Sanjay Shirsat Son Crime News : पोराचे प्रताप, मंत्री गोत्यात? विवाहितेशी संबंध, लग्न आणि धोका, गंभीर आरोप काय? राजकीय वर्तुळात खळबळ

Sanjay Shirsat Son Crime News : राज्य सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि छत्रपती संभाजी नगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या मुलावर एका विवाहित महिलेने अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांतवर फसवणूक, मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

छत्रपती संभाजी नगरमधील वकिल चंद्रकांत ठोंबरे यांच्यामार्फत महिलेने सिद्धांत शिरसाट याला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. मानसिक, शारीरिक छळ, फसवणूक, धमकी आणि हुंडा प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे.

जान्हवी सिद्धांत शिरसाट असं या महिलेने आपलं नाव लावलं आहे. सिद्धांतने जान्हवीशी लग्न केलं होतं, असा वकिलामार्फत दावा करण्यात आला आहे. जान्हवीला नांदवायला त्यांनी नकार दिला. तिने छत्रपती संभाजी नगरला येण्याचा आग्रह केला, पण तिला येऊ दिलं नाही. तिला मुंबईत रहायला सांगितलं.

तिथे महिलेवर अन्याय, अत्याचार करण्यात आला असा वकिल चंद्रकांत ठोंबरे यांनी आरोप केलाय. संजय शिरसाट हे मंत्री आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत संजय शिरसाट यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

“चेंबूर येथे वडिलांच्या नावावर फ्लॅट आहे. तिथे दोन वर्षांपूर्वी जान्हवीसोबत सिद्धांतने लग्न केलं. फॅमिलीसोबत रितीरिवाजानुसार लग्न केलं. दोन वर्ष चांगले राहिले. पण नंतर सिद्धांतच तिसऱ्या मुलीसोबत प्रेमसंबंध सुरु झाले. त्याने जान्हवीकडे दुर्लक्ष सुरु केलं. मानसिक छळ सुरु केला.

इमोशनल ब्लॅकमेलिंग करायचा. तिला संभाजी नगरला कधीच येऊ दिलं नाही. संभाजी नगरला आलीस, तर तंगडं तोडू अशी धमकी दिली. सात दिवसांच्या आत जान्हवीला नांदवण्यासाठी आम्ही सिद्धांत शिरसाटला कायदेशीर नोटीस दिली आहे. अन्यथा महिला अत्याचार कायद्यासह तीन केसेस दाखल करु” अशा इशारा जान्हवीचे वकिल चंद्रकांत ठोंबरे यांनी दिला आहे.

पीडितेच्या वकिलांची माहिती

पीडित महिलेचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धांत शिरसाट यांनी चेंबूर येथील त्यांच्या वडिलांच्या नावावर असलेल्या फ्लॅटमध्ये पीडित महिलेशी लग्न केले. दोन वर्षे ते चांगले राहिले. पण नंतर तिसऱ्याच मुलीशी त्यांचे अफेअर सुरू झाले. यामुळे त्यांनी पीडितेकडे दुर्लक्ष करत तिचा मानसिक छळ सुरू केला. तिने कुठे तक्रार दाखल करू नये म्हणून सिद्धांत शिरसाटने स्वत:च्या डोक्याला बंदूक लावत तिला धमकावले.

संभाजीनगरलाही येऊ दिले नाही

वकील चंद्रकांत ठोंबरे म्हणाले की, सिद्धांत शिरसाट यांनी पीडितेला छत्रपती संभाजीनगरलाही येऊ दिले नाही. तू तिकडे आलीस तर तुझे तंगडे तोडू अशी धमकी त्यांनी तिला दिली. त्यामुळे आम्ही त्यांना यासंबंधी नोटीस पाठवून पीडितेला 7 दिवसांच्या आत नांदण्यास घेऊन जाण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी पीडितेला नांदण्यास नेले नाही तर आम्ही महिला अत्याचार प्रतिबंधक काद्यांतर्गत त्यांच्यावर 3 केस दाखल करणार आहोत.

आता पाहू प्रकरण नेमके काय?

छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे सुपुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका विवाहित महिलेने गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. सदर महिलेने सिद्धांत यांना कायदेशीर नोटीस बजावून त्यांच्यावर मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप केला आहे. पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, त्यांची 2018 मध्ये सोशल मीडियावरून सिद्धांत शिरसाट यांच्याशी ओळख झाली. काही दिवसांतच हे नाते चेंबूर येथील एका फ्लॅटमध्ये शारीरिक संबंधांपर्यंत पोहोचले. या संबंधानंतर सिद्धांतने आत्महत्येच्या धमक्या देत तिला भावनिक ब्लॅकमेल केले. त्याचबरोबर लग्नासाठी दबाव आणला.

नात्याचा शेवट वेदनादायक

पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, सिद्धांतच्या सततच्या भावनिक आश्वासनांवर विश्वास ठेवून तिने त्याच्याशी विवाह केला. मात्र या नात्याचा शेवटही वेदनादायक ठरला. महिलेला गर्भधारणाही झाली होती, पण सिद्धांतने जबरदस्तीने तिचा गर्भपात करवून घेतल्याचा उल्लेख तिने नोटीसीमध्ये केला आहे. संजय शिरसाट हे राज्याचे सत्ताधारी शिवसेनेचे मंत्री आहेत. त्यामुळे पोलिसांनी अद्याप या प्रकरणी कोणतीही कारवाई न करता हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे.

फडणवीस शिरसाटांचा राजीनामा घेणार का? -सुषमा अंधारे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. लोकप्रतिनिधीकडून अशा प्रकारे गुन्हेगारीला प्रोत्साहन दिले जात असेल किंवा लोकप्रतिनिधी अशा प्रकारे सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर लेकीबाळीवर हात टाकत असतील तर ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणी योग्य तो निर्णय घ्यायचा आहे. भाजपने संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यासाठी जी तत्परता दाखवली होती. ती शिरसाट यांच्या राजीनाम्यासाठी दाखवली जाणार का? आपल्या बापाच्या सत्तेचा गैरफायदा घेत हे प्रकरण दाबण्याचा आणि त्या महिलेवर अन्याय करण्याची जी ताकद आहे, ती सत्तेतून आली आहे. त्यामुळे फडणवीस ही सत्ता काढून घेण्याची हिंमत दाखवणार का? हा खरा प्रश्न आहे, असे अंधारे यांनी म्हटले आहे. मी पीडितेची भेट घेऊन हा मुद्दा लावून धरणार असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या.

कठोर कारवाई होणे गरजेचे- अंबादास दानवे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे. एका महिलेवर अन्याय होत असेल आणि तिने तशी तक्रार केली असेल, तर त्यावर रीतसर कारवाई होणे आवश्यक आहे. राजकीय दबावापोटी तक्रारीकडे दुर्लक्ष करून गुन्हा न दाखल करून घेणे हे चुकीचे आहे. त्यामुळे संबंधितावर कठोर कारवाई करण्यात यावी, असे त्यांनी म्हटले आहे.

महिला आयोग आताही गप्प बसणार का? -इम्तियाज जलील

एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी या प्रकरणी थेट महिला आयोगावर टीका केली आहे. दुर्दैव याचे वाटते की, एका मंत्राच्या मुलाने तिसरे लग्न केले आणि ज्या मुलीशी लग्न केले त्या मुलीला आता धमकवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. वकिलांनी त्या मुलाला नोटीस पाठवलेली आहे. मग सगळे लोक गप्प का आहेत? राज्याचा महिला आयोग का गप्प आहे? आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना आमची हात जोडून विनंती आहे की, ताई ती मुलगी मुंबईमध्येच राहते. तिला जाऊन भेटा आणि तिला न्याय द्या, असे त्यांनी म्हटले आहे.

माझे पक्षकार जान्हव्ही सिरसाठ व आपली ओळख मोबाइल, व्हॉटसअप, फेसबुक व इंस्टाग्रामद्वारे सन 2018 मध्ये झाली, त्यानंतर आपल्या संमंतीवर व आपल्या प्रतिसादामुळे वारंवार मोबाइल संपर्क व व्हॉटसअप, फेसबुक व इंस्टाग्राम ॲपवर मोबाइल होत गेला. असे की, माझे पक्षकार व आपली प्रत्यक्ष भेट आपल्या सिंधी सोसायटी, चेंबूर मुंबई येथील Flat वर झाली व त्यांनतर तुमच्या दोघांमध्ये वारंवार भेटी झाल्या दरम्यान तुमच्या दोघांमध्ये शारिरिक संबंध प्रस्तापित झाले व आपण स्वतःमाझे पक्षकारास लग्न करण्यासाठी हातावर, शरीरावर ब्लेडने जखमा करून लग्नासाठी इमोशनली ब्लॅकमेल करीत असत.

माझे पक्षकार जान्हव्ही सिरसाठ व आपली ओळख मोबाइल, व्हॉटसअप, फेसबुक व इंस्टाग्रामद्वारे सन 2018 मध्ये झाली, त्यानंतर आपल्या संमंतीवर व आपल्या प्रतिसादामुळे वारंवार मोबाइल संपर्क व व्हॉटसअप, फेसबुक व इंस्टाग्राम ॲपवर मोबाइल होत गेला. असे की, माझे पक्षकार व आपली प्रत्यक्ष भेट आपल्या सिंधी सोसायटी, चेंबूर मुंबई येथील Flat वर झाली व त्यांनतर तुमच्या दोघांमध्ये वारंवार भेटी झाल्या दरम्यान तुमच्या दोघांमध्ये शारिरिक संबंध प्रस्तापित झाले व आपण स्वतःमाझे पक्षकारास लग्न करण्यासाठी हातावर, शरीरावर ब्लेडने जखमा करून लग्नासाठी इमोशनली ब्लॅकमेल करीत असत.

दरम्यान आपण माझे पक्षकारास तू माझ्यासोबत आताच लग्न कर नाहीतर मी आत्महत्या करून घेईन अशी धमकी दिली. तसेच हातावर ब्लेडने जखमा करून त्याचे फोटो माझे पक्षकाराच्या मोबाइल व इंस्टाग्रामवर आपण शेअर केले आहे, तसेच आपण स्वत;च्या डोक्याला पिस्तुल लावून मी गोळी मारून घेईन व जीव देईन अशी धमकी देउन माझे पक्षकारास मानसिक त्रास दिला

तसेच आपण डोक्याला पिस्तुल लावलेला फोटो माझे पक्षकाराचे फेसबुक व व्हॉटसअप वर पाठविला आहे. ते सर्व फोटो माझ्या पक्षकाराकडे आहेत.

सततच्या लग्नाच्या मागणीमुळे व आपण केलेल्या भावनिक संवादामुळे माझे पक्षकार व आपल्या आई, वडील, बहीण व इतर कुटुंबा समवेत चेंबूर शिंधी कॅम्प येथील प्लॅटवर दि. 14.01.2022 रोजी बौध्द रितीरिवाजाप्रमाणे लग्न झाले. या बाबतीत सर्व पुरावे माझे पक्षकाराकडे आहेत. आपण आपल्या नावाने सिम कार्ड दिलेले आहे. त्या सिम कार्ड मधील संवाद, फोटो व कॉल डिटेल रेकॉर्ड माझे पक्षकाराकडे आहेत, त्यावरद आपली आई शंकुतला व बहीण हर्षदा व शिल्पा यांचे संभाषणचे रेकॉर्ड सुध्दा आहेत.

लग्नानंतर आपण माझे पक्षकारास पती पत्नी म्हणून सिंधी कॉलनी, चेंबूर या ठिकाणी राहत असते व अधूनमधून कामाच्या निमित्याने छत्रपती संभाजीनगर येथे येउन जाउन करीत असत. दरम्यान आपले व माझे पक्षकाराचे नियमित शारीरिक संबंध राहिले आहे व त्यातूनच माझे पक्षकार गर्भवती राहिले असता आपण सध्यातरी आपलाला मूल नको म्हणून आपण माझे पक्षकारचे गर्भपात केल्याबाबतचे कागदपत्री वैद्यकीय पुरावे आहेत.

माझे पक्षकाराने गर्भपातानंतर आपल्या व कुटुंबातील इतर सदस्यांच्या वागण्या व बोलण्यामध्ये खूप काही बदल दिसून आला व आपण चेंबूर येथील घरी येण्यासही टाळाटाळ करू लागले. त्यामुळे माझे पक्षकाराचे मनात आपल्या विषयी शंका निर्माण होउ लागली की आपण त्यांना आपल्या छत्रपती संभाजीनगर येथील घरी कधीही घेउन गेले नाहीत. माझे वडील आमदार आहेत. त्यांची समाजात प्रतिष्ठा आहे. माझी बहीण पायलट आहे व मी सुध्दा शहराचा नगरसेवक आहे. आपण सामाजिकरित्या लग्न सार्वाजनिक करू. तोपर्यंत तू सिंधी कॉलनी, चेंबूर या ठिकाणच्या प्लॅटमध्येच रहा. मी व माझे नातेवाईक संतत मुंबईला येत राहूत. तू काहीच काळजी करू नको, अशी बतावणी करून तसेच भूलथापा देउन माझे पक्षकाराची दिशाभूल करीत होतात.

यापूर्वी आपण सुनीता सिध्दांत सिरसाठ हिच्याबरोबर लग्न केल्याचे समजते. नंतर आपण कोमल साळवे यांच्यासोबत लग्न केले व ती सध्या आपल्या बरोबर राहते असे समजले. कारण आपणच ही बाब आपल्या मोबाइलवरून माझे पक्षकाराच्या व्हॉटसअपवर पाठवले. आपण व आपल्या घरातील आई, वडील व बहीण यांच्या कट कारस्थानामुळे व सध्याचे पालकमंत्री मा. संजयजी शिरसाठ यांच्या दबावामुळे घराची प्रतिष्ठा जाउ नये म्हणून तू छत्रपती संभाजीनगर येथे येण्याची गरज नाही. तू चेंबूर येथेच राहा मी आठ दिवसाला नियमित येत जाईन तुला काही कमी पडू देणार नाही, असे बोलून तुम्ही माझ्या पक्षकारास धमकावले व खोटे आश्वासन दिले.

आपण दिनांक 17.04.2022 रोजी माझे पक्षकाराची माफी मागून तू कुणासीही चर्चा करू नकोस जर तू कुणासही वाच्यता केली किंवा पोलिसामध्ये तकार केली तर मी माझ्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या करून घेईन व त्यात तुझे नांव टाकीन. त्यामुळे तुझे कुंटुंब रस्त्यावर येईल व तू पूर्णपणे उध्दवस्त होशील, अशी धमकी तुम्ही माझे पक्षकारास दिली. तुम्ही डोक्याला पिस्तुल लावल्याचा फोटो माझे पक्षकाराकडे आहेत. नंतर मात्र तू आई-वडिलांकडेच रहा. या Flat ची दुरुस्ती करण्याचे आहे. वरील तारखेच्या वेळेस तुमचे नेहमी नाशिक येथील हेमांगी पवार या महिलांचे संभाषण चालू होते.

त्यानंतर माझ्या पक्षकाराने तुम्हास जाब विचारला असता, तुम्ही असे सांगितले की सदर Flat विक्री करून टाकला आहे. यापुढे मला कुठलाही फोन करू नकोस नसता, मी तुझे सर्व कुटुंब गुंडाकडून खत्म करीन. माझे वडील मंत्री होणार आहेत व ते मुख्यमंत्री मा. शिंदे याचे उजवे हात आहेत. माझे पक्षकारने दिनांक 20.12.2024 रोजी पोलिस स्टेशन शाहूनगर, मुंबई येथे रितसर तकार केली. मात्र मा. संजय शिरसाट हे कॅबिनेट व छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री झाल्यामुळे त्यांनी पोलिसावर दबाव टाकल्यामुळे कार्यवाई होउ दिली नाही.

आपणास ह्या नोटीसद्वारे कळवण्यात येते की, आपण माझे पक्षकारास 7 दिवसांच्या आत नांदावयास घेऊन जावे नसता माझे पक्षकार आपणाविरुद्ध व आपल्या कुटुंबाविरोधात मानसिक व शारिरिक छळ केला व माझ्या पक्षकाराच्या नावावर असलेला फ्लॅट आपल्या नावावर न केल्यामुळे तसेच 50 लाख रुपये हुंड्यापोटी न दिल्यामुळे आपल्याविरोधात महिला अत्याचारकायदा तसेच हुंडाप्रतिबंध कायदा तसेच इतर कायद्यानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी. तसेच या नोटीसचा खर्च रुपये 25000/- आपल्याकडून वसूल केला जाईल यांची नोंद घ्यावी. करिता ही कायदेशीर नोटीस.