यापूर्वी ‘सीबीएसई’ने ९ मार्च २०२६ रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, १२ मार्च २०२६ (गुरुवार) ते १६ मार्च २०२६ (सोमवार) दरम्यान होणाऱ्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर विद्यार्थ्यांवर होणारा मानसिक ताण आणि निर्माण झालेली अनिश्चितता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला होता. आता युद्ध स्थिती पाहता अखेर या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.