Crime : पुणे-सोलापूर हायवेवर रक्ताचा सडा! दुचाकीला पिकअपची धडक अन् कोयत्याने सपासप वार; साडेचार वर्षांनंतर घेतला दुहेरी खुनाचा बदला?

By: Editor_Pratik

On: Saturday, February 21, 2026 10:59 AM

Crime
Google News
Follow Us

Crime : पुणे-सोलापूर हायवेवर रक्ताचा सडा! दुचाकीला पिकअपची धडक अन् कोयत्याने सपासप वार; साडेचार वर्षांनंतर घेतला दुहेरी खुनाचा बदला?

कुरकुंभ : पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मुकादमवाडी (ता. दौंड) येथे शुक्रवारी रात्री घडलेल्या धक्कादायक घटनेत तरुणाचा धारदार शस्त्रांनी निर्घृण खून करण्यात आला. या प्रकरणी दौंड पोलिसांनी पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मन्या उर्फ महेश संजय भागवत (वय २९, रा. पाटस, ता. दौंड) हा शुक्रवारी रात्री महेश टुले, युवराज शिंदे व राज होले यांच्यासह दुचाकीवरून पाटसकडे जात होता. मुकादमवाडी पुलाजवळ आल्यानंतर संशयितांनी पिकअप वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत चौघेही रस्त्यावर कोसळले.

यानंतर आरोपींनी महेश भागवत याच्यावर कोयता व इतर धारदार शस्त्रांनी सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या भागवतचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

या प्रकरणी महेश मारूती टुले (रा. पाटस) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आनंद माकर, विकी शितकल, संतोष शितकल (रा. अंबिकानगर, पाटस) तसेच त्यांच्या दोन अनोळखी साथीदारांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक गोपाळ पवार या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दरम्यान, ४ जुलै २०२१ रोजी पाटस येथे शिवम शितकल व गणेश माकर या दोन युवकांचा खून झाला होता. त्या दुहेरी खून प्रकरणात मृत महेश भागवत याच्यासह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल होता. साडेचार वर्षांनंतर सूडभावनेतून ही हत्या करण्यात आली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असून पुढील तपास सुरू आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 13, 2026

March 13, 2026

March 13, 2026

March 13, 2026

March 13, 2026

March 13, 2026