पुणे, १२ सप्टेंबर २०२५ – इशान्या फाउंडेशन आणि नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने १८ वा यलो रिबन एनजीओ फेअर (YRNF) – ग्रामीण भारत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. हा पाच दिवसीय महोत्सव भारताच्या समृद्ध परंपरा, शाश्वत हस्तकला आणि समुदाय-आधारित नवकल्पना यांचा उत्सव असून १८ ते २२ सप्टेंबर २०२५ दरम्यान क्रिएटिसिटी, येरवडा, पुणे येथे सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन स्वदेश फाउंडेशनच्या ट्रस्टी श्रीमती झरीना स्क्रूवाला, इशान्या फाउंडेशनच्या ट्रस्टी श्रीमती पारुल मेहता आणि नाबार्डच्या सीजीएम श्रीमती रश्मी दराड यांच्या हस्ते होणार आहे.
यंदाच्या महोत्सवाची संकल्पना “एक्सप्लोर, एम्ब्रेस, इव्हॉल्व” असून ती कारागीर, शेतकरी, विणकर, स्वयंसेवी संस्था (NGO) आणि सामाजिक उपक्रम यांच्या प्रेरणादायी प्रवासावर प्रकाश टाकते. या फेअरमध्ये २० पेक्षा अधिक राज्यांमधील ३,०००+ अनोख्या उत्पादनांचा समावेश असून खरेदीसोबत ज्ञान, संस्कृती आणि समाजसेवा अनुभवण्याची अनोखी संधी मिळणार आहे. “खरेदी म्हणजे देणगी, संस्कृती म्हणजे उत्सव, आणि प्रत्येक खरेदीमागे असते एक कहाणी.”
YRNF २०२५ मधील ठळक वैशिष्ट्ये
* २० पेक्षा अधिक राज्यांतील ३,०००+ हस्तनिर्मित आणि पर्यावरणपूरक उत्पादने
* एनजीओ, कारागीर, शेतकरी व विणकरांसोबत थेट संवाद
* हस्तनिर्मित वस्त्र व कापड: साड्या, स्टोल, शाली आणि वारसा फॅब्रिक्स
* सेंद्रिय व नैसर्गिक उत्पादनं: मध, सुका मेवा, गूळ, मसाले, बाजरी, भाजीपाला आणि बरेच काही
* रीसायकल व अपसायकल नवकल्पना – शाश्वततेचा प्रचार
* लाइफस्टाइल व सणासुदीची सजावट: टोपल्या, बॅग्स, पेंटिंग्स, कलाकृती आणि गिफ्ट आयडिया
* पर्यावरणपूरक भांडी: माती, टेराकोटा, काळा दगड व लाकडी उत्पादने
* अस्सल मराठमोळे खाद्यपदार्थ – पुरणपोळी, थालिपीठ, पिठलं-भाकरी, बाजरीच्या रोट्या आणि इतर चविष्ट पदार्थ
खरेदीपेक्षा अधिक – संपूर्ण कुटुंबासाठी अनुभव
यलो रिबन एनजीओ फेअर हे केवळ खरेदीसाठी नसून, संपूर्ण कुटुंबासाठी एक आनंदमहोत्सव आहे:
* कारागीरांशी संवाद – हस्तकला, शेती, विणकाम व शाश्वततेबद्दल चर्चा
* ट्रॅम्पोलिन पार्क आणि प्ले झोन – लहान मुलांसाठी खास
* तासागणिक लकी ड्रॉ – उत्सवाचा आनंद द्विगुणित
* लाइव्ह फूड काउंटर्स
थेट प्रभाव निर्माण करणारे व्यासपीठ
यलो रिबन एनजीओ फेअरमधील प्रत्येक स्टॉल सक्षमीकरण, समावेशन आणि संघर्षावर मात करण्याची कहाणी सांगतो. या फेअरमध्ये खरेदी करून भेट देणारे थेट योगदान देतात:
* महिला सक्षमीकरण व उपजीविका कार्यक्रम
* विणकर आणि कारागीरांच्या टिकावासाठी मदत
* सेंद्रिय शेती आणि ग्रामीण विकास
* युवा कौशल्य विकास व रोजगार निर्मिती
* मानसिक आरोग्य व समावेशन उपक्रम
* दृष्टीहीन, श्रवणबधिर व अपंग व्यक्तींचे सक्षमीकरण
* रीसायकल व अपसायकल प्रकल्पांद्वारे शाश्वत जीवनशैलीचा प्रसार
“यलो रिबन एनजीओ फेअर हे केवळ एक बाजार नाही, तर हा उपजीविका, परंपरा आणि शाश्वततेचा उत्सव आहे,” असे इशान्या फाउंडेशनच्या ट्रस्टी श्रीमती पारुल मेहता यांनी सांगितले.
“येथील प्रत्येक खरेदी महिलांना सशक्त करते, शेती व विणकाम समुदायांना आधार देते, मानसिक आरोग्य उपक्रमांना हातभार लावते आणि भारताच्या समृद्ध हस्तकला वारशाचे जतन करते.”