शिक्षिकेचे विद्यार्थ्यासोबत अश्लील चाळे; इंस्टाग्रामवरून करायची अर्धनग्न व्हिडिओ कॉल, पोक्सोचा गुन्हा दाखल

By: Editor_Pratik

On: Tuesday, July 29, 2025 5:13 PM

424712-pocso-pic-4
Google News
Follow Us

मुंबईत काही दिवसांपूर्वी एका शाळेतील शिक्षिकेने विद्यार्थ्याला आपल्या जाळ्यात ओढल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. त्या घटनेत, शिक्षिका विद्यार्थ्याला कारमधून पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन, दारू पाजून त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायला भाग पाडायची.

आता याच प्रकारची, नवी मुंबईतूनही एका शिक्षिकेने शाळेतील अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत अश्लील चाळे केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संबंधित शिक्षिकेविरुद्ध नवी मुंबईतील कोपरखैरणे पोलीस ठाण्यात पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवी मुंबईतील एका शिक्षिकेने तिच्याच शाळेतील एका अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत अश्लील व्हिडिओ कॉल केल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी प्राथमिक तपासणी केली आणि कोपरखैरणे येथील पोलीस ठाण्यात शिक्षिकेवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला.

सदर शिक्षिका इंस्टाग्रामवर अर्धनग्न अवस्थेत व्हिडिओ कॉल करत होती. याबाबतची माहिती विद्यार्थ्याने आपल्या पालकांना सांगितल्यावर, पालकांनी तात्काळ कोपरखैरणे पोलीस ठाणे गाठले आणि शिक्षिकेवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर, आरोपी शिक्षिकेला अटक करण्यात आली असून न्यायालयाने तिला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, संबंधित शिक्षिकेने शाळेतील इतर विद्यार्थ्यांसोबत किंवा आणखी कोणासोबत अशा प्रकारचे कृत्य केले आहे का, या दिशेने कोपरखैरणे पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र, या घटनेने शाळेत आणि शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, याच महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबईतूनही एक धक्कादायक घटना समोर आली होती. येथील एका नामांकित शाळेतील इंग्रजी शिक्षिकेला अल्पवयीन विद्यार्थ्याशी शारीरिक संबंध ठेवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, शिक्षिकेने विद्यार्थ्याचे अनेक वेळा लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती.

याशिवाय, ती विद्यार्थ्याला दारू पाजायची आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये घेऊन जायची तिथे ती त्याचे शोषण करायची, असेही पोलिस तपासातून समोर आले होते.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

OPPO India

April 27, 2026

OPPO India

April 27, 2026

April 27, 2026

April 27, 2026

Sbi एसबीआय

April 25, 2026

April 24, 2026