30 जून 2025 रोजी संपलेल्या कालावधीसाठी एसबीआय लाईफ इन्शुरन्सने 7,268 कोटी रुपयांचा न्यू बिझनेस प्रीमियम नोंदवला

देशातील आघाडीची जीवन विमा कंपनी असलेल्या एसबीआय लाईफ इन्शुरन्सने 30 जून 2025 रोजी संपलेल्या कालावधीत 7,268 कोटी रुपयांचा न्यू बिझनेस प्रीमियम नोंदवला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीसाठी हा प्रीमियम 7,033 कोटी रुपये होता. तर 30 जून 2024 रोजी संपलेल्या याच कालावधीच्या तुलनेत यंदा नियमित प्रीमियममध्ये 12% ची वाढ झाली आहे.

संपूर्ण लक्ष सुरक्षेवर केंद्रित करत एसबीआय लाईफचा प्रोटेक्शन न्यू बिझनेस प्रीमियम 30 जून 2025 रोजी संपलेल्या कालावधीसाठी 980 कोटी रुपये होता. तर प्रोटेक्शन इंडीव्हिज्युअल न्यू बिझनेस प्रीमियम याच कालावधीसाठी 165 कोटी रुपये होता. 30 जून 2024 रोजी संपलेल्या कालावधीच्या तुलनेत वैयक्तिक नवीन व्यवसाय प्रीमियम 4% वाढीसह 4,939 कोटी रुपये होता.

30 जून 2025 रोजी संपलेल्या कालावधीत एसबीआय लाईफचा कर वजा जाता नफा 594 कोटी रुपये झाला आहे, जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील नफ्यापेक्षा 14% नी वाढला आहे.

कंपनीचा सॉल्व्हन्सी रेशो सामान्यपणे 1.50 च्या आसपास असण्याची आवश्यकता असते. त्या तुलनेत 30 जून 2025 रोजी 1.96 वर राहिला आहे.

एसबीआय लाईफच्या एयूएममध्ये 15% ने वाढ होऊन 30 जून 2025 रोजी तो 4,75,813 कोटी रुपये झाला. गेल्या वर्षी याच कालावधीत (30 जून 2024) तो 4,14,772 कोटी रुपये होता, ज्यात डेबिट-इक्विटीचे गुणोत्तर 60:40 होते. 94% कर्ज गुंतवणूक AAA आणि सॉवरेन इंस्ट्रुमेंट्समध्ये आहे.

कंपनीकडे 3,23,838 प्रशिक्षित विमा व्यावसायिकांचे वितरण नेटवर्क आहे तसेच देशभरात 1,146 कार्यालये देखील आहेत. यामध्ये मजबूत बँकाश्युरन्स चॅनल, एजन्सी चॅनल आणि कॉर्पोरेट एजंट्स, ब्रोकर्स, पॉइंट ऑफ सेल पर्सन (पीओएस), विमा मार्केटिंग फर्म्स, वेब एग्रीगेटर्स आणि डायरेक्ट बिझनेस यांचा समावेश आहे.

30 जून 2025 रोजी संपलेल्या कालावधीतील कामगिरी

  • आयआरपी आणि इंडस्ट्रीज एनबीपीमध्ये खासगी बाजारपेठेतील अनुक्रमे 22.3% आणि  25% बाजार हिस्सा घेत आघाडी.
  • वार्षिक प्रीमियम इक्विव्हॅलंटमध्ये (एपीई) 9% वाढ नोंदवत रु. 3,969 कोटी.
  • 73% वाढ नोंदवून वैयक्तिक नवीन व्यवसाय विमा रक्कम रु. 66,631 कोटी.
  • 13 दशलक्ष आणि 61 दशलक्ष स्थिरतेमध्ये अनुक्रमे 58 बीपीएस आणि 501 बीपीएसने सुधारणा.
  • नवीन व्यवसायाचे मूल्य (व्हीओएनबी) 12% वाढीसह 1,088 कोटी रु.
  • व्होएनबी मार्जिन 27.4 % .
  • इंडियन एम्बेडेड व्हॅल्यू (आयईव्ही) 20% वाढ नोंदवत 74,257 कोटी रु. झाली आहे.
  • 14% वाढीसह करपश्चात नफा (PAT) 594 कोटी रु. झाला आहे.
  • सॉल्व्हन्सी रेशो मजबूत 1.96 वर.
  • 15% वाढीसह व्यवस्थापनाखालील मालमत्ता 4,75,813 कोटी रु. झाली आहे.