पुणे : भारतातील अग्रगण्य परदेश शिक्षण सल्लागार संस्था स्टडी स्मार्ट तर्फे ‘ग्लोबल एज्युकेशन फेअर २०२५’ चे आयोजन आज पोचा हॉल, बोट क्लब, पुणे येथे करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी हा कार्यक्रम एकाच छताखाली संपूर्ण मार्गदर्शन देणारा ठरला, या ग्लोबल एज्युकेशन फेअरला पुण्यातील विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, दिवसभरात ९०० हून अधिक विद्यार्थी, पालकांनी मोफत मार्गदर्शनाचा लाभ घेतल्याची माहिती स्टडी स्मार्टचे व्यवस्थापकीय संचालक चेतन जैन यांनी दिली.
पुढे बोलताना चेतन जैन म्हणाले की, बारावी किंवा पदवी पूर्ण केल्यानंतर हजारो विद्यार्थी परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न बाळगतात; मात्र योग्य विद्यापीठाची निवड, प्रवेशप्रक्रिया, शिष्यवृत्ती, आर्थिक नियोजन आणि राहण्याची सोय याबाबत अनेकांना संभ्रम असतो. ग्लोबल एज्युकेशन फेअर या सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी विशेष रचण्यात आला आहे. यात विद्यार्थ्यांना यूके, यूएसए, आयर्लंड, जर्मनी, दुबईसह विविध देशांतील ६० हून अधिक नामांकित विद्यापीठांच्या प्रतिनिधींशी थेट संवाद साधता आला.
या फेअरमध्ये शिष्यवृत्ती, आर्थिक मदत योजना, जानेवारी व सप्टेंबर २०२६ प्रवेश संधी, स्पॉट ऑफर्स, IELTS वेव्हर्स, तसेच परदेशात शिक्षणानंतर उपलब्ध होणाऱ्या नोकरीच्या संधींबाबत मार्गदर्शन करणाऱ्या इंटरॅक्टिव्ह वर्कशॉप्स आयोजित करण्यात आले होते, यामध्ये स्टडी स्मार्टचे तज्ज्ञ काउन्सेलर्सनी प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांना संपूर्ण मोफत मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज, परदेशातील निवासव्यवस्था, फॉरेक्स व प्रवास सहाय्य यांसाठी स्वतंत्र डेस्क्स देखील ठेवण्यात आले होते, असेही जैन यांनी सांगितले.
