकतात, कामावर टिकवून ठेऊ शकतात आणि सक्षम करू शकतात याबाबत धाडसी विचार करायला प्रवृत्त करत आहोत. उद्दिष्ट फक्त आजच्या आव्हानांचे निराकरण करणे नाही तर अशा नेत्यांची पिढी घडवणे आहे ज्यांच्यासाठी समावेशन हे नेतृत्वाचा अविभाज्य आहे.”
ही स्पर्धा या आठवड्याच्या सुरुवातीला IIM त्रिची येथे सुरू झाली होती आणि आज SIBM पुणे येथे आयोजित करण्यात आली. यानंतर ती IIM मुंबई आणि IIM लखनौ येथे होणार आहे. अंतिम फेरीत पोहोचलेले अग्रणी चार संघ आपले सादरीकरण गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपच्या वरिष्ठ नेत्यांच्या पॅनेलसमोर 8 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबई मुख्यालयात मांडतील. विजेत्या संघाला 100,000 रु. चे रोख बक्षीस आणि ग्रुपकडून मेंटरशिपची संधी दिली जाईल.
गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपच्या अंतर्गत आणि बाहेर दोन्हीकडे सर्वसमावेशक परिसंस्था सक्षम करण्याच्या आपल्या तत्वाशी सुसंगत राहून या उपक्रमाद्वारे गोदरेज DEI लॅबचे उद्दिष्ट भविष्यातील नेत्यांच्या निर्णयप्रक्रियेमध्ये विविधता सामावून घेणे आहे. त्यायोगे India Inc.मध्ये व्यापक बदल घडवता येतील.