LPG Cylinder: स्वस्तात गॅस सिलिंडर बुकिंगची संधी; 10% पर्यंत कॅशबॅक मिळवण्याची सोपी प्रक्रिया जाणून घ्या
मुंबई : घरगुती गॅस सिलिंडर ऑनलाइन बुक करताना आता ग्राहकांना कॅशबॅकचा फायदा घेता येणार आहे. डिजिटल पेमेंटचा वापर करून एलपीजी सिलिंडर बुक केल्यास काही निवडक क्रेडिट कार्ड्सवर 10 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो.
विशेषतः फोनपे ॲपद्वारे सिलिंडर बुकिंग केल्यास आणि ‘फोनपे एसबीआय कार्ड सिलेक्ट ब्लॅक’ वापरून पेमेंट केल्यास हा लाभ मिळतो. त्यामुळे गॅस बुकिंग अधिक स्वस्त होण्यास मदत होते.
फोनपे ॲपद्वारे गॅस सिलिंडर कसा बुक कराल?
- फोनपे ॲप उघडा
- ‘Recharge & Pay Bills’ विभागात जा आणि ‘More’ वर क्लिक करा
- ‘Utilities’ मध्ये ‘Book Cylinder’ निवडा
- तुमची एलपीजी कंपनी निवडा
- ग्राहक क्रमांक / मोबाईल नंबर / एलपीजी आयडी टाका
- ‘Confirm’ करून बुकिंग रक्कम तपासा
- पेमेंट करताना ‘फोनपे एसबीआय कार्ड सिलेक्ट ब्लॅक’ वापरा
यामुळे तुम्हाला 10% पर्यंत कॅशबॅक मिळू शकतो.
इतर फायदेही मिळणार
या कार्डद्वारे केवळ गॅस बुकिंगच नव्हे, तर रिचार्ज, बिल पेमेंट, हॉटेल आणि विमान तिकीट बुकिंगसह विविध व्यवहारांवरही रिवॉर्ड पॉइंट्स मिळतात.
- प्रत्येक 1 रिवॉर्ड पॉइंट = ₹1
- पिनकोड प्लॅटफॉर्मवर 10% पर्यंत रिवॉर्ड्स
- ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, स्विगी, झोमॅटो, उबर, ब्लिंकइटवर 5% पर्यंत रिवॉर्ड्स
- यूपीआय व इतर खर्चांवर 1% रिवॉर्ड
तसेच वर्षभरात 5 लाख रुपयांचा खर्च पूर्ण केल्यास 5,000 रुपयांचे ट्रॅव्हल व्हाउचरही मिळते.
कार्ड शुल्क किती?
या कार्डसाठी जॉइनिंग फी 1,499 रुपये आहे. मात्र मर्यादित ऑफरमध्ये ती माफ केली जाते. वार्षिक नूतनीकरण शुल्कही 1,499 रुपये असून, वर्षात 3 लाख रुपयांचा खर्च केल्यास ते शुल्क परत मिळते.
एकूणच, योग्य कार्ड आणि डिजिटल पेमेंटचा वापर केल्यास एलपीजी सिलिंडर बुकिंगवर चांगली बचत करता येऊ शकते.





