सह्याद्रि हॉस्पिटलमध्ये दुर्मिळ मेकॅनिकल थ्रोम्‍बेक्‍टॉमी प्रक्रिया

पुणे, नोव्‍हेंबर २४, २०२५ – पल्‍मनरी एम्‍बोलिझम सह व्‍यापक डीप वेन थ्रोम्‍बोसिसच्‍या (Pulmonary Embolism with extensive deep vein thrombosis) असाधारण आणि उच्‍च जोखीम असलेल्‍या केसमध्‍ये पुण्‍यातील सह्याद्रि हॉस्पिटल्‍समधील डॉक्‍टरांनी सर्वात प्रगत एआय-सक्षम मेकॅनिकल थ्रोम्‍बेस्‍क्‍टॉमी (Mechanical Thrombectomy) सिस्‍टमचा वापर करत ३७ वर्षीय पुरूष रूग्‍णामधील मोठी १८० ग्रॅम वजन असलेली रक्‍ताची गाठ यशस्‍वीरित्‍या काढून टाकली. हडपसर येथील सह्याद्रि‍ सुपर स्‍पेशालिटी हॉस्पिटलमधील इंटरव्‍हेंशनल रेडिओलॉजिस्‍ट डॉ. कौरभी झाडे यांनी ही किमान इन्‍वेसिव्‍ह, जीवनदायी प्रक्रिया केली. 

रूग्‍णाला हॉस्पिटलमध्‍ये आणण्‍यात आले तेव्‍हा त्‍याच्‍या दोन्‍ही पायांना मोठ्या प्रमाणात सूज होती.  ज्‍यामुळे  रक्‍तवाहिन्‍यांमध्‍ये रक्‍ताच्‍या गाठी निर्माण होऊन डीव्‍हीटीचे लक्षण दिसत होती. नैदानिक तपासणीसोबत सीटी पल्‍मनरी अँजिओग्राफीमधून (CT Pulmonary Angiography) फुफ्फुसामधील मुख्‍य धमन्‍यांमध्‍ये अनेक रक्‍ताच्‍या गाठी असल्‍याचे आढळून आले. तसेच विकसित होत असलेल्‍या पल्‍मनरी एम्‍बोलिझमचे निदान झाले. या स्थितीमध्‍ये रक्‍ताची गाठ फुफ्फुसापर्यंत जाते आणि रक्‍तपुरवठा थांबू शकतो, ज्‍यामुळे त्‍वरित उपचार न केल्‍यास अचानक चक्‍कर येऊ शकते किंवा माणूस मृत्‍यूमुखी पडू शकतो.  

या केसमधील चिंताजनक बाब म्‍हणजे थ्रोम्‍बसचे उच्‍च प्रमाण, जे क्‍वचितच दिसून येते. अशा स्थितींमध्ये फक्त रक्त पातळ करणाऱ्या औषधांवर अवलंबून राहिल्यास रुग्णाची प्रकृती त्वरीत खालावण्याचा धोका जास्त असतो.

अधिक गुंतागुंती टाळण्यासाठी सह्याद्रि हॉस्पिटलमधील वैद्यकीय टीमने प्रगत किमान इन्वेसिव्ह मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी (advanced minimally invasive Mechanical Thrombectomy) ही प्रक्रिया निवडली. या प्रक्रियेमध्‍ये रक्‍ताची गाठ काढण्‍यासाठी प्रबळ सक्‍शन पॉवर असलेली पातळ नळी (Catheter) रक्‍तवाहिनीमध्‍ये टाकली जाते. या प्रक्रियेमध्‍ये थ्रोम्‍बोलायटिक औषधांमुळे रक्‍तस्‍त्रावाचा धोका, ओपन सर्जरीची प्रखरता आणि हळूहळू रक्‍ताची गाठ विरघळण्‍यास होणारा विलंब कमी होतो, तसेच अधिक सुव्‍यवस्थित उपचाराची खात्री मिळते.

या केसमध्ये, प्रगत मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी तंत्राचा वापर निर्णायक ठरला. अशा मोठ्या प्रमाणातील गाठेस फक्त औषधोपचारावर ठेवले असते, तर ती विरघळण्यासाठी लागणारा वेळ रुग्णासाठी जीवघेणा ठरू शकत होता — अचानक श्वसनक्रिया बिघडणे, रक्तदाब कोसळणे किंवा फुफ्फुसांना कायमस्वरूपी हानी होण्याचा धोका लक्षणीयपणे वाढला असता. या प्रक्रियेद्वारे टीमला नियंत्रित, स्थिर आणि रिअल-टाइम मार्गदर्शनाखाली संपूर्ण १८० ग्रॅम रक्तगाठ एकाच सत्रात सुरक्षितपणे काढता आली. त्यामुळे रुग्णाची श्वसनक्षमता त्वरित सुधारली, गुंतागुंतींचा धोका कमी झाला आणि जीवन वाचविण्याची संधी मोठ्या प्रमाणात वाढली. 

प्रक्रियेनंतर रूग्‍णाला आयसीयूमध्‍ये ठेवण्‍यात आले, जेथे हडपसर येथील सह्याद्रि हॉस्पिटल्‍समधील आयसीयू व क्रिटीकल केअर मेडिसीनचे संचालक डॉ. कपिल बोरावके आणि क्रिटीकल केअर टीमच्‍या देखरेखीअंतर्गत रूग्‍णाची काळजी घेण्‍यात आली. रूग्‍णाची प्रकृती झपाट्याने स्थिर झाली, ऑक्सिजनेशन सुधारले आणि समकालीन उपचारासह अपेक्षेपेक्षा लवकर रूग्‍ण रिकव्‍हर झाला.

रूग्‍णाच्‍या रिकव्‍हरीबाबत बोलताना हडपसर येथील सह्याद्रि सुपर स्‍पेशालिटी हॉस्पिटलमधील आयसीयू व क्रिटीकल केअर मेडिसीनचे संचालक डॉ. कपिल बोरावके म्‍हणाले, ”अशी मोठी रक्‍ताची गाठ असलेल्‍या रूग्‍णांची प्रकृती त्‍वरित अस्थिर होऊ शकते. लवकर हस्‍तक्षेप आणि इंटरव्‍हेंशनल व क्रिटीकल केअर टीम्‍समधील विनासायास समन्‍वयाने रूग्‍णाची प्रकृती स्थिर करण्‍यामध्‍ये आणि त्‍वरित रिकव्‍हरीमध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावली.”

या केसच्‍या, तसेच वेळेवर कृती करण्‍याच्‍या महत्त्वाबाबत मत व्‍यक्‍त करताना डॉ. झाडे म्‍हणाल्‍या, ”डीव्‍हीटी केसेस सामान्‍य आहेत आणि अनेक रूग्‍ण औषधोपचारासह बरे होताना दिसतात. पण थ्रोम्‍बसचे प्रमाण जास्‍त असेल तर फक्‍त समकालीन थेरपी अपूरी ठरते. मेकॅनिकल थ्रोम्‍बेक्‍टॉमीने आम्‍हाला जीवघेण्‍या स्थितीवर यशस्‍वीपणे उपचार करण्‍यास मदत केली, ज्‍यामुळे रूग्‍णाची प्रकृती सुधारली आणि रूग्‍ण लवकर बरा झाला.”  त्‍या पुढे म्‍हणाल्‍या, ”पायामध्‍ये वेदना, सूज व श्‍वास घेण्‍यास त्रास होणे यांसारखी चेतावणी देणारी लक्षणे लवकर ओळखणे अत्‍यंत महत्त्वाचे आहे. इमेजिंगच्‍या माध्‍यमातून वेळेवर निदान आणि त्‍वरित विशेषीकृत केंद्रांमध्‍ये रेफरल केल्‍यास डीव्‍हीटी व पल्‍मनरी एम्‍बोलिझममध्‍ये व्‍यक्‍तींचे जीवन वाचू शकते.”

या केसमधून रक्‍तवाहिन्‍यांमधील गुंतागूंतीच्‍या स्थितींचे व्‍यवस्‍थापन करण्‍यामध्‍ये इंटरव्‍हेंशनल रेडिओलॉजीची वाढती भूमिका दिसून येते, तसेच नेक्‍स्‍ट-जनेरशन, एआय-संचालित तंत्रज्ञानाचा वापर करत उच्‍च जोखीम असलेल्‍या रूग्‍णांवर उपचार करण्‍यामध्‍ये सह्याद्रि हॉस्पिटल्‍सच्‍या प्रगत क्षमता देखील निदर्शनास येतात.