पुणे : ठेवीदार फसवणूक प्रकरणातील भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशी यांचे ससूनमध्ये निधन

By: Editor_Pratik

On: Friday, December 26, 2025 12:22 PM

Google News
Follow Us

पुणे : ठेवीदार फसवणूक प्रकरणातील भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशी यांचे ससूनमध्ये निधन

पुणे : ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी येरवडा कारागृहात असलेले भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक उदय जाेशी (वय ६३) यांचे शुक्रवारी सकाळी ससून रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. जोशी हे वर्षभरापासून कारागृहात न्यायालयीन कोठडीत होते. आजारपणामुळे त्यांनी जामीन मिळवण्यासाठी त्यांनी न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, सुनावणीपूर्वीच त्यांचे निधन झाले.

ठेवीदारांची पाच कोटी ७३ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक, सदाशिव पेठेतील निनाद नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक उदय जोशी, त्यांचा मुलगा मयुरेश यांच्यासह सात जणांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जोशी यांच्या मुलाने सिंहगड रस्ता परिसरात गॅस वितरण एजन्सीत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून पैसे घेतले होते.

पैसे घेतल्यानंतर परतावा न दिल्याप्रकरणी विश्रामबाग ठाण्यात उदय जोशी, त्यांचा मुलगा यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात त्यांच्याविरुद्ध चार गु्न्हे दाखल झाले होते. याप्रकरणात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. सर्वोच्च न्यायालायने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. त्यानंतर याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. जोशी यांच्या पत्नी शुभदा भाजप नगरसेविका होत्या.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

Trupti Desai

July 15, 2026

July 14, 2026

July 13, 2026

July 13, 2026

July 12, 2026

July 11, 2026