इंटेरिओ रिअल इस्टेट डेव्हलपर्सच्या साहाय्याने तयार फ्लॅट्सच्या पर्यायासह घर खरेदी सुलभ करते

मुंबई, जुलै 2025: गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपचा आघाडीचा गृह तसेच कार्यालयीन फर्निचर ब्रँड असलेल्या इंटेरिओने मुंबई, पुणे, बंगळुरू, दिल्ली एनसीआर आणि हैदराबाद यासह प्रमुख शहरांमधील आघाडीच्या रिअल इस्टेट डेव्हलपर्ससोच्या सहकार्याने त्यांचे रेडी-टू-फर्निश फ्लॅट सोल्युशन्स लाँच केले आहे. पूर्णपणे सुसज्ज नमुना फ्लॅट्स ऑफर करत घर खरेदीचा अनोखा अनुभव देणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. पूर्णपणे सुसज्ज नमुना फ्लॅट्समध्ये उत्तम  इंटीरियरसह फर्निचर देखील तयार असते. कस्टमायझेशन, परवडणारी किंमत तसेच टेक्नोसॅव्ही सुविधा देखील मिळतात. अशा प्रकारचा उपक्रम राबवणारा हा पहिलाच ब्रँड असून यामुळे केवळ घर खरेदीदारांची मागणी वाढत नाही तर त्यांच्या व्यवसायासाठी देखील एक कायमस्वरूपी ग्राहकवर्ग तयार होतो. पुढील पाच वर्षांत एकूण व्यवसायाच्या 10% व्यवसाय या ऑफरमुळे वाढेल, अशी इंटेरिओला अपेक्षा आहे. ब्रँडच्या वाढीच्या प्रवासातील त्यांचे धोरणात्मक महत्त्व यामुळे अधोरेखित होईल.

इंटरिओचे व्यवसाय प्रमुख आणि कार्यकारी उपाध्यक्ष स्वप्नील नगरकर या उपक्रमाबद्दल म्हणाले, “आधुनिक भारतीय घर खरेदीदाराला उत्कृष्ट घर देण्याच्या करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे हा उपक्रम प्रतिनिधित्व करतो. विकसित होत असलेल्या जीवनशैलीला पूरक अशी घरे आजचे घरमालक शोधत असतात.  इथे दर्जासोबतच कामाची शैली देखील अनोखी असते, तर तंत्रज्ञान आरामदायी जगणे देते. ग्राहक घर खरेदी करण्याचा विचार करत असतो, तेव्हाच आम्ही त्यांच्यासमोर अशाप्रकारे विचारपूर्वक डिझाइन केलेल्या आणि स्टायलिश उत्पादने असलेल्या जागा दाखवतो. यामुळे त्यांना आपल्याला काय हवे आहे, हे ठरवणे सोयीचे जाते. आमच्या क्युरेटेड मॉडेल फ्लॅट्समध्ये आम्ही तंत्रज्ञान आणि वास्तविक जगाचा उत्तम मेळ राखतो. ज्यामुळे ग्राहकांना अंदाज येतोच पण आधुनिक काळात ‘मूव्ह-इन रेडी’ म्हणजे नेमके काय, हे देखील त्यांच्या लक्षात येते.”

भारतातील प्रमुख विकासकांसोबत इंटेरिओने आधीच 50+ भागीदारी केली आहे. यात ओंगोल (आंध्र प्रदेश) येथील बीएमआर आणि अर्जुन इन्फ्रा प्रोजेक्ट्स, विजयवाडा (आंध्र प्रदेश) येथील द पार्क व्ह्यू आणि भुवनेश्वर (ओडिशा) येथील उत्कल ग्रीनएक्स यांचा समावेश आहे. याशिवाय आणखी काही भागीदारी होण्याच्या मार्गावर आहेत.

इंटेरिओ व्यवसायाचे 50% पेक्षा अधिक ग्राहक हे नवीन घर खरेदीदार आहेत. त्यामुळे, नव्याने घर घेणाऱ्यांशी संवाद साधण्यातील अनोखी संधी ब्रँडने ओळखली. या ऑफरमध्ये मॉड्यूलर आणि स्टँडर्ड बेडरूम फर्निचर, स्टील तसेच लाकडी वॉर्डरोब, जागेचा योग्य वापर करतानाच सौंदर्यशास्त्राचा उपयोग करून घेत मॉड्यूलर किचनपासून ते डिझाइन केलेल्या लिव्हिंग आणि डायनिंग सेटपर्यंतच्या उत्पादनांची विस्तृत श्रेणी समाविष्ट आहे. UPMODS बेड, क्रिएशन X3 वॉर्डरोब, मॉड्यूलर सोफा आणि विशिष्ट फ्लॅट लेआउटसाठी कस्टमाइज केलेले डायनिंग सेट यासारख्या इंटेरिओच्या मॉड्यूलर सोल्यूशन्स वापरून ग्राहक त्यांची घरे स्वतःच्या मनाप्रमाणे सजवू शकतात. 3D रूम प्लॅनर आणि प्रॉडक्ट कॉन्फिगरेटर सारख्या सोयींद्वारे ग्राहक आपल्या आवडीनुसार बदल करून ते डिजिटली पाहू शकतात, ज्यामुळे डिझाइन प्रक्रिया सहज आणि आकर्षक ठरते.

किंमत आणि सोय या दोन्ही बाबतीत रेडी-टू-फर्निश फ्लॅट सोल्युशन्सचे फायदे लक्षणीय आहेत. क्युरेटेड फर्निचर कलेक्शन, एक्सक्लुझिव्ह पॅकेज प्राइसिंग आणि प्री-डिझाइन केलेल्या लेआउटमुळे एखादे घर नव्याने मांडण्यासाठी लागणारा वेळ आणि मेहनत कमी होते. कस्टमायझेशन आणि व्हॉल्यूमनुसार, डिलिव्हरी आणि इन्स्टॉलेशन 2 दिवस ते 4 आठवड्यांत पूर्ण होते. विशेष म्हणजे नवीन घर खरेदीदारांना सोयीचे जावे म्हणून आकर्षक EMI आणि NCEMI प्लॅन ऑफर करण्यासाठी इंटेरिओने वित्तीय संस्थांसोबत देखील भागीदारी केली आहे.

प्रमुख महानगरांमध्ये सुरू झालेली ही सेवा इंटेरिओच्या विस्तृत डीलर नेटवर्कद्वारे लवकरच टिअर II शहरांमध्ये विस्तारित केली जाणार आहे. घर एकदा ताब्यात आल्यानंतर ऑफर केलेले फर्निचर हे पर्यायी अपग्रेड म्हणून उपलब्ध असेल. अर्थात यासाठी विकासकासोबत असलेली भागीदारी महत्त्वाची आहे. प्रत्येक पॅकेज हे स्वतंत्र घरासाठी म्हणून तयार केले आहे, जे घराचा आकार तसेच सजावटीशी मिळते जुळते असेल. त्यानंतर इंटेरिओ एंड-टू-एंड इंस्टॉलेशनचे व्यवस्थापन करेल, ज्यामुळे केवळ सोयीसुविधांनी सज्ज असे घर नव्हे तर आधुनिक भारतीय संवेदनशीलता जपण्यासाठी विचारपूर्वक डिझाइन केलेले घर ग्राहकांना मिळेल.