८६ टक्‍के भारतीय व्‍यवसाय स्थिरता आणि व्‍यवसाय नफा यामधील सकारात्‍मक संबंधाला प्राधान्‍य देतात: एसएपी सस्‍टेनेबिलिटीच्या अभ्यासातील  निष्कर्ष

पुणे २९ एप्रिल २०२४:  एसएपी नाऊ या २००० हून अधिक प्रतिनिधींनी उपस्थिती दाखवलेल्‍या प्रमुख ग्राहक इव्‍हेण्‍टमध्‍ये एसएपीने नवीन ‘सस्‍टेनेबिलिटी अभ्यासातील निष्कर्षांचे अनावरण केले. या अहवालातून  निदर्शनास येते की ८६ टक्‍के भारतीय कंपन्‍या स्थिरता आणि त्‍यांच्‍या कंपनीचा नफा यामधील प्रबळ संबंधाला पुरेसे प्राधान्‍य देतात, परिणामत: त्‍यांच्‍या गुंतवणूकांमध्‍ये वाढ करत आहेत.

या सर्वेक्षणामधील निष्‍पत्तींबाबत मत व्‍यक्‍त करत एसएपी एशिया पॅसिफिक जपानचे अध्‍यक्ष पॉल मॅरिएट म्‍हणाले, ”आशियाई बाजारपेठेचे उत्‍सर्जनाचे प्रमाण जगामध्‍ये ५० टक्‍क्‍यांहून अधिक आहे. म्‍हणून प्रांतामधील नाविन्‍यता व आर्थिक क्रियाकलापांचे झपाट्याने विकसित होणारे केंद्र म्‍हणून भारत हवामान बदलाविरोधात कृतींचे नेतृत्‍व करण्‍यामध्‍ये अग्रस्‍थानी आहे. प्रेरणादायी बाब म्‍हणजे अधिकाधिक भारतीय कंपन्‍यांनी ही बाब ओळखली आहे आणि त्‍याचा अंगिकार करण्‍यास सज्‍ज आहेत.”

एसएपी इंडियन सबकॉन्टिनण्‍टचे अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक मनिष प्रसाद म्‍हणाले, ”आज स्थिरता नैतिक कर्तव्‍यापेक्षा व्‍यवसायाची गरज बनली आहे. यापुढे कंपनीच्‍या एकूण आर्थिक कामगिरीमध्‍ये स्थिरतेला अधिक प्राधान्‍य दिले जाण्‍याची शक्‍यता आहे. आमच्‍या स्‍टडीच्‍या निष्‍पत्तींमधून निदर्शनास येते की, स्थिरतेला प्राधान्‍य देणारे व्‍यवसाय अधिक यशस्‍वी ठरतात. आर्थिक व पर्यावरणीय निर्णय घेण्‍याच्‍या क्षमतेला एकत्र आणत सर्व कॉर्पोरेट प्रक्रियांमध्‍ये आर्थिक डेटाप्रमाणे कार्बन डेटाचा विचार करण्‍याची वेळ आली आहे.”

७७ टक्‍के भारतीय व्‍यवसायांनी पुरेशा किंवा मोठ्या प्रमाणात महसूल किंवा नफ्यामध्‍ये वाढ अशा योगदान देणाऱ्या स्थिर धोरणांना पाहिले आहे. तसेच, ८४ टक्‍के भारतीय प्रतिसादकांनी स्थिर क्रियाकलापांमधून व्‍यवसाय प्रक्रियांच्‍या कार्यक्षमतेत पुरेशी किंवा प्रबळ वाढ पाहिली आहे. ५८ टक्‍के भारतीय व्‍यवसायांना पुढील पाच वर्षांमधील त्‍यांच्‍या स्थिर गुंतवणूकांमधून सकारात्‍मक आर्थिक परतावा मिळण्‍याची अपेक्षा आहे. भारतात, ३९ टक्‍के व्‍यवसायांचा पुढील तीन वर्षांत स्थिरतेमधील त्‍यांच्‍या गुंतवणूका वाढवण्‍याचा मनसुबा आहे. पर्यावरणीय प्रभाव धोरणाचा अभाव पर्यावरणासंबंधित कृती करण्‍यामध्‍ये मोठा अडथळा आहे, जेथे ४० टक्‍के भारतीय व्‍यवसायांना ते मोठे आव्‍हान वाटते.

इतर आव्‍हाने आहेत भारतीय व्‍यवसाय स्थिरता डेटाचे मूल्‍य अनलॉक करण्‍याचा प्रयत्‍न करत आहेत: आज व्यवसायांचा विश्‍वास आहे की, स्थिरता डेटामधून मूल्‍य प्राप्‍त करणे हे योग्‍य निर्णय घेण्‍यासाठी महत्त्वाचे आहे. स्थिरता डेटा अचूक नसेल तर आपल्‍या निसर्गाचे आरोग्‍य व व्‍यवसायांमध्‍ये सुधारणा करण्‍यासाठी घेतलेल्‍या निर्णयांबाबत निश्चितच संदिग्‍धता निर्माण होईल. अचूक, सर्वोत्तम व ऑडिटेबल स्थिरता डेटाचे रेकॉर्ड व रिपोर्ट करणे आणि योग्‍य व्‍यवसाय निर्णय घेण्‍यासाठी त्‍या डेटाला आर्थिक डेटाशी एकीकृत करणे महत्त्वाचे आहे. ४० टक्‍के भारतीय व्‍यवसाय त्‍यांनी गोळा केलेल्‍या स्थिरता डेटाच्‍या दर्जाबाबत पूर्णत: समाधानी आहेत, तर उर्वरित भारतीय व्‍यवसायांना वाटते की अजूनही लांबचा पल्‍ला गाठायचा आहे.