बिग बॉस फेम यूट्यूबरचा कार अपघात, ICUमध्ये उपचार होते सुरु; मॅनेजरकडून हेल्थ अपडेट शेअर

By: Editor_Pratik

On: Saturday, March 14, 2026 10:51 AM

Google News
Follow Us

लोकप्रिय यूट्यूबर आणि अनुराग डोभाल (बिग बॉस फेम) सध्या गंभीर अपघातानंतर रुग्णालयात उपचार घेत आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा कार अपघात झाला होता. त्या वेळी तो इन्स्टाग्रामवर लाईव्ह होता. अपघातानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काही दिवस तो आयसीयूमध्ये होता. आता त्याला आयसीयूमधून बाहेर काढण्यात आले असले तरी त्याची प्रकृती अजूनही चिंताजनक असल्याची माहिती त्याच्या मॅनेजरने दिली आहे.

अनुरागचा मॅनेजर रोहित पांडेने सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना त्याच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. त्याने सांगितले की, सकाळपर्यंत अनुरागची प्रकृती स्थिर होती; मात्र नंतर अचानक त्याची तब्येत पुन्हा खालावू लागली. अपघातात त्याच्या फुफ्फुसांना मोठे नुकसान झाले असून त्यामुळे गंभीर इन्फेक्शन झाले आहे. डॉक्टरांनी त्याला गंभीर निमोनियाचे निदान केले असून सध्या तो डॉक्टरांच्या कडक देखरेखीखाली उपचार घेत आहे. त्याच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहनही त्याने चाहत्यांना केले आहे.

दरम्यान, गुरुवारी अनुरागला आयसीयूमधून बाहेर हलवण्यात आले. रोहित पांडेने अनुरागसोबतचा रुग्णालयातील फोटो शेअर करत “अनुराग आता आयसीयूमधून बाहेर आला आहे. आम्ही त्याच्यासोबत २४ तास आहोत. कृपया त्याच्यासाठी प्रार्थना करा,” असे कॅप्शनमध्ये लिहिले. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

अपघाताच्या आधी अनुरागने इन्स्टाग्राम लाईव्हमध्ये भावनिक वक्तव्य केले होते. त्याने आपल्या कुटुंबावर गंभीर आरोप करत मानसिक त्रास सहन करत असल्याचे सांगितले होते. त्याच्या आंतरजातीय विवाहाला कुटुंबाचा विरोध असल्यामुळे त्याला सतत दबाव आणि मानसिक छळ सहन करावा लागत असल्याचे त्याने म्हटले होते. यासंदर्भात त्याने यूट्यूबवर एक व्हिडिओ शेअर करत हा आपला शेवटचा व्हिडिओ असल्याचेही सांगितले होते. तसेच, स्वतःला काही झाल्यास त्यासाठी पालक आणि भाऊ जबाबदार असतील, असा आरोपही त्याने केला होता.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

LPG Gas Shorage

March 14, 2026

March 14, 2026

March 14, 2026

March 14, 2026

March 14, 2026

March 14, 2026