Manchar Accident : मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाकडे परीक्षेसाठी पायी जात असलेल्या तरुणीला भरधाव कारने जोरदार धडक दिली. या अपघातात ऋतुजा चंद्रकांत पारधी (वय १९, रा. पिंपळगाव-खडकी) गंभीर जखमी झाली असून तिच्यावर मंचर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मंगळवारी (ता. २३) मंचर शहरातील पिंपळगाव फाटा परिसरातील स्वामी समर्थ मंदिराजवळ हा अपघात झाला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या घटनेचे दृश्य कैद झाले आहे. रसायनशास्त्राच्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी जात असताना ऋतुजाला समोरून आलेल्या चारचाकी वाहनाने धडक दिली. धडकेमुळे ती सात ते आठ फूट उंच हवेत उडून रस्त्यावर कोसळली. तिच्या डाव्या पायाला व टाचेला गंभीर दुखापत झाली असून सध्या तिची प्रकृती स्थिर आहे.
कार चालक शरदराव शिंदे यांनीच ऋतुजाला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र बुधवार (ता. २४) रात्रीपर्यंत अपघाताची फिर्याद कोणाकडूनही मंचर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली नसल्याची माहिती मंचर पोलिसांनी दिली.