पुणे, १० सप्टेंबर २०२५ : देशातील आघाडीच्या खासगी आयुर्विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या बजाज अलियांझ लाइफ कंपनीने ‘बजाज अलियांझ लाइफ बीएसई ५०० एन्हान्स्ड व्हॅल्यू ५० इंडेक्स फंड’ हा नवा फंड (एनएफओ) सुरू केला आहे. हा फंड केवळ युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन्सअंतर्गत (युलिप) उपलब्ध असून, ‘बीएसई ५०० एन्हान्स्ड व्हॅल्यू ५० इंडेक्स’मधील समभागांत गुंतवणूक करून भांडवल वृद्धी साधण्याचे उद्दिष्ट या फंडाने ठेवले आहे. त्याचबरोबर गुंतवणूकदारांना आयुर्विम्याचे संरक्षण मिळत असल्याने नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध गुंतवणुकीची संधी त्यांना यातून मिळणार आहे.
या फंडाची निवड प्रक्रिया बुक-टू-प्राइस रेशो, अर्निंग्ज-टू-प्राइस रेशो आणि सेल्स-टू-प्राइस रेशो या तीन महत्त्वाच्या आर्थिक गुणोत्तरांवर आधारित आहे. या निर्देशकांच्या एकत्रित वापरामुळे एखाद्या कंपनीचे मूल्यांकन सर्वंकष पद्धतीने होऊ शकते. मालमत्ता, नफा आणि उत्पन्न या सर्व बाबींचा विचार यात केला जातो. त्यामुळे एखाद्या एकाच निर्देशकावर अवलंबून न राहता संतुलित गुंतवणूक पद्धत शक्य होते.
- बुक-टू-प्राइस रेशो : या गुणोत्तराची जास्त किंमत म्हणजे कंपनीकडे तिच्या बाजारमूल्याच्या तुलनेत मजबूत मालमत्ता ताळेबंद आहे, असे दर्शवते.
- अर्निंग्ज-टू-प्राइस रेशो : कंपनीच्या मूल्यांकनाच्या तुलनेत जास्त नफ्याची क्षमता हा रेशो दर्शवतो.
- सेल्स-टू-प्राइस रेशो : कंपनीच्या बाजार भांडवलाच्या तुलनेत तिची उत्पन्ननिर्मिती किती मजबूत आहे, हे या गुणोत्तरावरून कळते.
‘बजाज अलियांझ लाइफ बीएसई ५०० एन्हान्स्ड व्हॅल्यू ५० इंडेक्स फंड’ हा एक पॅसिव्हली (अप्रत्यक्षपणे) व्यवस्थापित फंड आहे. तो ‘बीएसई ५०० एन्हान्स्ड व्हॅल्यू ५० इंडेक्स’शी समांतर ठेवण्यात आला आहे. बाजारातील प्रवाह आणि आकडेवारीशी सुसंगत राहण्यासाठी हा फंड दर तिमाहीत अद्ययावत केला जातो. या रचनेमुळे गुंतवणूकदारांना शिस्तबद्ध पद्धतीने, दीर्घकालीन कालावधीत, उच्च संभाव्यता असलेल्या मूल्याधारित समभागांत गुंतवणुकीची संधी मिळते आणि त्याचवेळी सक्रिय व्यवस्थापनाशी संबंधित जोखीमही कमी राहते.
नव्या फंडाच्या सादरीकरणाप्रसंगी ‘बजाज अलियांझ लाइफ इन्शुरन्स’चे मुख्य गुंतवणूक अधिकारी श्रीनिवास राव रवुरी म्हणाले, “बजाज अलियांझ लाइफ बीएसई ५०० एन्हान्स्ड व्हॅल्यू ५० इंडेक्स फंड’ हा गुंतवणूकदारांना ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग’ या धोरणाचा लाभ शिस्तबद्ध पद्धतीने घेण्याची संधी देतो. या धोरणाने नेहमीच संयम आणि दीर्घकालीन बांधिलकीला चांगला परतावा दिला आहे. मोठ्या, मध्यम आणि लहान अशा विविध भांडवली वर्गातील आकर्षक मूल्यांकन असलेल्या कंपन्यांमध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करून हा फंड गुंतवणूकदारांना विविधीकृत इक्विटी गुंतवणुकीची संधी देतो. यामध्ये जोखीम आणि परतावा यांचे संतुलित नाते टिकवले जाते. आम्हाला विश्वास आहे की ही पद्धत गुंतवणूकदारांना काळानुसार टिकाऊ संपत्ती उभारण्यासाठी महत्त्वाची ठरेल.”
हा फंड विशेषतः दीर्घकालीन भांडवल वृद्धी साध्य करू इच्छिणाऱ्या, उच्च जोखीम स्वीकारण्याची तयारी असलेल्या आणि शिस्तबद्ध, नियमाधारित गुंतवणूक पसंत करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी उपयुक्त आहे. ‘बजाज अलियांझ लाइफची युलिप उत्पादने, ज्यामध्ये बजाज अलियांझ लाइफ बीएसई ५०० एन्हान्स्ड व्हॅल्यू ५० इंडेक्स फंड समाविष्ट आहे, पॉलिसीधारकांना त्यांच्या आयुष्याची उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करतात; याचे कारण आयुर्विम्याचे संरक्षण आणि संपत्ती निर्माण करण्याची संधी ती एकाच वेळी उपलब्ध करून देतात.
या निर्देशांकाच्या ऐतिहासिक कामगिरीवरून त्याची क्षमता स्पष्ट होते. मध्यम ते दीर्घ कालावधीत त्याने व्यापक बाजार भांडवल निर्देशांकांच्या तुलनेत अधिक परतावा दिला आहे. तथापि, यापूर्वीची कामगिरी भविष्यातील निकालांची हमी देत नाही, हे गुंतवणूकदारांनी लक्षात घ्यावे.