---Advertisement---

गॅस सिलेंडरची साठेबाजी करत असाल तर सावधान… थेट गुन्हा दाखल होणार, पोलिसांची करडी नजर

By: Editor_Pratik

On: Wednesday, March 11, 2026 11:01 AM

Google News
Follow Us
---Advertisement---

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे संपूर्ण जगात हाहाकार उडाला आहे. बहुतांशी देशांमध्ये इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. भारतातही नैसर्गिक वायुच्या कमतरतेमुळे गॅस सिलिंडरची कमतरता जाणवू लागली आहे. त्यामुळे गॅस सिलिंडरची साठेबाजी होत असल्याचे समोर आले आहे. काही ठिकाणी गॅस सिलेंडर आगाऊ किमतीत विकला जात असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे आता नागपूर पोलिसांना साठेबाजी करणाऱ्यांना गंभीर इशारा दिला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

नागपूरचे पोलिस आयुक्त रविंद्र कुमार सिंघल यांनी याबाबत बोलताना म्हटले की, गॅस सिलेंडरची साठेबाजी आणि वितरणावर आता पोलिसांची करडी नजर राहणार आहे. आम्ही पेट्रोलिंग वाढवलेले आहे, जिथे डिस्ट्रीब्यूशन सेंटर आहे तिथे आणि ट्रान्सपोर्टच्या ठिकाणी पेट्रोलिंग वाढवली आहे. वेगवेगळी पथके तयार करून त्यांना बारीक नजर ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. क्राईम ब्रँचचे सगळे युनिट अलर्ट मोडवर आहे.

पुढे बोलताना रविंद्र कुमार सिंघल म्हणाले की, कोणी काळाबाजार करणार होते त्यांची सगळी लिस्ट काढली जात आहे आणि त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. साठेबाजी करण्याचा कोणी प्रयत्न केल्यास एस्मा आणि इसेन्शिअल कमोडिटी ऍक्ट नुसार त्यांच्यावर कारवाई करणार आहोत. त्या कायद्यामध्ये कोण बसत आहे ते आम्ही शोधतो आहे आणि नियमाप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करणार आहोत. साठेबाजी कोणी करत आहे का? त्यासंदर्भातील चेकिंग सुद्धा आम्ही सुरू केलेली आहे.

पोलिस आयुक्त सिंघल यांनी पुढे बोलताना म्हटले की, गॅस सिलिंडरबाबत अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कारवाई होणार आहे. सोशल मीडियावर पोलिसांचा खास लक्ष ठेवून आहेत आणि कोणी चुकीची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवली तर त्यांच्यावर कारवाई करणार आहे.जिथे गरज पडेल त्या ठिकाणी आम्ही जास्त बंदोबस्त लावू .सध्या कुठेही गर्दी झालेली नाही, परंतु आवश्यकता पडल्यास आम्ही त्या ठिकाणी पोलीस संरक्षण देऊ.

जळगावात व्यावसायिक सिलिंडरच्या पुरवठ्यावर परिमाण झाल्याने हॉटेल व्यवसाय संकटात सापडला आहे. जळगाव शहरात आणि संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध असलेले कृष्णा भरीत सेंटर देखील अडचणीत सापडले आहे. हॉटेल व्यावसायिकांकडे दोन दिवस पुरेल एवढाच सिलेंडरचा साठा आहे. दोन दिवसानंतर सिलेंडर मिळाले नाही तर हॉटेल व्यावसायिकावर हॉटेल बंद करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा सुरळीत व नियमित करण्याची मागणी हॉटेल व्यवसायिकांनी केली आहे. त्याचबरोबर अंबरनाथमध्येही हॉटेल व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत.

व्यवसायिक गॅस सिलेंडर तुटवड्याचा फटका मुंबई पोलिसांनाही बसला आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयातील कॅन्टीन बंद होण्याच्या मार्गावर आहे. सध्या कॅन्टीनमध्ये केवळ डाळ भाताची सोय आहे. तसेच मुंबई पोलिसांच्या प्रेरणा हॉल येथील कॅन्टीनला देखील सिलेंडर तुटवड्याचा फटका बसला आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 11, 2026

March 9, 2026

PMC BIG NEWS

March 9, 2026

March 9, 2026

iQOO Z11x

March 9, 2026

March 9, 2026