लोणावळा (प्रतिनिधी मानस मते) : पुण्यातील २९ वर्षीय तरुणाचा भाजे धबधब्याजवळ शनिवारी दुपारी पाय घसरून मृत्यू झाला. विसापूर किल्ल्यावर जाण्यासाठी शॉर्टकट वाट निवडल्यामुळे ही दुर्घटना घडली.
मृत तरुणाचे नाव अब्राहम शिंसे (वय २९, रा. बेथनी आश्रम, रामवाडी, पुणे) असे आहे. तो सुमारे २० जणांच्या गटासह लोहगड-विसापूर किल्ला परिसरात ट्रेकिंगसाठी आला होता. त्यांनी भाजे धबधब्यावर थांबून आनंद लुटल्यानंतर, विसापूर किल्ल्याकडे जाण्यासाठी पुढे निघाले.
नेहमीची वाट टाळून अब्राहमने भाजे गावाजवळील लेणी व धबधब्याच्या बाजूने आडवाट पकडली. मात्र, तेथे पाय घसरल्याने तो सुमारे ३० ते ४० फूट खोल दरीत कोसळला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढून पुढील तपास सुरू केला आहे.