महिन्द्रा ट्रॅक्टर्स आणि महाराष्ट्र सरकार यांची गडचिरोली येथे कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यासाठी भागीदारी

गडचिरोली, 12 सप्टेंबर 2025: भारताचा प्रथम क्रमांकाचा ट्रॅक्टर ब्रँड असलेल्या महिन्द्रा ट्रॅक्टर्सने महाराष्ट्र शासनाबरोबर गडचिरोली येथे कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यासाठी करार केला आहे. हा करार मुंबई येथे महिन्द्रा ट्रॅक्टर्स, वोकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग विभाग (DVET) आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी (MSSDS)यांच्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला.

हे कौशल्य विकास केंद्र महिन्द्रा ट्रॅक्टर्स, DVET आणि MSSDS यांचा एकत्रित उपक्रम असून गडचिरोलीतील ग्रामीण युवकांमध्ये कौशल्य विकास वाढवण्यावर याचा भर आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट ग्रामीण युवकांना उद्योगसिद्ध कौशल्यांनी सक्षम करणे तसेच स्थानिक जीवनमानाला  चालना देणे आहे. हा उपक्रम भारताच्या वैशिष्ट्यपूर्ण लोकसंख्येचा लाभ घेण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या कौशल्य विकास या  राष्ट्रीय प्राधान्याशी पूर्णतः अनुरूप आहे.

या प्रसंगी महिन्द्रा अँड महिन्द्रा लिमिटेडचे फार्म इक्विपमेंट बिझनेसचे अध्यक्ष श्री. विजय नाक्रा म्हणाले, “महाराष्ट्र हे केवळ एक अग्रगण्य औद्योगिक केंद्र नाही, तर कृषी क्षेत्राच्या विकास प्रवासाशी घट्ट जोडलेले राज्य आहे. गडचिरोलीतील ग्रामीण युवकांच्या कौशल्य विकासासाठी महाराष्ट्र शासनाबरोबर भागीदारी करणे आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. जिथे ग्रामीण समाज उन्नत होईल आणि ग्रामीण समृद्धी अधिक बळकट होईल असा भविष्यकाळ एकत्रितपणे आपण घडवूयात.”

कौशल्य विकासात उत्कृष्टतेसाठीची बांधिलकी जपत  गडचिरोलीतील ट्रॅक्टर कौशल्य विकास केंद्राद्वारे महिन्द्रा ट्रॅक्टर आणि कृषी यंत्रसामग्रीमध्ये अतुलनीय उद्योग कौशल्य आणेल. हे केंद्र उत्पादन कारखान्यातील असेंब्लीची भूमिका तसेच डीलरशिप ठिकाणांवरील विक्री आणि सेवा भूमिकांसह संपूर्ण परिसंस्थेत करिअरच्या अनेक संधी खुल्या करेल. सुसूत्र अभ्यासक्रमाद्वारे हे शक्य झाले असून, उत्कृष्ट प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण दिले जाईल. विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तांत्रिक उपकरणे व ट्रॅक्टर-संबंधित कौशल्यांच्या विविध पैलूंचा प्रत्यक्ष अनुभव मिळेल.