टोयोटा किर्लोस्‍कर मोटरकडून नवरात्री ऑफरची घोषणा जीएसटी सवलतीसह जवळपास १ लाख रूपयांचे फायदे

पुणे, १० सप्‍टेंबर २०२५: सणासुदीच्‍या काळामध्‍ये अधिक उत्‍साहाची भर करत टोयोटा किर्लोस्‍कर मोटर (टीकेएम)ने ग्राहकासांठी दुप्‍पट फायद्याची घोषणा केली. कंपनीने जीएसटी दरामधील कपातीचे संपूर्ण फायदे ग्राहकांना दिले आहेत. यात आता केवळ पुण्यासह देशातील पश्चिम प्रांतामधील ग्राहकांसाठी‘बाय नाऊ अँड पे इन २०२६’विशेष मोहिम खास नवरात्रींसाठी जाहीर केली आहे. त्यामुळे कंपनीच्या अर्बन क्रूझर हायरायडर, टोयोटा ग्‍लान्झा किंवा टोयोटा टायसर या लोकप्रिय गाड्या खरेदी करण्यासाठी या सवलतीचा फायदा होणार आहे.

जीएसटी दर कपात २२ सप्‍टेंबर २०२५ पासून लागू होत आहे. तर ‘बाय नाऊ अँड पे इन २०२६’ ऑफर ३० सप्‍टेंबर २०२५ पर्यंत वैध आहे. ही सवलत फक्‍त पश्चिम भारतातील (महाराष्‍ट्र, गुजरात, मध्‍यप्रदेश व गोवा) अधिकृत टोयोटा डिलरशिप्‍समध्‍ये उपलब्‍ध आहे.कंपनीच्या या सवलतीमध्ये ग्राहकांना तब्बल १ लाख रूपयांची बचत होऊ शकते.

ऑफरची वैशिष्‍ट्ये व फायदे (जवळपास १,००,००० रूपयांपर्यंत):

  • ३-महिने ईएमआय हॉलिडे – पहिल्‍या तीन महिन्‍यांसाठी प्रति महिना फक्‍त ९९ रूपये भरा: नियमित ईएमआय जानेवारी २०२६ पासून सुरू होतील.
  • ५ कॉम्‍प्‍लीमेण्‍टरी सर्विस सेशन्‍स – परिपूर्ण समाधानाची खात्री देतात.
  • ५-वर्ष एक्‍स्‍टेण्‍डेड वॉरंटी – टोयोटाच्‍या टिकाऊपणा व विश्वसनीयतेप्रती कटिबद्धतेला अधिक दृढ करते.
  • कॉर्पोरेट अँड एक्‍स्‍चेंज बोनस – कॉर्पोरेट ग्राहकांसाठी आणि एक्‍स्‍चेंजचा अवलंब करणाऱ्या ग्राहकांसाठी अतिरिक्‍त बचत.
  • संरक्षण कर्मचाऱ्यांसाठी विशेष फायदे – विशेष विशेषाधिकारासह देशाच्‍या संरक्षकांचा सन्‍मान.