पुणे, 25 जून २०२४ : भारतातील सर्वाधिक विश्वासार्ह आणि आघाडीच्या दागिने कंपन्यांपैकी एक असलेल्या ‘कल्याण ज्वेलर्स’ने आज पुण्यातील विनायक स्कायडेल, हिंजवडी खुर्द येथे आपली नवीन शोरूम सुरू केली. या भव्य शोरूमचे उद्घाटन बॉलीवूड अभिनेता बॉबी देओल यांच्या हस्ते पार पडले. या नव्या शोरूमच्या माध्यमातून कल्याण ज्वेलर्सचा या भागातील ब्रँड म्हणून असलेला प्रभाव अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा आहे.
शोरूममध्ये ‘कल्याण ज्वेलर्स’च्या मोहक आणि वैशिष्ट्यपूर्ण डिझाईन्सची आकर्षक मालिका सादर करण्यात आली असून, त्यात मुहूर्त (लग्नासाठीचे दागिने), मुद्रा (हस्तकलेने बनवलेले प्राचीन दागिने), निमाह (देवालय शैलीतील दागिने) यांसारख्या लोकप्रिय हाऊस ब्रँड्सचा समावेश आहे.
या उद्घाटन सोहळ्यात ‘कल्याण ज्वेलर्स’च्या ‘कँडरे’ या लाइफस्टाईल ज्वेलरी ब्रँडचेही अनावरण करण्यात आले. आधुनिक डिझाईन्स आणि स्टायलिश दागिन्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या कँडरे आजच्या तरुणाईला, नोकरी-व्यवसाय करणाऱ्या महिलांना आणि स्टाइलप्रेमी पुरुषांना लक्षात घेऊन, हलक्याशा पण आकर्षक दागिन्यांचा संग्रह सादर करतो. येथे दागिन्यांची किंमत १०,००० रुपयांपासून असून, हे दागिने भेटवस्तूसाठीही योग्य आहेत. डिजिटल-फर्स्ट ब्रँड म्हणून सुरुवात करून आता ओम्नी-चॅनल रिटेलरपर्यंत वाटचाल करणाऱ्या ‘कँडरे’ने ऑनलाइन खरेदीची सोय आणि प्रत्यक्ष स्टोअरचा अनुभव यांचा सुरेख मेळ घालण्यावर भर दिला आहे.
कल्याण ज्वेलर्स आणि कँडरे यांच्या सिग्नेचर ज्वेलरी लाईनमधील विविध संग्रहांसह आणि आलिशान वातावरणासह सुसज्ज असलेले हे नवीन शोरूम या भागातील ग्राहकांना अप्रतिम खरेदीचा अनुभव देण्यासाठी सज्ज आहे.
उद्घाटनप्रसंगी बॉबी देओल म्हणाले, “कल्याण ज्वेलर्सच्या नवीन शोरूमच्या उद्घाटनासाठी येथे येणे ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. विश्वास, पारदर्शकता आणि ग्राहक-केंद्रितता या मूल्यांवर आधारित असलेल्या ‘कल्याण ज्वेलर्स’सारख्या प्रतिष्ठित ब्रँडचे प्रतिनिधित्व करणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. आम्हाला खात्री आहे की ग्राहक केवळ आमची सेवा नव्हे तर आमच्याकडील दागिन्यांच्या समृद्ध संग्रहाचंही मनापासून स्वागत करतील.”
शोरूम उद्घाटनाबाबत मत व्यक्त करताना ‘कल्याण ज्वेलर्स’चे कार्यकारी संचालक रमेश कल्याणरमण म्हणाले, “पुण्यातील आमच्या नव्या शोरूमच्या माध्यमातून आम्ही ग्राहकांच्या विविध गरजांची पूर्तता करणारी एक सर्वसमावेशक प्रणाली निर्माण करू इच्छितो. जागतिक दर्जाचे वातावरण देतानाच आम्ही आमच्या कंपनीच्या विश्वास आणि पारदर्शकतेच्या मूल्यांशी निष्ठावान राहून ग्राहकांचा अनुभव अधिक चांगला करण्याचा प्रयत्न करतो.”
या उद्घाटनाच्या निमित्ताने ‘कल्याण ज्वेलर्स’ने एक खास ऑफर जाहीर केली आहे. या ऑफरमध्ये सर्व दागिन्यांच्या घडणावळीवर २५ टक्के सूट देण्यात येईल, तसेच २ लाखांवरील खरेदीवर* ही सूट दुप्पट मिळणार आहे. या खरेदींवर ब्रँडचा ‘स्पेशल गोल्ड बोर्ड रेट’ लागू होईल. हा दर बाजारात सर्वात कमी असून सर्व शोरूममध्ये तो समान असतो. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठीच लागू आहे.
‘कल्याण ज्वेलर्स’मध्ये विक्रीसाठी उपलब्ध असलेले सर्व दागिने बीआयएस हॉलमार्क केलेले आहेत आणि अनेक स्तरांवरील शुद्धता चाचणीतून गेलेले असतात. याशिवाय ग्राहकांना ‘कल्याण ज्वेलर्स चारस्तरीय खात्री प्रमाणपत्र’ मिळेल. यामध्ये सोन्याची शुद्धता, दागिन्यांची आयुष्यभर मोफत देखभाल, उत्पादनाची सविस्तर माहिती आणि पारदर्शक एक्सचेंज व बायबॅक धोरण यांचा समावेश आहे. हे प्रमाणपत्र ब्रँडच्या उत्कृष्ट सेवा देण्याच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे.
या शोरूममध्ये ‘कल्याण’चे लोकप्रिय हाऊस ब्रँड्सदेखील उपलब्ध असतील. मुहूर्त (लग्नाचे दागिने), मुद्रा (हस्तकलेचे प्राचीन दागिने), निमाह (देवालय शैलीतील दागिने), ग्लो (डान्सिंग डायमंड्स), जिया (सॉलिटेअरप्रमाणे डायमंड्स), अनोखी (अनकट डायमंड्स), अपूर्वा (विशेष प्रसंगासाठीचे डायमंड्स), अंतरा (लग्नासाठी डायमंड्स), हेरा (दैनंदिन वापरासाठी डायमंड्स), रंग (मूल्यवान रत्नांचे दागिने) आणि अलीकडेच लाँच झालेला लीला (रंगीत रत्न व डायमंड्स यांचा संग्रह) यांचा त्यात समावेश आहे.