महाराष्ट्र कामगार सुरक्षा दल आणि झोपडपट्टी सुरक्षा दल यांच्या वतीने भव्य क्रांती ज्योत सभेचे आयोजन करण्यात आले होते. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न हा पुरस्कार देऊन सन्मानीत करावे. या मागण्यांसाठी अण्णा भाऊच्या जन्मभूमी वाटेगावपासून साहित्य क्रांती ज्योतीचे आगमण होऊन ती (ता. ३१) रोजी पुण्यातील अण्णा भाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा स्वारगेट येथे आणली. या साहित्य क्रांती ज्योतीच्या आंदोलनाचे जाहिर सभेत रुपांतर झाले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक रत्नलाल सोनाग्रा, जेष्ठ गांधीवादी विचारवंत कुमार सप्तश्री आणि स्वागताध्यक्ष भगवानराव वैराट उपस्थित होते.
रत्नालाल सोनाग्रा म्हणाले की अण्णा भाऊ यांचे कार्य महान होते. त्यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान मोठे आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णांनी शाहिरीतून चळवळ उभी केली. देशाच्या व महाराष्ट्राच्या जडणघडणीत अण्णाभाऊंचे योगदान मोठे आहे. अशा महान साहित्यिकडून आपण सर्वांनी आदर्श घेवून समाजहिताचे कार्य केले पाहिजे.
सप्तर्षी म्हणाले की, “लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी रशियामध्ये महाराष्ट्राची ओळख करून देताना अण्णांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गायला होता. साहित्य क्षेत्रात, संयुक्त महाराष्ट्राच्या रणसंग्रामात अण्णांचे योगदान मोठे आहे. वाटेगावपासून पुण्यापर्यंत “साहित्य क्रांती ज्योत” ही झोपडपट्टी सुरक्षा दला तर्फे ४ दिवस पायी प्रवास करत आणण्यात आली.
वैराट म्हणाले की देशाच्या जडणघडणीत ज्या राष्ट्रीय महापुरुषांनी फार मोठे योगदान दिले आहे. राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीत शाहिरीने समाज जागृती करणाऱ्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे अशी मागणी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काशिनाथ गायकवाड यांनी केले. तर आभार संतोष कदम यांनी मानले.
मोहम्मद शेख, शिवाजी भिसे, हरिभाऊ वाघमारे, दत्ता डाडर, सुनिता जाधव, राजाभाऊ शिंदे, नितीन वन्ने अभिजीत ननावरे , शिवाजी अवघडे, दत्ता कांबळे आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.