Pune Accident News : भरधाव कारवरील नियंत्रण सुटलं, कार थेट 10 फुट खड्ड्यात गेली अन्…; पुण्यात भीषण अपघात

By: Editor_Pratik

On: Sunday, March 15, 2026 6:13 AM

Google News
Follow Us

Pune Accident News : भोर-मांढरदेवी मार्गावर भरधाव कारचा अपघात; दोन जखमी, जीवितहानी टळली

भोर : भोर-मांढरदेवी मार्गावर आंबाडे गावाच्या हद्दीत भरधाव कारचा भीषण अपघात झाला. नियंत्रण सुटलेल्या कारने रस्ता सोडून सुमारे दहा फूट खाली असलेल्या घरासमोरील कठड्याला धडक दिल्याने हा अपघात घडला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र कारमधील दोघेजण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात रात्रीच्या सुमारास घडला. अंधारामुळे वळणाचा अंदाज न आल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कार रस्ता सोडून थेट खाली जाऊन रस्त्याकडील घरासमोरील कठड्याला जोरदार धडकली.

अपघातावेळी कारमधील एअरबॅग वेळेत उघडल्याने दोघांचेही जीव वाचल्याचे सांगितले जात आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले आणि उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

स्थानिकांच्या माहितीनुसार, कार चालक दारूच्या नशेत असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती पोलिसांच्या तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

OPPO India

April 27, 2026

OPPO India

April 27, 2026

April 27, 2026

April 27, 2026

Sbi एसबीआय

April 25, 2026

April 24, 2026