चेन्नई, 29 जुलै 2025: स्टार हेल्थ अॅण्ड अलाईड इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (स्टार हेल्थ इन्शुरन्स) ही भारतातील सर्वात मोठी हेल्थ इन्शुरन्स कंपनी असून, कंपनीने Q1FY26 चे आर्थिक निकाल जाहीर करत स्थीर वृद्धी आणि सुधारीत नफा क्षमता दाखवली आहे, तसेच रिटेल हेल्थ इन्शुरन्स क्षेत्रातील आपले नेतृत्वस्थान पुन्हा सिद्ध केले आहे.
30 जून 2025 रोजी संपलेल्या तिमाहीत, स्टार हेल्थ इन्शुरन्सने 3,936 कोटी रुपयांचे प्रिमियम जमा (GWP) केले आहे, ज्यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत (1/N आधारावर) 13% वाढ झाली आहे. कंपनीचा IFRS प्रमाणे नोंदवलेला करपश्चात नफा (PAT) 438 कोटी रुपये झाला असून, यामध्ये मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 44% वाढ झाली आहे.
IFRS आधारावर एकूण कम्बाइंड रेशो Q1FY26 साठी 99.6% इतका होता. ही कामगिरी नवीन रिटेल प्रीमियममध्ये झालेल्या मजबूत वाढी आणि काटेकोर अंडररायटिंग पद्धतींच्या जोरावर शक्य झाली आहे. क्लेम्स एनपीएस 45.8 वरून वाढून 57 वर पोहोचला आहे, ज्यामुळे सुधारलेला क्लेम्स अनुभव स्पष्टपणे दिसून येतो.
स्टार हेल्थ अॅण्ड अलाईड इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आनंद रॉय यांनी सांगितले की, “आम्ही FY26 ची सुरुवात स्थिर गतीने केली असून, आमच्या मुख्य विभागांमध्ये उत्साहवर्धक वाढ झाली आहे आणि गेल्या दोन वर्षांत आम्ही केलेल्या संरचनात्मक बदलांचे सकारात्मक परिणामही दिसून येत आहेत. या तिमाहीत आम्ही जोखीम निवडीत सावध राहिलो, महत्त्वाचे प्राइसिंग आणि अंडररायटिंग बदल केले आणि क्लेम्स सेवा अनुभवात सुधारणा केली. आमचा एजन्सी चॅनेल व्यवसायाचा कणा राहिला आहे, ज्याला डिजिटल, बँकासुरन्स आणि एसएमई ग्रुप व्यवसायाचेही चांगले पाठबळ मिळाले आहे. आमचा डिजिटल व्यवसाय चांगल्या पद्धतीने वाढत असून, तो आता फायदेशीर वृद्धीचा स्रोत बनत आहे. तंत्रज्ञान, ऑटोमेशन आणि फ्रॉड अॅनालिटिक्समध्ये केलेल्या गुंतवणुकीमुळे आम्हाला अधिक चांगले परिणाम मिळत आहेत. पुढे पाहता, आमचा भर टिकावू वाढीवर आणि सर्व स्टेकहोल्डर्ससाठी दीर्घकालीन मूल्यनिर्मितीवर राहणार आहे.”
कंपनीच्या कामगिरीचा आधार ठरणारे रिटेल हेल्थ सेगमेंटने Q1FY26 मध्ये 3,667 कोटी रुपयांचे (N आधारावर) GWP मध्ये योगदान दिले. रिटेल GWP मध्ये वार्षिक तुलनेत 18% वाढ झाली असून, नवीन रिटेल प्रीमियममध्ये 25% वाढ नोंदवली गेली आहे. स्टार हेल्थच्या ग्राहक अॅपने या तिमाहीत 1.1 कोटी डाऊनलोड्सचा टप्पा पार केला असून, त्यात रिअल टाइम क्लेम्स ट्रॅकिंग, डॉक्युमेंट सबमिशन यांसारख्या अनेक नवकल्पना सुरू करण्यात आल्या. Super Star आणि Star Flexi यांसारख्या नवीन प्रॉडक्ट लाँचेसना चांगला प्रतिसाद मिळत असून, गेल्या 12 महिन्यांत त्यांनी मिळून INR 1000 कोटींपेक्षा अधिक प्रीमियम जमा केले आहेत.