ज्योतिषशास्त्रानुसार दैनंदिन राशीभविष्य हे ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीवर आधारित असतं. यात नोकरी, व्यवसाय, कुटुंब, आरोग्य आणि दिवसातील शुभ-अशुभ घटना यांचा अंदाज मिळतो. पाहूया आजचा दिवस तुमच्या राशीसाठी काय घेऊन आलाय.
♈ मेष
बौद्धिक काम करणाऱ्यांना वरिष्ठांशी चांगले संबंध ठेवण्याचा फायदा होईल. कामाच्या ठिकाणी विरोधक त्रास देऊ शकतात. राजकीय क्षेत्रात जुन्या इच्छांची पूर्तता होण्याची शक्यता.
♉ वृषभ
जुन्या चुका त्रासदायक ठरू शकतात, त्यांची दुरुस्ती करा. नोकरी किंवा उपजीविकेच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळेल. मेहनत जास्त पण परिणाम अपेक्षेइतके मिळणार नाहीत.
♊ मिथुन
प्रिय व्यक्तीपासून दूर राहिल्याने मन खट्टू होईल. कौटुंबिक चिंता वाढू शकते. नोकरीत केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. व्यवसायात परिश्रमाचे गोड फळ मिळेल.
♋ कर्क
दिवसाची सुरुवात चांगल्या बातमीने होईल. कामाच्या ठिकाणी आराम आणि सुविधा मिळतील. तांत्रिक क्षेत्रात नफा, तर सरकारी नोकरीत वरिष्ठांशी समन्वय गरजेचा.
♌ सिंह
महत्त्वाच्या कारणासाठी प्रवास करावा लागेल, पण त्रास होण्याची शक्यता. नोकरीत बढतीचे संकेत, सरकारी लाभ मिळेल. काम-व्यवसायात अधिक लक्ष द्या.
♍ कन्या
एखाद्या खास व्यक्तीला भेटण्याची संधी. शहाणपणाने अडथळे टाळाल. मात्र विरोधक प्रतिष्ठेला धक्का देण्याचा प्रयत्न करतील.
♎ तूळ
अनिच्छित प्रवास संभवतो. नोकरीसाठी दिलेल्या मुलाखतीत यश मिळू शकतं. व्यवसायात कुटुंब व मित्रांचे सहकार्य. शेतीत अडचणी संभवतात.
♏ वृश्चिक
घरात शुभ घटना घडेल. नोकरीतील समस्या सुटतील. मित्रांसोबत तीर्थयात्रा किंवा देवदर्शन शक्य. राजकारणात नवीन सहयोगी लाभदायक ठरतील.
♐ धनु
आईसोबत वाद होण्याची शक्यता. जमिनीशी संबंधित कामात विलंब. राजकारणात अपेक्षित सार्वजनिक पाठिंबा मिळेल.
♑ मकर
गोड बोलणे आणि साधेपणा यामुळे लोक आकर्षित होतील. राजकारणात प्रभावी भाषणासाठी कौतुक. महत्त्वाच्या कामात यश मिळाल्याने आत्मविश्वास वाढेल.
♒ कुंभ
राजकारणात पक्ष बदलण्यापूर्वी नीट विचार करा. व्यवसायात नफा आणि प्रगतीच्या संधी. मेहनतीचे चांगले फळ मिळेल.
♓ मीन
नोकरदारांना नवी संधी मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात रस वाढेल. व्यवसाय प्रवासाचा खर्च सामान्य. बहुराष्ट्रीय कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना वरिष्ठांचा लाभ. नवीन व्यवसाय सुरू करण्याची शक्यता.