४१ मोबाईल, ६० लॅपटॉप जप्त; पुण्यातील खराडी भागातील धक्कादायक प्रकार; १०० हून अधिक भामटे ताब्यात

४१ मोबाईल, ६० लॅपटॉप जप्त; पुण्यातील खराडी भागातील धक्कादायक प्रकार; १०० हून अधिक भामटे ताब्यात

पुणे – शहरातील खराडी येथील प्राईड आयकॉन बिल्डिंगमध्ये सुरु असलेल्या एका फर्जी कॉल सेंटरवर पुणे सायबर पोलिसांनी कारवाई करत मोठा छापा टाकला. ‘मैग्नेटेल BPS & कन्सल्टंट्स LLP’ या नावाने चालवले जात असलेल्या या कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांना “डिजिटल अरेस्ट” ची भीती दाखवून लाखो डॉलर्सची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

फसवणुकीची शक्कल

या कॉल सेंटरमधील आरोपी अमेरिकेतील नागरिकांना फोन करत, “तुमच्या नावावर गुन्हे दाखल आहेत, लवकरच डिजिटल अरेस्ट केला जाईल” अशी भिती निर्माण करत. त्यातून सुटका मिळवण्यासाठी त्यांच्याकडून Amazon गिफ्ट व्हाउचर किंवा बिटकॉइनच्या माध्यमातून पैसे उकळले जात. या फसवणुकीतून हजारो डॉलर्सची लूट करण्यात आली आहे.

जप्त सामग्री

पोलिसांनी छाप्यात खालील वस्तू जप्त केल्या:

  • ६४ लॅपटॉप
  • ४१ मोबाईल फोन
  • ४ राऊटर
  • फसवणुकीसाठी वापरलेली इंग्रजी स्क्रिप्ट्स
  • कर्मचाऱ्यांची ओळखपत्रे
  • ₹१३.७४ लाख रोख रक्कम

पाच अटकेत, तिघे फरार

या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली असून तिघे फरार आहेत. हे फर्जी कॉल सेंटर गेल्या वर्षभरापासून सुरू होते आणि येथे तब्बल १२३ कर्मचारी कार्यरत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

सायबर पोलिस आता या टोळीचा इतर राज्यांतील साखळीशी संबंध आहे का, याचीही चौकशी करत आहेत.

पुणे सायबर पोलिस उपायुक्त रंजनकुमार शर्मा यांनी सांगितले की, “ही टोळी मोठ्या प्रमाणावर फसवणूक करत होती. यामागे मोठा जाळा असण्याची शक्यता असून सखोल तपास सुरू आहे.”