सर्वसाधारणपणे कौटुंबिक हिंसाचार आणि विवाहबाह्य संबंधांमुळे अनेकांचे घर उद्ध्वस्त होऊन घटस्फोट झाल्याचे आपण पाहतो. पण स्वच्छतेवरून कोणी कुणाला घटस्फोट देऊ शकतो का? खरं तर एका तुर्की महिलेने नुकताच आपल्या पतीविरोधात असा खटला दाखल केला आहे. यावरून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
Poonam Pandey Death Fake News : ‘पूनम तुझी लाज वाटते! केवळ प्रसिद्धीसाठी तू…’
या खटल्याच दावा करण्यात आला आहे की तो कधीच आंघोळ करत नाही आणि त्याच्या अंगाला घामाचा वास येतो. इतकंच नाही तर तो आठवड्यातून एक-दोनदाच दात घासतो. महिलेची ओळख ए. वाय.इतकीच सांगण्यात आली आहे. या वादाचे मुख्य कारण पतीची स्वच्छता असल्याचे तुर्कीच्या वृत्तमाध्यमांनी म्हटले आहे. अंकारा येथील १९ व्या फॅमिली कोर्टाला महिलेने सांगितले की, तिचा पती सलग पाच दिवसांपासून एकच कपडे घालत होता आणि त्याला सतत घामाचा वास येत होता.
Husband Wife : नवऱ्याला जीवे मारण्यासाठी बायकोने केला होता खतरनाक प्लॅन, वेळीच झाली पोलखोल
या दाव्यांना दुजोरा देण्यासाठी साक्षीदारांनाही बोलवण्यात आले होते, ज्यामध्ये त्यांच्या ओळखीचे आणि पतीच्या कार्यालयातील काही सहकाऱ्यांचाही समावेश होता. त्या सर्वांनी त्या महिलेचे म्हणणे खरे असल्याचे सांगितले. न्यायालयाने आपल्या निकालात महिलेची घटस्फोटाची विनंती मान्य केली आणि पतीला वैयक्तिक स्वच्छतेच्या अभावामुळे तेव्हाच्या पत्नीला नुकसान भरपाई म्हणून 500,000 तुर्की लीरा (16,500-13.68 लाख डॉलर) देण्याचे आदेश दिले.
BIG NEWS : जनगणनेच्या बहाण्याने घरात घुसले अन् चाकूच्या धाकाने… अमरावती हादरलं
ए.वाय.चे वकील सेनेम यिलमाजेल यांनी तुर्कीवृत्तपत्र सबाहला दिलेल्या माहितीनुसार, दाम्पत्याने शेअर्ड लाइफच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजेत. एखाद्याच्या वागण्यामुळे सहजीवन असह्य झाले तर दुसऱ्या पक्षाला घटस्फोटाची याचिका दाखल करण्याचा अधिकार आहे. मानवी संबंधांमध्ये आपण सर्वांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. यासाठी आपण आपले वर्तन आणि स्वच्छता या दोन्हीकडे लक्ष दिले पाहिजे.
कोर्टात साक्षीदारांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा पती दर सात ते दहा दिवसांत एकदा अंघोळ करत असे आणि आठवड्यात फक्त एक ते दोन वेळा ब्रश करत असे. त्याच्या तोंडाचा आणि शरीराचा वास येत असे.
आधी गोळ्या झाडल्या अन् मग… पोलीस स्टेशनमध्ये नेमकं काय घडलं? घटनेचा थरारक व्हिडीओ आला समोर
तसेच कार्यालयात त्याच्या सोबत बसून काम करताना देखील दुर्गंधी येत असे, अखेर महिलेला घटस्फोट मिळाला. यापूर्वी देखील अशी प्रकरणे समोर आली आहेत.