विशाल भालेराव
खानापूर : आमदार भीमराव अण्णा तापकीर यांच्या जनसुविधा योजनेअंतर्गत व श्री शरद (लालाशेठ) जावळकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून खानापूर गावातील अंतर्गत ड्रेनेज लाईनचे काम सुरू करण्यात आले असून यासाठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
खानापूर गावात अंतर्गत सांडपाणी व्यवस्थेचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. पावसाळ्यात सांडपाणी रस्त्यावर साचणे, दुर्गंधी निर्माण होणे तसेच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत होता. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार श्री शरद (लालाशेठ) जावळकर यांनी सातत्याने पाठपुरावा करत आमदार भीमराव अण्णा तापकीर यांच्याकडे हा विषय मांडला होता. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत आमदार तापकीर यांनी जनसुविधा योजनेतून निधी उपलब्ध करून दिला.
सध्या सुरू असलेल्या या ड्रेनेज लाईनच्या कामामुळे सांडपाणी व्यवस्थेत सुधारणा होऊन स्वच्छता, आरोग्य आणि नागरिकांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा होणार आहे. तसेच भविष्यातील पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघणार असल्याचा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
या विकासकामाबद्दल ग्रामस्थांनी आमदार भीमराव अण्णा तापकीर व श्री शरद (लालाशेठ) जावळकर यांचे आभार मानले असून, खानापूर गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अशाच प्रकारची कामे पुढेही सुरू राहावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.









