Saswad Crime : सासवडजवळ एक कोटींच्या विदेशी दारूची तस्करी; ५७ हजार व्हिस्की बाटल्या जप्त, एकाला अटक

Saswad Crime : सासवड परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत गोव्यातून बेकायदेशीररित्या आणलेल्या ५७ हजारहून अधिक व्हिस्कीच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. एक कोटी १५ लाख रुपयांचा दारू साठा पकडण्यात आला असून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या कारवाईने दारू तस्करांच्या हालचालींना मोठा दणका बसला आहे.

गुप्त माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे अधीक्षक कार्यालयाच्या सासवड विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. शुक्रवार, ११ जुलै रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास, जेजुरी-सासवड मार्गावरील वीर फाटा परिसरात पथकाने सापळा लावून एक सहाचाकी कंटेनर थांबवला.

तपासणीदरम्यान पथकाला कंटेनरमध्ये गोव्यातील बनावटीच्या व्हिस्कीच्या १८० मि.ली.च्या बाटल्या असलेले १,२०४ बॉक्स आढळून आले. प्रत्येकी बॉक्समध्ये ४८ बाटल्या, अशा एकूण ५७,७९२ बाटल्या जप्त करण्यात आल्या.

कारवाईत पकडण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत –

दारू साठा : ₹१.१५ कोटी

वाहन, मोबाईलसह एकूण जप्ती : ₹१.३३ कोटी

या प्रकरणी कंटेनरच्या चालकाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

BIG NEWS PMC : पुणे महापालिकेत मोठा बदल होण्याची शक्यता; नगरसेवकांची संख्या १७५ पेक्षा अधिक होण्याची चिन्हं!

पुढील तपास सासवड विभागाचे निरीक्षक संभाजी बरगे करत आहेत.

ही कारवाई अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक संतोष जगदाळे, निरीक्षक संभाजी बरगे, दुय्यम निरीक्षक रोहित माने, धवल गोलेकर, शितल शिंदे, सहायक दुय्यम निरीक्षक सागर धुर्वे, संदीप मांडवेकर, जवान तात्या शिंदे, अमोल कांबळे, दत्तात्रय पिलावरे, संजय गोरे, बाळासो आढाव आणि वाहनचालक अंकुश कांबळे यांच्या पथकाने केली.

BIG NEWS : अखेर काँग्रेसला धक्का ! संजय जगताप यांचा पुणे जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाचा तसेच काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण; कोणत्या पक्षात प्रवेश करणार? की राजकारणातून संन्यास घेणार? सासवडमध्ये अनेक चर्चा

या मोठ्या कारवाईने राज्यातील दारू तस्करीच्या साखळीवर प्रशासनाने मोठा धक्का दिला असून, पुढील तपासाद्वारे या मागील रॅकेटचा खुलासा होण्याची शक्यता आहे.