पुणे : पुण्यातून कोकणात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने पुणे ते रत्नागिरी मार्गावर दोन साप्ताहिक विशेष एक्सप्रेस गाड्या — एक एसी आणि एक नॉन-एसी — सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या एकूण बारा फेऱ्या करतील.
नॉन-एसी साप्ताहिक विशेष गाडी : ही गाडी 23 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर 2025 या कालावधीत प्रत्येक शनिवारी पुण्याहून रात्री 12:25 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी 11:50 वाजता रत्नागिरीला पोहोचेल.
परतीच्या मार्गावर ही गाडी दर शनिवारी सायंकाळी 5:50 वाजता रत्नागिरीहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 5:00 वाजता पुण्यात पोहोचेल.
या गाडीच्या एकूण 6 फेऱ्या होतील.
एसी साप्ताहिक विशेष गाडी : एसी गाडी 26 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर 2025 या कालावधीत दर मंगळवारी पुण्याहून रात्री 12:25 वाजता रवाना होईल आणि त्याच दिवशी सकाळी 11:50 वाजता रत्नागिरीला पोहोचेल.
परतीच्या प्रवासात ही गाडी दर मंगळवारी सायंकाळी 5:50 वाजता रत्नागिरीहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 5:00 वाजता पुण्यात पोहोचेल.
या गाडीच्याही एकूण 6 फेऱ्या होतील.
थांबे : या विशेष गाड्यांना प्रवासादरम्यान 15 रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. या स्थानकांमध्ये : संगमेश्वर रोड, अरवली रोड, सावर्डा, चिपळूण, खेड, करंजाडी, वीर, माणगाव, रोहा, पेन, पनवेल, कल्याण, लोणावळा, तळेगाव, आणि चिंचवड यांचा समावेश आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना या गाड्यांमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. रेल्वेच्या या उपक्रमामुळे पुणे-रत्नागिरी प्रवास अधिक सुलभ होणार आहे.