मुंबई, 15 सप्टेंबर 2025: भारतातील प्रथम क्रमांकाचा ट्रॅक्टर ब्रँड महिंद्रा ट्रॅक्टर आपल्या महत्वपूर्ण ‘महिंद्रा NOVO ट्रॅक्टर सिरीज’ चा 11 वा वर्धापन दिन अभिमानाने साजरा करत आहे.
मजबूत बांधणी असलेली, महिंद्रा NOVO ट्रॅक्टर मालिका टिकाऊपणा, आधुनिक तंत्रज्ञान आणि शक्तिशाली तरीही इंधन कार्यक्षम इंजिनसाठी डिझाईन करण्यात आली आहे. उच्च कमाल टॉर्क आणि उत्कृष्ट बॅकअप टॉर्कमुळे ही मालिका विविध शेती उपकरणांमध्ये अतुलनीय कामगिरी करते. 49 HP ते 74 HP पर्यंतच्या विविध हॉर्सपॉवर पर्यायांमध्ये उपलब्ध असलेली महिंद्रा NOVO ट्रॅक्टर मालिका नांगरणी, भुईसपाटीकरण, पेरणी आणि वाहतूक अशा विविध कृषी कामांसाठी आदर्श आहे.
महिंद्रा NOVO ट्रॅक्टर मालिकेत NOVO 605 DI PS, NOVO 605 DI PP, NOVO 655 DI PP आणि NOVO 755 DI PP या 2WD आणि 4WD मधील प्रकार समाविष्ट आहेत. प्रत्येक मॉडेल भारतीय शेतीच्या विविध परिस्थितींनुसार तयार केले गेले असून कार्यक्षमता, सोय आणि बहुपयोग यानुसार नवे मापदंड निश्चित करते.
या महत्त्वाच्या टप्प्याचे औचित्य साधत, महिंद्रा ट्रॅक्टर्सने भारतीय शेतीसाठी खास तयार केलेल्या प्रीमियम वैशिष्ट्यांसह NOVO ट्रॅक्टर मालिकेचे उन्नतीकरण केले आहे. यात क्रिपर मोड. mBoost तंत्रज्ञान, स्मार्ट बॅलन्सर टेकनॉलॉजी आणि ‘QLift’ सह महालिफ्ट हायड्रोलिक यंत्रणा यांचा समावेश आहे. या सुधारणा 50HP च्या वर असलेल्या मॉडेल्समध्ये उपलब्ध आहेत आणि आता ही मालिका प्रीमियम मेटॅलिक रेड रंगात देखील उपलब्ध आहे. तसेच, महिंद्रा ने NOVO मालिकेत 6-वर्षांची स्टँडर्ड वॉरंटी सुद्धा सादर केली आहे.
क्रिपर गियर मोड 0.3 ते 0.4 km/h इतक्या कमी गतीने काम करण्यास सक्षम करते. त्यामुळे रोटाव्हेटर्स सारखी यंत्रणा वापरून कांदा लावणी आणि केळी मल्चिंगसारखी अचूक कामे सहज केली जातात. यामुळे नुकसान कमी होते आणि उत्पादन वाढते.
महिंद्रा ट्रॅक्टर्सचे क्रांतिकारी, भविष्यवेधी तंत्रज्ञान CRDE इंजिनसह, NOVO मालिकेत प्रथमच mBoost तंत्रज्ञान सादर करण्यात आले आहे. यामुळे ऑपरेटर्सना विविध कृषी आणि व्यावसायिक कामांसाठी उपयुक्त असणाऱ्या डीझेल सेव्हर, नॉर्मल आणि पॉवर अशा 3 वेगवेगळ्या ड्राईव्ह मोड्समध्ये काम करता येते.
स्मार्ट बॅलन्सर टेकनॉलॉजी इंजिनचा आवाज आणि कंपन कमी करते. त्यामुळे दीर्घकाळ वापरातही शांत आणि आरामदायी अनुभव मिळतो. फॉरवर्ड रिव्हर्स FR शटलसह स्मूथ गिअर शिफ्टिंग हे वैशिष्ट्य आणखी सोयीस्कर करते. त्यामुळे बांधकाम, खाणकाम आणि इतर उद्योगांमध्ये लोडर आणि डोझर वापरासाठी हा ट्रॅक्टर आदर्श ठरतो.
महिंद्रा NOVO ट्रॅक्टर मालिकेतील अत्याधुनिक महालिफ्ट हायड्रोलिक प्रणाली 2700 – 2900 किलोची सर्वोत्तम लिफ्ट क्षमता देते. ‘QLift’ बटणाद्वारे ही हायड्रोलिक यंत्रणा सहज चालवता येते. उच्च पंप फ्लोमुळे सुपर सिडर्स, बटाटा प्लांटर्स सारखी जड उपकरणे सहज उचलता येतात. QLift मुळे PTO पॉवरचा पूर्ण उपयोग होतो आणि रोटाव्हेटर, सर्व प्रकारचे नांगर, TMCH (ट्रॅक्टर माउंटेड कम्बाईन हार्वेस्टर), मल्चर आणि पॉवर हॅरोज यांचा वापर सोपा होतो.
महिंद्रा NOVO ट्रॅक्टर मालिकेत अत्याधुनिक डीजीसेन्स तंत्रज्ञानही दिले गेले आहे. त्याद्वारे शेतकरी आपले ट्रॅक्टर मोबाईलवरून रिमोटली मॉनिटर करू शकतात. डीजीसेन्स इंधन वापर, व्यापलेले क्षेत्र, केलेल्या ट्रिप्स आणि ट्रॅक्टर परफॉर्मन्स याबाबत माहिती देते. जिओफेन्सिंग वैशिष्ट्यामुळे ट्रॅक्टर पूर्वनिर्धारित म्हणजेच आपण आखून दिलेल्या क्षेत्रातच राहतो.
NOVO ट्रॅक्टर मालिकेचे फ्लॅट प्लॅटफॉर्म ऑपरेटरसाठी हालचाल सुलभ करते. 8-इंच एअर क्लीनर आणि मोठे रेडिएटर्स इंजिनचे तापमान नियंत्रित ठेवतात. त्यामुळे जास्त काळ वापर शक्य होतो.
वैशिष्ट्यपूर्ण NOVO ट्रॅक्टर मालिकेने 11 वर्षांचा टप्पा गाठल्याच्या निमित्ताने, महिंद्रा ट्रॅक्टर्सने तरुण वाहकांसाठी टफ ट्रॅक्टरचे स्केल रेप्लिका असलेले एक रायड-ऑन टॉय ट्रॅक्टर सुद्धा सादर केले आहे.
कंपनी पुढील फॅक्टरी-फिटेड वैशिष्ट्ये पर्यायी स्वरूपात देणार आहे:
- फॅक्टरी-फिटेड फायबर कॅनोपी: दीर्घकाळ उन्हात काम करताना ऑपरेटरला संरक्षण देते.
- फॅक्टरी-फिटेड ॲक्सेसरीज: वाढीव सुरक्षा आणि टिकावूपणा यासाठी जेरिकेन वजन, पुढील टायर मडगार्ड आणि ROPS (रोल ओव्हर प्रोटेक्शन स्ट्रक्चर) यांचा समावेश आहे.
- फॅक्टरी-फिटेड Aux Valve: अधिक उत्पादकतेसाठी विविध हायड्रॉलिक उपकरणांचा वापर सुलभ करते.
- 4-वे ॲडजस्टेबल कॅप्टन सीट विथ आर्म रेस्ट: अप्रतिम सोय देते आणि दीर्घ वापरात थकवा कमी करते.